महाराष्ट्र
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा २६ वा बॉयलर प्रदिपण आणि मोळी पूजन समारंभ संपन्न.
मंचर-
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचारी आणि आपल्या सहकाऱ्याने गाळप करुन देशात सर्वच बाबतीत एक नंबर कारखाना येण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी केले.
पारगाव ता.आंबेगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा २६ वा बॉयलर प्रदिपण सोहळा आणि मोळी पूजन समारंभ संपन्न झाला या वेळी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, पूर्वा वळसे, तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी आमदार पोपटराव गावडे,, मानसिंग भैय्या पाचुंदकर, लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, प्रकाश बापू पवार ,सर्व संचालक, शेतकरी , विविध तालुक्यातील संत महंत आणि हभप उपस्थित होते.

या वेळी होम हवन करून बॉयलर प्रदीपन करण्यात आले . उपस्थित मान्यवरांचे हस्ते गव्हाणीत मोळी टाकून उद्घाटन करण्यात आले.या वेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते. ऊसाचे बेणे वेळोवेळी बदलणे, ठिबक सिंचन अथवा ड्रिप वर ऊसाचे उत्पादन घेणे , ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणे या गोष्टींचा अंगीकार शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन या वेळी वळसे पाटील यांनी केले. साखर कारखाना जर सक्षमतेने एकशे साठ दिवस चालला तरच ऊस कारखाने तग धरू शकतील अन्यथा नाही. गेल्या वर्षी अनेक कारखाने एकशे साठ दिवस चालू शकले नाहीत. चालू वर्षी कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जाणार आहे. इथेनॉलचे दर वाढीसाठी आम्ही राज्यसरकार केंद्रसरकर कडे प्रयत्न करत आहोत. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे घेता येईल असा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा . हेक्टरी ऊस उत्पादन वाढले तर आपल्याला बाहेरील ऊसाच्या वाहतूक खर्चात बचत होईल.

ऊस कांदा अशा उत्पादनाचे भाव राज्यसरकार ठरवत नाहीत तर ते केंद्र सरकार ठरवत असते हे उत्पादकाने लक्षात घ्यावे.या पुढील काळात ऊस तोडणी कामगार मिळणे अवघड होणार आहे. तरुणांनी पुढाकार घेऊन हार्वेस्टर खरेदी करावी . पुणे जिल्हा बँक हार्वेस्टर खरेदी साठी कर्ज द्यायला तयार आहे. कारखाना हार्वेस्टर खरेदीसाठी पाच वर्षाकरिता बिनव्याजी पस्तीस लाख रुपये मदत देईल. लातूर मध्ये विलासराव देशमुख यांचे बंधू मांजरा सहकारी साखर कारखाना शंभर टक्के ऊस हार्वेस्टर च्या सहाय्याने ऊस तोडणी करत आहे. पावसानं राज्यात झालेल्या नुकसान आणि नुकसान ग्रस्त नागरिकांना आपण जास्तीत जास्त मदत करावी .कारखाना सुद्धा मदत करणार आहे.असे वळसे पाटील म्हणाले.

या वेळी विविध तालुक्यातील संत महंत ह भ प यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष ॲड प्रदीप वळसे पाटील यांनी केले.सूत्र संचालन निलेश पडवळ यांनी केले.
गावागावातुन
थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ, पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन.
पारगाव:
नागापूर (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध श्री थापलिंग यात्रेला आज शनिवारी (दि. ३)भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. “सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करून पारंपरिक तळीभंडार केला.
पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर दोन दिवस मोठी यात्रा भरते. यंदा यात्रा शनिवारी रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी आल्याने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल झाले होते. अनेक भाविकांनी आपल्या नवसपूर्तीसाठी बैलगाडे घाटात पळवले. तर काही भाविकांनी जागरण करून कुलाचार पूर्ण करून श्री खंडोबा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी गडावर रांजणी वळती येथील खुडे बंधूंच्या काठीपालख्या वाजत गाजत आल्या.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त गडावर ठेवण्यात आला आहे.
थापलिंग गडावर जिलेबी भजी हॉटेल, रसवंतीगृहे, गरम कपड्यांची दुकाने, खेळण्याची दुकाने , आकाशी पाळणे, लहान मुलांसाठी पाळणे मोठ्या प्रमाणावर व्यवसायिकांनी लावले आहेत.
रविवारी भरयात्रेचा दिवस असल्याने अजून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांच्या सहकार्याने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पडावी. यासाठी थापलींग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नागापूर ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत.

नागापूर (ता.आंबेगाव)येथील थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.
गावागावातुन
थापलिंग खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर लोकवर्गणीतून तीन कोटी रुपये खर्चून होणार मंदिर.
मंचर :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता. आंबेगाव )येथील थापलिंग खंडोबा देवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. लोकवर्गणी, देणगीतून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून खंडोबा देवाचे मंदिर उभे राहणार आहे.अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टने दिली.
थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी अनेक भाविकभक्तांची मागणी होती. देवस्थान ट्रस्टने गतवर्षापासून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम सुरू केले. मंदिरासाठी तीन कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराचे संपूर्ण काम हे देगलूर काळा पाषाण या दगडामध्ये होणार आहे. हा दगड नांदेड येथून उपलब्ध केला आहे. जमिनीपासून सुमारे ६५ फूट उंचीचे हे मंदिर होणार आहे. थापलिंग गड हा उंचीवर आहे. त्यामुळे हे मंदिर गडाच्या चोहोबाजूंनी सहज दिसणार आहे. मंदिरासाठी नागापूर ग्रामस्थांनी मानसी दोन हजार रुपये वर्गणी गोळा केली आहे. येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण होईल. मंदिरासाठी मोठा निधी आवश्यक आहे यासाठी भाविक भक्तांनी मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.


फेब्रुवारी महिन्यापासून विवाहांचे बुकिंग सुरू-: श्री. क्षेत्र. थापलिंग गडावर लग्न समारंभासाठी १५० बाय ८० फूट आकाराचा सभामंडप उभारण्यात आला आहे. सुमारे १२ हजार स्क्वेअर फुट आकाराच्या सभामंडपात गोरगरिबांची लग्न होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून विवाहाच्या तारखांचे बुकिंग सुरू होणार आहे. गोरगरिब कुटुंबांना चांगला फायदा होणार आहे.

नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग गडावर सुरू असलेले खंडोबा देवाचे मंदिर.
गावागावातुन
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.
मंचर-
पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन4 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
