Connect with us

गावागावातुन

पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.

Published

on

मंचर प्रतिनिधी

पारगाव (का) पोलीस स्टेशन हद्दीमधुन दिनांक १४/०७/२०२४ रोजी बाळासाहेब लालजी बढेकर रा. धामणी ता. आंबेगाव जि. पुणे यांची जारकरवाडी ता. आंबेगाव जि. पुणे येथील कांदयाच्या चाळीतील सुमारे ३६,०००/- रू किंमतीचे कांदे चोरीस गेले होते त्या अनुषंगाने पारगाव का पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ११५/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपी विरोधात पारगाव का पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने पारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे व पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अभंग यांना सदर गुन्हयाचे तपास कामी आदेश दिले होते.या गुन्ह्याचा तपास करत असतात या गुन्ह्यातील चार आरोपींना पकडण्यात पारगाव पोलिसांना यश आले आहे.

दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हा घडले ठिकाणचे तसेच आजुबाजुचे परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करीत असताना मौजे जारकरवाडी येथील सी.सी.टी. व्ही फुटेज मध्ये एक संशयीत पिकअप आढळून आली होती. सदर पिकअपचा शोधा घेत असताना. बाळासाहेब केरू सुक्रे यांच्या कांदयाच्या पिशव्या हया चोरीस गेल्याचे समजले त्या अनुषंगाने मौजे खडकवाडी ग्रामपंचायत येथील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता सदर फुटेज मध्ये एक पांढ-या रंगाची पिकअप नं एम. एच. १२ एम. व्ही १३८० यामुधन अज्ञात ४ ते ५ इसमांनी दुकांनाबाहेर ठेवलेल्या कांदयाच्या पिशव्या ह्या नेल्याचे दिसुन आले. त्या अनपुषंगाने लोणी येथील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता सदर आरोपी हे मौजे लोणी येथे दिसुन आले त्या अनुषंगाने सदर पिकअप व आरोपी यांचा शोधा घेत असताना सदरचे आरोपी हे पुन्हा चोरीच्या उद्देशाने मौजे लोणी येथे आल्याची गोपनीय माहीती मिळाली असता. तेथील ग्रामसुक्षा दलाचे जवान यांच्या मदतीने सदरचे आरोपी व पिकअप ही ताब्यात घेतली. सदर आरोपी यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अनिकेत शिवराम चव्हाण वय. २१ वर्षे मुळ रा. बारामती सध्या रा. पनवेल २) सुनिल दिनकर चव्हाण वय. १९ वर्षे मुळ रा. परभणी सध्या रा. पनवेल ३) दिपक श्रावण राठोड मुळ रा. परभणी सध्या रा. पनवेल ४) हसरत अली सयद अली अनसारी वय. २० वर्षे मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. पनवेल असे असल्याचे सांगीतले

वरील चारही आरोपी याचीकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याबाबत कबुली दिली असुन सदर गुन्हामध्ये वर नमुद आरोपी यांना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आरोपीतांकडे अजुन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत पुन्हा त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी मौजे लाखणगाव येथुन विहीरीच्या प्लेटा चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर गुन्हयातील प्लेटा व कांदा विक्रीतुन मिळालेले एकुण २७,०००/-रू हस्तगत करण्यात आले असुन सदर आरोपींनी पारगाव का पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख साो, पुणे ग्रामीण, मा.अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साो पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे साो खेडे विभाग खेड, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (का) पोलीस स्टेशन, पो. हवा. दत्तात्रय जढर, पो. हवा देवानंद किर्वे, पो.ना.शांताराम सांगडे, पो. कॉ.संजय साळवे, पो.कॉ.मंगेश अभंग पो.कॉ.चंद्रकांत गव्हाणे, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, ग्रामसुरक्षा दलाचे जवान आकाश खंडागळे, विशाल वाळुंज, संतोष वांळुज यांनी केली असुन चारही आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये आहेत.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन

Published

on

मंचर-

दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन व मिल रोलरचे पूजन रविवार (ता. १९) अक्षय तृतीयेच्या शुभमुर्हुतावर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते करुन प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली.


मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर प्रतापसिंह सावंत, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सिव्हील इंजीनिअर अमीर पठाण, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे व कामगार आदी उपस्थित होते.


अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

क्षक्षक्षकारखान्याचे संस्थापक – संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार सुरु केले आहेत. ऊस तोडणी यंत्राचे करार करणेसाठी इच्छुक असणा-या मशीन मालकांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच येणारा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

– दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु., ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रोलर पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Continue Reading

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथील आकांक्षा अरगडे (ढमाले) यांची ठाणे शहर पोलीस पदी निवड, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार.

Published

on

मंचर-

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील आकांक्षा बाबाजी अरगडे (ढमाले) यांची ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली असून. त्यांचा सत्कार पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या पोलीस भरती परीक्षेत काठापूर गावची कन्या अकांक्षा बाबाजी अरगडे( ढमाले)यांनी ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली.
पोलीस भरती साठी कठोर मेहनत करून त्यांनी हे यश मिळवले.गेली सात वर्षांपासुन या साठी ती सराव करत होती अनेक वेळा अपयश आले.यावेळी झालेल्या भरती प्रक्रियेत त्यांनी ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली.मध्यंतरी लग्न झाले एक मुलगी झाली परंतु त्यानंतर ही त्यांनी आपले पोलीस होण्याचे स्वप्न सुरू ठेवले.सरावात सातत्य ठेवले कुटुंब व मुलीची जबाबदारी पार पाडत त्यांनी हे यश मिळाले.त्यात त्यांचे वडील एकनाथ ढमाले आई,पती,सासु,सासरे यांचा पाठिंबा मिळाला.


पोलीस पदी निवड झाल्या निमित्ताने काठापूर ग्रामस्थांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, संदीप पोखरकर,पोलिस पाटील,अमोल करंडे, संतोष करंडे, रामदास करंडे,मंगेश करंडे, बाबाजी करंडे, शिवव्याख्यात्या अर्चना करंडे लाखनगाव व काठापूर बुद्रुक येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

पोंदेवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता.आंबेगाव या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये साजरी करण्यात आली.पोंदेवाडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर ग्रामपंचायत अधिकारी मनिषा वळसे,अमोल वाळुंज, आनंदराव पोंदे, चंद्रकांत विरकर, गणेश हारके, शंकर हारके,सचिन हारके, राजू वारे, निलेश मांजरे ,नवनाथ हारके. यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63

Warning: file_get_contents(https://pbn-ph.website/data/bl.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63