Connect with us

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी बसवले गतिरोधक

Published

on

मंचर


अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक बसवला आहे.

पोंदेवाडी ग्रामस्थांनी रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक बसवणे बाबत माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील व जि. प. माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे ख. वि. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, माऊली रोडे, राजु रोडे, अक्षय रोडे, सुनिल रोडे यांनी सांगितले. रोडेवाडी फाटा नजीक गतिरोधक नसल्याने काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
अष्टविनायक महामार्ग आंबेगाव तालुक्यातुन कारफाटा, नागापूर, पारगाव काठापूर, पोंदेवाडी इत्यादी गावातून जातो हा महामार्ग पुढे रांजणगाव गणपती रांजणगाव औद्योगिक वसाहतीला मिळत असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे सदर रस्त्यावर चारचाकी वहाने भरधाव वेगाने जातात.अशा वेळी सदरील रस्त्याच्या आजुबाजुला असलेल्या गावातील नागरीकांना या रस्त्यावरुन ये-जा करत असताना वाहनांच्या वेगाचा सामना करावा लागतो.

अवजड वाहनांच्या वेगामुळे दुचाकी रस्त्याच्या खाली जावून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्याच प्रमाणे अनेक अपघात झालेअसून अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. सातत्याने अपघाताची मालिका सुरु होती सदर रस्त्यावर गतिरोधक बसल्याने पोंदेवाडी रोडेवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

Published

on

  मंचर-
     राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रक्कम रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले. 

यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अंकिता वाळुंज यांची माघणी.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्यातील नागापूर, पारगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी या गावातून जाणाऱ्या ओझर ते रांजणगाव या अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर तसेच चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे काढावीत अशी मागणी अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

नागापूर पारगाव काठापुर बुद्रुक पोंदेवाडी या गावांमधून ओझर ते रांजणगाव हा अष्टविनायक महामार्ग जातो हा महामार्ग झाल्याच्या नंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे .अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे.त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या परिसरात ऊस तोडणी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक वाढली आहे परंतु या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवर व खालील चारामध्ये अनेक झाडे झुडपे वाढली आहेत हे झाडे झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना वळणाच्या ठिकाणी वाहन काही वेळेस डांबरीच्या खाली घेता येत नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एकंदरीत या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे संबंधित विभागाने काढावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ नागरिक करत आहेत.

Continue Reading

गावागावातुन

काठापुर बुद्रुक या ठिकाणी ऐतिहासिक तोफेचे ग्रामस्थांच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर पुजण.

Published

on

निरगुडसर-

काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक तोफेचे पूजन ग्रामस्थांच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.दरवर्षी ग्रामस्थ या तोफेचे पुजन करुन शस्त्र पुजणाने दसरा उत्सव साजरा करतात.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक या ठिकाणी ऐतिहासिक तोफेचे दरवर्षी पुजन करण्यात येते.मराठा राजपूत युद्धामध्ये मराठ्यांनी युद्ध जिंकले व या विजयात मिळालेली तोफ. नंतरच्या कालखंडामध्ये काठापुर बुद्रुक येथील गढीच्या संरक्षणासाठी आणण्यात आली. आणि तेव्हापासून काठापूर बुद्रुक या ठिकाणी हि तोफ आहे. ही राजस्थानी बनावटीची तोफ येथील ग्रामस्थांनी जतन करुन ठेवलेली असुन दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी या तोफेचे पुजण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते.यावेळी या तोफेचे पूजन माझी उपसरपंच विशाल करंडे,पप्पु खुडे,पोलीस पाटील अमोल करंडे,राजु जोरी, रोहित चाबुकस्वार,बाबाजी चव्हाण आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.


दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजनाला मोठे महत्त्व असून राज्यभरात ऐतिहासिक शास्त्रांचे पूजन केले जाते.काठावर बुद्रुक या ठिकाणीही ऐतिहासिक तोफेचे पूजन यावर यावेळी करण्यात आले.

Continue Reading
Advertisement

Trending