देशविदेश
शनिवारी शरदचंद्र पवार आंबेगाव तालुक्यात

मंचर प्रतिनिधी
देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री. शरदचंद्र पवार हे शनिवार दि.२० जुलै २०२४ रोजी आंबेगाव शिरुर विधानसभेतील जनतेच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंचर येथे येणार आहेत.
मा. पवार साहेब हे सकाळी १०.०० वा. शासकीय विश्रामगृह तांबडेमळा अवसरी फाटा येथे उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जनतेने दिलेल्या घवघवीत मताधिक्यामुळे पवार साहेब आभार मानण्यासाठी येत आहेत.
त्याचप्रमाणे पवार साहेब आंबेगाव तालुक्यात आल्यानंतर काय बोलतात याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील उपस्थित राहणार आहेत. शासकीय विश्रामगृह अवसरी फाटा तांबडे मळा याठिकाणी सकाळी १०.०० ते दु.१२.०० यावेळेत जनतेच्या समस्या समजुन घेतील. यानिमित्ताने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.
देशविदेश
भीमाशंकर कारखान्यास देशातील “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर.


मंचर- दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२३-२४ करीता “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२३-२४ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

“देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार” जाहीर झाल्याबाबत माहिती देताना बेंडे म्हणाले की, मूल्यमापनाच्या आधारे पुरस्कार निवड समितीने श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १५ असे एकूण २८ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” ७ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे मा. संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
देशविदेश
सातासमुद्रापार बाप्पाची आराधना महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे.

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे. यावर्षी हा उत्सव 9 दिवस चालला असुण यामध्ये दररोज हरिपाठ,आरती, लकी ड्रॉ, महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे गणेशोत्सव याहीवर्षी मागील वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सर्व तरुण मंडळी
महाराष्ट्रमधून असून यामध्ये
गौरव पुरुषोत्तम कापसे(बुलढाणा), निखिल बोऱ्हाडे(पुणे), योगेश जाधव(पुणे),अभिजित भड (पुणे), गजानन रिठे (बीड), प्रथमेश हिंगे (पुणे) केतन सोनार(जळगाव), प्रशांत भाटे, प्रशांत कोरडे, प्रद्युम्न देशमुख, जयेश शेलार(चाकण), ऋषिकेश चव्हाण(सातारा), तन्मयी सुतार (पुणे), आदी उपस्थित व यांच्या पुढाकाराने उत्सव पार पडला.
गणेश मूर्तीचे सौजन्य पुणे (खेड)येथील प्रशांत कोरडे या युवकाने भारता मधून येतानाच श्रींची मूर्ती सोबत आणली होती.
हीच गणरायाची मूर्ती श्री गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात स्थानापन्न करण्यात आली. या वर्षी हा गणेशोत्सव 9 दिवस सुरु होता. दररोज सकाळ संध्याकाळ आरती तसेच बाप्पासाठी नैवेद्य तसेच वेगवेगळे प्रसाद बनवून नैव्यद्य दाखविला गेला. तर या कार्यक्रमाची सांगता रविवार दिनांक 15सप्टेंबर2024 रोजी झाली….
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन9 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन9 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन1 year ago
विठू माऊली