Connect with us

शैक्षणिक

निरगुडसर जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची माहिती होऊन बुध्दिमत्ता वाढावी, तसेच गणित विषयाची आकडेवारी कळावी, या उद्देशाने निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी लावलेल्या विवीध ६५ स्टॉल मधून सुमारे १ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती मुख्याध्यापिका संगिता शेटे यांनी दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी बटाटा, कांदे, मेथीची भाजी, कोथिंबीर ,कोबी फ्लॉवर, भोपळा, शेपु, अशी विविध प्रकारचा भाजीपाला विक्री साठी आणला होता तर खाऊ गल्लीत भेळ, लाडू, जिलेबी, पाणी पुरी, मसाला डोसा, इडली, अप्पे, पाव भाजी, पुलाव, नाचणी सुप, चायनीज पदार्थ विक्री साठी आणले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी हा संपूर्ण ग्रामीण भागातील असुन बहुतांशी मुले हि सर्व सामान्य कुटुंबातील आहेत.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते असे सह शिक्षक नारायण गोरे यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी मंदाताई वळसे पाटील, विघ्नहर कारखान्याचे संचालक नामदेव थोरात, सरपंच रवींद्र वळसे पाटील, उपसरपंच नीतीन टाव्हरे, मा.उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, पोलिस पाटील विठ्ठल वळसे पाटील, प्राचार्य कांताराम टाव्हरे, केंद्र प्रमुख कांताराम भोंडवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप खिलारी, उपाध्यक्ष बाबाजी मेंगडे, चेअरमन सुरेश टाव्हरे, रामदास थोरात, डॉ.शांताराम गावडे, प्रकाश वळसे पाटील, सुनंदा गोरे, जयश्री थोरात, पुजा थोरात, सारीका कडवे, शिल्पा राऊत,या मान्यवर मंडळींनी तसेच पंडित नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी ग्रामस्थ व पालकांनी भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका संगिता शेटे, शिक्षक नारायण गोरे, सुभाष इंदोरे, वैशाली वळसे, प्रतिभा वाकचौरे, संगिता इंदोरे, मनिषा हिंगे,यांनी प्रयत्न केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे पारगाव केंद्राच्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजीत स्पर्धेत दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग.

Published

on

पारगाव शिंगवे-काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे पारगाव केंद्राच्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांत दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे यांनी दिली.

स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,पप्पु खुडे,रोहिदास तुळे,अशोक जोरी,विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन,कुंडलिक जोरी,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राहुल भुरके, उपाध्यक्ष काळुराम टींगरे,पंढरीनाथ करंडे,कैलास टिंगरे,सोपान करंडे,पंढरीनाथ जोरी,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर,विविध शाळांतील शिक्षक ,संतोष लबडे, राजू जाधव,मच्छिंद्र काळे,दत्ता डोळस पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन लहान गटात इ. १ ली व २ री, इ. ३ री व ४ थी आणि मोठ्या गटात इ. ५ वी ते इ. ८ वी स्वरूपात करण्यात आले होते. वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावणे, उंच उडी, लांब उडी, वक्तृत्व, लिंबू चमचा, बेडूक उड्या, वेशभूषा, गोळाफेक, थाळीफेक, तसेच सांघिक क्रीडा प्रकारात बडबडगीत, कविता गायन, भजन, प्रश्नमंजुषा, कबड्डी, खो-खो, लोकनृत्य, लेझीम, लंगडी आदी स्पर्धा
पार पडल्या.

या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कला व क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. सर्व स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील क्रीडाप्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धा यशस्वितेसाठी शिक्षक सुरेश भागवत , उत्तम वाव्हळ , दिनेश तुळे , सुरेश माने, विजय थोरात,रामरास उंडे ,निलिमा वळसे यांनी परिश्रम घेतले.मुख्याध्यापक नंदकुमार चासकर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी सरपंच अशोक करंडे,विशाल ,राहुल भुरके यांनी शुभेच्छा दिल्या तर दिनेश तुळे यांनी आभार मानले.

Continue Reading

शैक्षणिक

प्रा.गोरडे यांना जिल्हास्तरीय आदर्श गूणवंत पुरस्कार .

Published

on


लोणी धामणी प्रतिनिधी – राजु देवडे
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.अरुण भगवंत गोरडे यांना
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या वतीने ” जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत पुरस्कार
” लोकमतचे संपादक संजय आवटे,आमदार महेश लांडगे , माजी शिक्षक आमदार भगवान साळुंके,शिक्षणाधिकारी डॉ . भाऊसाहेब कारेकर यांच्या उपस्थित अंकुराराव लांडगे सभागृह भोसरी येथे रविवार (दि :०६/१०/२०२४ ) रोजी प्रदान करण्यात आला.


यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष,सचिव व त्यांचे सर्व पदाधिकारी व माजी प्राचार्य बी.डी.चव्हाण , निरगुडेवर शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश तापकीर,संचालक मुख्याध्यापक सुनिल वळसे,प्राचार्य कांताराम टाव्हरे, मुख्याध्यापक विनोद बोंबले,पर्यवेक्षक संतोष वळसे,संतोष खालकर, उद्योजिका ज्योती गोरडे,आदित्य कामठे,प्रगती कामठे-गोरडे,युवा उद्योजक प्रतिक गोरडे व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच जिल्ह्यातील अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुरस्कार मिळल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील,उपाध्याक्ष रामदास वळसे पाटील व सर्व संचालक व ग्रामस्थांनी प्रा.गोरडे यांचे अभिनंदन केले .


Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील अंगणवाडी साठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सीएसार फंडातून पाच लाख रुपये निधी.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील अंगणवाडी साठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सीएसार फंडातून पाच लाख रुपये निधी देण्यात आला असून. या कामाचा भूमिपूजन समारंभ कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

काठापूर बुद्रुक येथील गावठाण अंगणवाडीस भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 5 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हा.चेअरमन प्रदिप वळसे पाटील, संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे,बाबासाहेब खालकर, बाजीराव बारवे, दादाभाऊ पोखरकर,आनंदराव शिंदे ,माऊली आस्वारे,नितीन वाव्हळ,पुष्पलता जाधव, मच्छिंद्र गावडे ,पोपटराव थीटे,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,पप्पू खुडे,रोहिदास तुळे, शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष राहुल भुरके ,उपाध्यक्ष काळुराम टिंगरे, यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
काठापूर बुद्रुक येथे अंगणवाडी साठी भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून सी एस आर फंडातून पाच लाख रुपये निधी देण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल करंडे यांनी केले, सरपंच अशोक करंडे,राहुल भुरके,प्रदिप वळसे पाटील, चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंगेश करंडे यांनी आभार मानले.

Continue Reading
Advertisement

Trending