Connect with us

राजकीय

लाडकी बहिण योजनेचा आनंद बहिनींच्या चेहऱ्यावर दिसत आहे.माघील वर्षभरात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील.

Published

on

मंचर प्रतिनिधी

मागील वर्षभराच्या कालखंडामध्ये या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला आणि हीच भूमिका या सरकारची आहे. लाडकी बहिण योजनेचा आनंद बहिणींच्या चेहऱ्यावर दिसत आहे.असे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे आयोजित जनसंकल्प अभियान यात्रे प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सुरेश घुले, मानसिंग पाचुंदकर, लतीफभाई तांबोळी, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा ,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हा.चेअरमन प्रदिप वळसे पाटील, पुर्वा वळसे पाटील, विष्णुकाका हींगे,अंकीत जाधव,यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की दुधाला पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे. चक्रीवादळ अतिवृष्टी च्या वेळी सरकारच्या वतीने मदत केली जात आहे .खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील हिरडा विकासासाठी 15 कोटी रुपये दिले आहेत. मागील 35 वर्षे मला विधिमंडळात पाठवले त्या माध्यमातून मी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा या पुणे मुंबईच्या रुग्णालयाच्या तोडीची आहे. नवीन 100 बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू आहे. शिक्षणासाठी हायस्कूल, वस्तीगृह, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग ,आश्रम शाळा सुरू केल्या.अवसरीच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग च्या माध्यमातून अनेक तरुण इंजिनियर तालुक्यात निर्माण झाले. पुढच्या पाच वर्षात एकच काम करायचे आहे आंबेगाव जुन्नर शिरूर मध्ये 65 केटी बंधारे आहेत हे तीन वेळा भरले जातात. आणि त्यातून शेतकरी समृद्ध झाला आहे. यासाठी पाणी आरक्षित करायचे आहे .कळमजाई ,बोरघर, फुलवडे साठी लिफ्ट पाणी योजना .लोणी धामणीसाठी म्हाळसाकांत.शिरुरच्या पाबळ केंदुर परिसरातील 12 गावांसाठी पाणी योजना ,सातगाव पठार साठी कळमोडी या योजना पूर्ण करायच्या आहेत.
विधानसभा ताकतीने लढवायची व जिंकायची आहे .काही लोक बदनामी करतात खोटे बोलतात त्याला मी उत्तर देऊ इच्छित नाही. माझी मुलगी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही म्हणून मलाच उभे राहावे लागेल असे यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राजकीय

भेसळप्रकरणात संबंध आढळल्यास सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन’ – दिलीप वळसे पाटील यांचा विरोधकांना थेट इशारा.

Published

on

​ मंचर:

अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दुधाच्या व्यवसायावर केलेल्या कारवाईवरून सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात आपला दूरान्वयानेही संबंध सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन, असे खुले आव्हान त्यांनी राजकीय विरोधकांना दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे विरोधकांच्या खोट्या आरोपांचा कडक शब्दांत समाचार घेतला.

​ गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या माध्यमातून राज्यात आणि अंबेगाव तालुक्यात दूध व्यावसायिकांवर तपासणी करून कारवाई केली जात आहे. ही कारवाई अजूनही सुरूच आहे. मात्र, ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही, त्या गोष्टींशी आपले नाव जोडून आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही राजकीय विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भेसळ करणारी कोणतीही व्यक्ती, कंपनी किंवा संस्था असो, आपण कधीही कोणाच्याही पाठीशी उभा राहणार नाही, असे सांगत एफडीए आणि पोलीस प्रशासन अशा लोकांवर कडक कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.

​ आपल्यावर खोटे-नाटे आरोप करून राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. विरोधकांनी ही खोडसाळ बदनामी त्वरित थांबवली नाही, तर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात (High Court) फौजदारी (Criminal) आणि मोठ्या आर्थिक अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला. आपण नेहमीच स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण केले असून जनता, समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी या राजकीय षड्यंत्राची नोंद घ्यावी, असे आवाहन करत शेवटी सत्याचाच विजय होईल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Continue Reading

राजकीय

काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.

Published

on

मंचर-

सध्या देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. यावेळी शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शालेय मुख्यमंत्री पदासाठी दोन उमेदवार उभे होते.तर वर्गानुसार उमेदवार उभे होते. सहावी इयत्तेतुन दोन जागेसाठी चार विद्यार्थी उभे होते. पाचवी इयत्तेतुन दोन जागेसाठी पाच विद्यार्थी उमेदवार उभे होते. चौथी मध्ये एका जागेसाठी तीन, तिसरी मध्ये एका जागेसाठी चार तर दुसरी मध्ये एका जागेसाठी सहा विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यावेळी फोटो सहित विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीतील नावासमोर सही करुन डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावता. यावेळी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रामध्ये एक मतदार केंद्र अधीकारी, तीन मतदान अधिकारी,दोन उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
यावेळी दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान कक्ष बनवण्यात आले होते. मतदार केल्यावर एका ठिकाणी मतदान पेटित मतपत्रिका विद्यार्थ्यांनी टाकल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षक उत्तम वाव्हळ, नीलिमा वळसे पाटील, कविता कोठावळे,मुक्ता कौसे,प्राची शिंदे यांनी माहिती देऊन भारतीय लोकशाहीसाठी मतदान किती महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मतदान झालेल्या मतपत्रिकांवरील मतांची मोजणी होऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांमधून विजयी उमेदवारांमधून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62