Connect with us

गावागावातुन

काठापुर बुद्रुकच्या उपसरपंचपदी दादाभाऊ गायकवाड यांची निवड

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे

काठापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंच निवडणूकीत दादाभाऊ गायकवाड यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडील काठापूर बुद्रुक येथे उपसरपंच पदाची निवडनुक नुकतीच पार पडली यावेळी दादाभाऊ गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अशोक करंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. सुवर्णा गोसावी ग्रामसेवक यांनी सचिव म्हणून सभेचे कामकाज पाहिले. यावेळी माझी उपसरपंच विशाल करंडे,पप्पू खुडे,ग्रामपंचायत सदस्य पुनम करंडे, अर्चना जाधव ,शोभा जोरी, सुनीता मैड,विलास सोनार,दत्ता शितोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपसरपंचपदी निवड झाल्यावर दादाभाऊ गायकवाड त्यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

खेड्यापाड्यातही आता मोठ्या गणेश मूर्तींची धूम, आंबेगाव तालुक्यात पीओपीसह शाडूच्या मूर्तीना मागणी; तयारी अंतिम टप्प्यात

Published

on


मंचर-
येत्या काही दिवसानी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ओबेगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन मूर्तीना आकर्षक रूप देत असून, यंदा पीओपीसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी असल्याचे जिल्ह्याला घाऊक मूर्ती पुरवणारे गावडेवाडी ता आंबेगाव येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले आहे.

आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांमध्ये रंगकाम, सजावट आणि वस्त्रांच्या नक्षीकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक मंडळांसह नागरिकांनी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू केली असून, कारागीर ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती साकारत आहेत.कारखान्यात गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, सध्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

आमच्या कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार मूर्ती तयार असून, त्या सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविल्या आहेत. १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तीना मंडळांकडून विशेष मागणी आहे. शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.घरगुती गणेश मूर्तीनाही मोठी मागणी आहे – प्रथमेश श्रीधर राजगुरू
मूर्ति कारागीरगीरआदर्शगाव गावडेवाडी (ता .आंबेगाव )

पीओपी मूर्तीना पसंतीआकर्षक रंगसंगती
कमीवजन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना बाजारात मोठी मागणी आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले असले तरी, पीओपीच्या मूर्तीची विक्री वाढणार असल्याचा दावा श्रीधर राजगुरू यांनी केला आहे.मात्र कच्च्या मालाचे वाढलेले दर वाढलेली मजुरी यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीत १५ ते २० टक्यांनी वाढ होणार असल्याचेही श्रीधर राजगुरू सांगतात दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडूनजलप्रदूषणाबाबत चिंताव्यक्त करत शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे


आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील गणेश मूर्ती कारागीर कारखान्यात अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत गुंतले आहेत

Continue Reading

गावागावातुन

पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.

याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.

सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.

Continue Reading

गावागावातुन

तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा

Published

on

मंचर प्रतिनिधी :

गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.

“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62