गावागावातुन
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२२-२३ करीता “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

“देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना श्री. बाळासाहेब बेंडे म्हणाले की, पुरस्कारांचे मुल्यांकन करण्यासाठी ११ सदस्यांच्या तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यात केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्याशिवाय मुख्य संचालक, राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ नवी दिल्ली, उप संचालक (साखर) नवी दिल्ली, संचालक राष्ट्रीय साखर संस्था, कानपुर, महासंचालक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, गुजरात, तामिळनाडू या राज्यांच्या साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे ऑगस्टमध्ये होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” ६ वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे मा. संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
गावागावातुन
अवसरी खुर्द मंदिरात हनुमान जयंती उत्साह

मंचर
: अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील हनुमान मंदिरात शनिवारी (ता १२ ) रोजीहनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमान जन्माचे कीर्तन हभप मधुकर महाराज गायकवाड (गावडेवाडी) यांचे झाले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंदिर परिसर सुशोभित केला होता. हनुमान यांनी गुरू म्हणून श्रीराम प्रभू यांची केलेली आदर्शवत सेवाआहे हनुमंताचा व प्रभू रामचंद्रांचा आदर्श भावी कांनी घ्यावा .हनुमंतासारखी भक्ती करावी हनुमंता सारखे विनम्र असावे हनुमंतांचे आचरण करणे ही आजच्या तरुण पिढीची काळाची गरज आहे अवसरी खुर्द ग्रामस्थांची एकजूट व एकोपा अतिशय कौतुकास्पद आहेअसेही प्रतिपादन ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांनी यावेळी . या कार्यक्रमाचे नियोजन ह-भ-प दीपक महाराज टेंबेकर ह भ प अनंत महाराज टेंभेकर ग्राम पुरोहित यतीन काका कुलकर्णी सोमनाथ खोल्लमसंतोष कसाब संतोष फल्ले ,संजय वायाळ व सर्व ग्रामस्थांनी केले गायकवाड महाराजांचा यांचा सन्मान भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी सभापती आनंदराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती याप्रसंगी टाळकरी, पखवादक, वीणाधारी व वारकऱ्यांचा सत्कारकरण्यात आला.

अवसरी खुर्द (ता . आंबेगाव येथे हनुमान जयंती निमित्त ह भ प मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी यांची देव जन्माचे किर्तन संपन्न झाले
गावागावातुन
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील १५० महिलांनी घेतला सहलीचा आनंद.

निरगुडसर-पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील महिलांच्या एक दिवशी कोकण सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 150 महिलांनी सहलीत भाग घेऊन अलिबाग येथील समुद्रकिनारा व इतर पर्यटन स्थळांना भेट देऊन सहलीचा आनंद घेतला.
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील महिलांसाठी अनिलभाऊ वाळूंज मित्र मंडळाच्या वतीने सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील महिलांना शेतीच्या कामातून थोडासा वेळ मिळून सहलीचा आनंद घेता यावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.अलिबाग या ठिकाणी समुद्रकिनारी आणि इतर पर्यटन स्थळांना या महिलांनी भेट दिली.या सहलीच्या निमित्ताने महिलांना कामातून बाहेर पडून आनंद घेता आला यावेळी तीन बसमधून 150 महिलांनी या सहलीत सहभाग घेतला होता.महिलांच्या संपूर्ण सहलीची व्यवस्था खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर ,महेंद्र पोखरकर, सोमनाथ वाळुंज संतोष वाळुंज अमोल वाळुंज, संदीप घोलप, नानाभाऊ पोखरकर, अमित दौंड प्रकाश दौंड,निलेश मांजरे , नवनाथ मखर ,शुभम वाळुंज चंद्रकांत विरकर.यांनी पाहिली.पोंदेवाडी येथील ग्रामस्थांसाठी दरवर्षी अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात.याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी यावेळी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अंकिता वाळुंज यांनी दिली.
गावागावातुन
काठापूरचा शेतकर्याचा मुलगा झाला फौजदार

मंचर- काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील अनिकेत सुशिला चंद्रकांत करंडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवित फौजदार पदाला गवसणी घातली. तो गावातील पहिला पुरुष अधिकारी तर गावातील दुसरा अधिकारी ठरला आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनिकेत करंडे याने ग्रामीण भागात राहून जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले. काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे त्याचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण संगमेश्वर विद्यालय पारगाव, तर पुढे मेकॅनिकल इंजिनियर च शिक्षण व्ही आय.टी.पुणे येथुन पुर्ण केले.शिक्षण पुर्ण झाल्यावर अनेक कंपण्यांमध्ये कामाची संधी असतानाही लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन अधिकारी होण्याची ईच्छा असल्याने त्या नंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. होता. कोणत्याही संस्थेत अभ्यास न करत स्वताहाच अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षपदाच्या परीक्षेत यश मिळवले.अनेकांनी नोकरी कर नोकरीची चांगली संधी आहे. या अवघड परीक्षा देऊ नको अपयश येण्याची जास्त शक्यता आहे.असे सांगितले. परंतु आपल्या ध्येयावर ठाम राहुन त्याने हे यश मिळवले आहे.

त्याला पी.एस.आय.विक्रम कर्डीले यांचे मार्गदर्शन मिळाले. शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अनिकेतची आई सुशिला व वडील चंद्रकांत करंडे शेती करुन आपले कुटुंब चालवत आहेत. त्याने मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांना मार्गदर्शक आहे.
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन9 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन1 year ago
विठू माऊली
-
सामाजिक1 year ago
शिरदाळे घाटात पुन्हा भीषण अपघात ग्रामस्थांकडुन रस्त्याच्या शेजारी सिमेंट कठडे बांधण्याची मागणी.