मनोरंजन
आंबेगाव तालुक्यात प्रथमच बैलगाडी छकडी शर्यतींचे मैदान.पिरसाहेब यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक केसरी स्पर्धेचे आयोजन.
निरगुडसर-
आंबेगाव तालुक्यात प्रथमच तीन फेऱ्यांच्या बैलगाडी शर्यतींचे मैदान पार पडले.पिरसाहेब यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक केसरी या मानाचे स्पर्धेचे नियोजन पार पडले. यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैल व गाडामालक लांबून लांबून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते.
काठापुर बुद्रुक येथील पिरसाहेब यात्रा उत्सवा निमित्त आंबेगाव तालुक्यात प्रथम तिन फेऱ्यांचे बैलगाडी मैदान आयोजित केले होते. तसे पाहिले तर उत्तर पुणे जिल्ह्यात चार बैली बैलगाड्यांचे घाट पार पडत असतात. परंतु यावेळी प्रथमच बैलगाडी छकडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला एकूण 450 बैलगाडा मालकांनी भाग घेतला. या स्पर्धेसाठी जळगाव ,मनमाड ,येवला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ,अहिल्यानगर, सातारा ,फलटण, कल्याण, अंबरनाथ,ठाणे, रायगड, पनवेल, पुणे, श्रीगोंदा अशा ठिकाणावरून लांबून लांबून बैलगाडी मालक सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख 21 हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
यावेळी प्रथम क्रमांक.सुधीर खांडेभराड बाळु पोटे नाशिक शार्दुल ग्रुप यांचा राजा व बाजी.दुसरा क्रमांक -साहिल प्रतिष्ठान कल्याण व पांडुरंग काळे यांच (हारण्या आणि जलवा),तिसरा क्रमांक-पप्पु खांडेभराड शाकिर पठाण छत्रपती संभाजीनगर व संतोष तोडकर ठाणे यांचा (साई 1111 आणि वजीर),चौथा क्रमांक-वनिता धनवडे यांचा (वडकीचा पिस्टन 2211 आणि गिरवीचा रुद्रा),पाचवा क्रमांक- सुनिल पोखरकर हनुमंत जाधव यांचा (लखन 1197 आणि कबीरा),सहावा क्रमांक इंदलकरांचा सुंदर आणि गरुड गृपचा सुंदर,सातवा क्रमांक-संतोष जाधव घोटचा सर्जा 2526 आणि वाटेगावकरांचा बादल,आठवा क्रमांक वैभव टेमकर रामदास कराळे यांचा सुंदर & मुरल्या या बैलांनी क्रमांक पटकाविला पटकावला.
या बैलगाडा मालकांनी मिळवला यात्रेचे नियोजन सुनील पोखरकर,हनुमंत जाधव,कमलेश ढोरे,किरण करंडे,अध्यक्ष तानाजी जाधव,सुदर्शन करंडे,निवृत्ती करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, सुभाष जाधव,विठ्ठल टिंगरे,बबन जाधव,बाळासो नरे,नरहरी करंडे, बजरंग करंडे, रामदास करंडे, एकनाथ ढमाले,तन्मय पाटील तरुण मंडळी यांसह ग्रामस्थांनी नियोजन पाहीले.तालुक्यात प्रथमच बैलगाडी छकडी स्पर्धां होत असल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
यावेळी माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार कार्याध्यक्ष देवदत्त निकम,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरुण गिरे,जयसिंग एरंडे,पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले,अनिल वाळुंज, नगरसेवक सागर गवळी, काकासाहेब गवळी,माळशिरस चे नगराध्यक्ष सचिन वावरे,रामकृष्ण टाकळकर, आंबेगाव तालुका बैलगाडा संघटना अध्यक्ष शिवाजी निघोट,वैभव उंडे,सुहास बाणखेले,पारगाचच्या सरपंच श्वेता ढोबळे यांसह अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला हजेरी लावली.
यावेळी निकाली पंच किरण गारगोटे, निलेश कबाडी,किरण जाधव,झेंडा पंच बापु धनवडे,आनंद जगदाळे,नंबर टेकर सुनिल झांबरे, निवेदन सुनिल मोरे, विकास जगदाळे, मयुर तळेकर,रनजित बनसोडे यांनी काम पाहीले.
गावागावातुन
शिळा बाजार” ठरतोय वळती गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भागयंदा शिळ्या बाजारात झाली लाखोंची उलाढाल.
पारगाव :
वळती (ता.आंबेगाव) गावात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली शिळ्या बाजाराची ही परंपरा पिढ्यान्पिढ्या जपत ग्रामस्थांनी आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. आधुनिक काळातही गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेला हा शिळा बाजार वळती गावाची खास ओळख ठरत आहे. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा जपत भरवला जाणारा हा शिळा बाजार पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकही आवर्जून उपस्थित राहत आहेत.

पौष पौर्णिमेला नागापूर येथील थापलिंग गडावर दोन दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी वळती गावात हा शिळा बाजार भरतो. पूर्वीचा काळी वळती, नागापूर या दोन गावांची वळती ग्रामपंचायत एकच होती. त्यामुळे थापलिंग देवस्थान हे वळती ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत होते. त्यावेळी वळती गावापासून थापलिंग देवस्थान हे तीन चार किलोमीटर अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना यात्रेला जाण्यासाठी कठीण होते. वळती गावातील काटवान वस्ती, गांजवेवाडी या परिसरातून थापलिंग देवस्थान दूरच्या अंतरावर होते. त्यामुळे थापलिंग गडावर जाण्यापासून अनेक जण वंचित राहत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय टाळण्यासाठी थापलींग गडावरची जिलेबी भजी, शेव रेवडीची हॉटेल , खेळणी, बांगड्यांची दुकाने ही वळती गावात तिसऱ्या दिवशी येऊ लागली. त्यामुळे हा शिळा बाजार सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा बाजार मोठ्या उत्साहात भरतो. आहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील व्यावसायिक येथे दरवर्षी आवर्जून येतात. या बाजारात महिलांची लहान मुलांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
यंदा पै पाहुण्यांना ग्रामस्थांनी जिलेबी -, शेव -रेवडी आग्रहाने खाऊ घातली. महिलांनी संसारपयोगी साहित्य वस्तू खरेदी केल्या. या शिळ्या बाजारात यंदा लाखो रुपयांची उलाढाल झाली.
चौकट : वळती गावात थापलिंग यात्रेचा उत्साह अधिक: थापलिंग यात्रेचा उत्साह वळती गावात पूर्वीपासून अधिकच दिसून येतो. आजही आपली गडावर ओळखीच्या काठी पालख्यांना मोठा मान दिला जातो. सर्व मुंबई, पुणेकर मंडळी आवर्जून या यात्रेसाठी हजेरी लावतात.

वळती (ता. आंबेगाव) गावात शिळ्या बाजाराची आजही परंपरा टिकून आहे.
गावागावातुन
थापलिंग देवस्थान विकासासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार: माजी मंत्री दिलीप वळसे पाटील
पारगाव :
श्री. क्षेत्र थापलिंग देवस्थान विकासासाठी या पूर्वकाळात मी आमदार निधी, तीर्थक्षेत्र विकास निधी उपलब्ध करून दिला. त्यातून थापलिंग गडावर विविध विकास कामे झाली. थापलिंग देवस्थान विकासासाठी जाहीर केल्याप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी थापलिंग देवस्थान ट्रस्टकडे वर्ग केला आहे. पुढच्या यात्रेपर्यंत आणखी ५० लाख रुपयांचा निधी मी राज्यशासन, इतर निधीतून उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि.४) दिली.
नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्री.क्षेत्र थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आमदार दिलीप वळसे पाटील यांनी खंडोबा देवाचे दर्शन घेऊन तळीभंडार केला. त्यानंतर बैलगाडा घाटात गेल्यावर यात्रेकरूंना शुभेच्छा देताना वळसे पाटील बोलत होते.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले”मी भाग्यवान आहे. लहानपणापासून थापलिंग यात्रेला मला येण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी यात्रेत थापलिंग देवस्थान विकास कामांसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. भीमाशंकर कारखान्याने थापलींग देवस्थान ट्रस्टकडे हा निधी वर्ग केला आहे. थापलिंग गडावर आणखी विकास कामांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. पुढच्या यात्रेपर्यंत आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आणखी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. याशिवाय थापलिंग देवस्थानासाठी जेव्हा जेव्हा जी मदत लागेल. ती मदत प्राधान्याने केली जाईल.
याप्रसंगी थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने वळसे पाटील यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे सचिव डी. एन. पवार यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी विष्णू काका हिंगे भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर, पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे, अंकिता वाळुंज, सुनंदा ढोबळे आदी मान्यवर, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सरपंच गणेश यादव यांनी केले.

नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्री. थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
गावागावातुन
थापलिंग यात्रेत जिलेबी भजीचा आस्वाद घेण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी.महिलांनी संसारपयोगी तर शेतकऱ्यांनी शेतीपयोगी वस्तूंची केली खरेदी.
पारगाव:
नागापूर (ता. आंबेगाव )येथील श्री. क्षेत्र थापलिंग गडावर रविवारी भर यात्रेच्या दिवशी तब्बल दोन लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. यात्रेकरूंनी यात्रेत जिलेबी भजी खाण्याचा आस्वाद घेतला.
उत्तर पुणे जिल्ह्यात थापलिंग यात्रा सर्वात मोठी भरते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती. थापलिंग यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जिलेबी भजी. मित्रमंडळी, पाहुण्यांना जिलेबी- भजी आग्रहाने खाऊ घातले जाते. दोन्हीही दिवस जिलेबी- भजी खाण्यासाठी अक्षरक्ष: झुंबड उडालेली पाहायला मिळाली. यंदा जिलेबी २०० रुपये किलो तर भजी २८० रुपये किलो दराने विकले जात होते. अशी माहिती शिवजन्मभूमी हॉटेलचे राजू हलवाई यांनी दिली.
थापलिंग यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे महिला गृहिणींसाठी संसारपयोगी साहित्य, वस्तू या यात्रेत मोठ्या प्रमाणावर मिळतात. शेतकऱ्यांसाठी शेती कामासाठी लागणारी खोरे ,टिकाव, कुदळ, खुरपे आदी सर्व अवजारे, हत्यारे याच यात्रेत मिळतात. त्यामुळे शेतकरी, गृहिणींसाठी यात्रा मोठी पर्वणी असते. अनेक शेतकऱ्यांनी, गृहिणींनी संसारपयोगी साहित्य शेती उपयोगी हत्यारे खरेदी केली.

नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग यात्रेत जिलेबी भजीचा आस्वाद येताना यात्रेकरू. दुसऱ्या छायाचित्रात संसारपयोगी साहित्य खरेदी करताना महिला गृहीनी, दुसऱ्या छायाचित्रात शेतीपयोगी अवजारे, हत्यारे खरेदी करताना शेतकरी.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन4 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
