शैक्षणिक
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाचे यश
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240207-WA0018-1000x600.jpg&description=शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाचे यश', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240207-WA0018-1000x600.jpg&description=शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाचे यश', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
निरगुडसर प्रतिनिधी( राजु देवडे)
महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व श्री. विठ्ठल गबाजी कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयातील शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इंटरमिजिएट व एलिमेंटरी या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे यांनी दिली.
सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इंटरमिजिएट व एलिमेंटरी या परीक्षांचा निकाल नुकताच लागला. इंटरमिजिएट परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा शेकडा निकाल 100% लागला. पैकी १४ विद्यार्थी A श्रेणीमध्ये, २० विद्यार्थी B श्रेणीमध्ये, व १६ विद्यार्थी C श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
ए श्रेणी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – आवटे किमया अजित, बनकर संस्कृती राजेंद्र, बारवे दिव्या दिलीप, बारवे अनुष्का रमेश, भालेराव पूजा विशाल, चासकर आर्या माधव, चासकर श्लोका रमेश, चिखले गायत्री रामदास, चिखले साक्षी नरेंद्र, चिखले उत्कर्षा दीपक, पडवळ वेदिका राजेंद्र, पडवळ श्रावणी संजयकुमार, सोलाट मनस्वी शरद, वायाळ सिद्धी संतोष.
बी श्रेणी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- आंबटकर आर्यन अजित, बारवे अक्षरा भगवान, भालेराव भक्ती शरद, चासकर हर्ष प्रदीप, चासकर कावेरी शिवराम, चासकर प्रणाली महेंद्र, चासकर श्रावणी राहुल, चासकर सेजल दिनेश, चिखले समीक्षा अजित, चिखले वैष्णवी अविनाश, चिखले वेदिका विकास, चिखले विद्या बबन, डोके अनुष्का कुलभूषण, डोके समृद्धी सचिन, गाडे ऋत्विक बाबुराव, मोढवे सानिका नवनाथ, पडघनकर प्रांजल संजय, पडवळ ऋतुजा दत्तात्रय, पडवळ तनिष्का जगदीश, फासे अनन्या औदुंबर.
सी श्रेणी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- चासकर सानवी हरिश, चिखले अनया संजय, चिखले हर्ष प्रफुल्ल, डोके अक्षदा विकास, डोके यश नवनाथ, गाडे ईश्वरी जयवंत, घायाळ प्रणाली किरण, गाडे सान्वी दत्ता, घायाळ संस्कार राजेश, कडूसकर स्वराली शरद, केदारी समीक्षा सुमुख, मगर सानिका दिनेश, मोढवे कादंबरी दत्तात्रय, पडवळ हर्ष कैलास, सैद अविष्कार वनराज, सैद ईश्वरी हेमंत.
त्याचप्रमाणे एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण ४२ विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा शेकडा निकाल 100% लागला.
पैकी १४ विद्यार्थी A श्रेणीमध्ये, १८विद्यार्थी B श्रेणीमध्ये, व १० विद्यार्थी C श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.
ए श्रेणी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – आल्हाट सिद्धी उमेश, आवटे आरती अजित, बारवे भावेश दिलीप, भालेराव दिव्या सुरेश, भालेराव शौर्य सचिन, चासकर भार्गवी प्रसाद, चिखले सार्थक संतोष, चक्कर सौम्या उमेश, दहिवाळ अनुष्का किरण, दिवेकर अक्षरा सोमनाथ, डोके श्रवण विजय, घोडेकर मृणाल सागर, जाधव श्रेया संजय, लोहकरे सई शिवाजी.
बी श्रेणी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- आवटे लावण्या अजित, आवटे साई विकास, चासकर अक्षरा रमेश, दाभाडे सान्वी राजेंद्र, डोके संस्कार गणेश, डोके ईश्वरी संतोष, गाडे दीक्षा गणेश, घायाळ तन्वी राजेश, गायकवाड श्रद्धा दर्शन, क्षीरसागर सान्वी सुरज, पडवळ दिव्या दत्तात्रय, पडवळ ईश्वरी प्रवीण, पडवळ स्वरूपा सचिन, पडवळ स्वर्णिमा महादेव, विश्वासराव सान्वी पोपट, पडवळ तनिष्का महेंद्र, सैद अस्मित महेश, सिनलकर साजरी संतोष.
सी श्रेणी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- आवटे वैष्णवी मंगेश, भागीत आयुष संतोष, भोर पायल खंडू, चासकर ऋषिकेश शिवराम, घायाळ वैष्णवी संपत, कराळे रुद्र अतुल, लांघी सोहम दगडू, मोढवे मोनिका नवनाथ, सैद सान्वी संतोष, वाळुंज सार्थक श्रीकृष्ण आदि. विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सदर विद्यार्थ्यांना विद्यालयातील कलाशिक्षिका वनिता गाढवे, शशिकांत पावडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे, केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे यांची प्रेरणा लाभली. विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, सरपंच, उपसरपंच. स्थानिक स्कूल कमिटी, शालेय व्यवस्थापन समिती, शालेय विकास समिती, शालेय सल्लागार समिती चेअरमन व सर्व सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
गावागावातुन
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
मंचर-
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.
या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

शैक्षणिक
पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील विद्यार्थी देवांश गणेश कापडी याची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे निवड.
मंचर-
पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील डि.जी.वळसे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी देवांश गणेश कापडी याने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश संपादन केले असुन त्याची निवड राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे झाली आहे.देशभरातुन एकुण ३६५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात देवांश याने यश मिळवले आहे
मिलिट्री स्कूल (RMS) या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणार्या निवासी शाळा असुन या शाळा इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार शिक्षण देतात आणि लष्करी नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांची जडणघडण करतात. सध्या भारतात हिमाचल प्रदेशातील चैल, राजस्थानमधील अजमेर आणि ढोलपूर, तसेच कर्नाटकातील बंगळुरू आणि बेळगाव येथे या ५ आरएमएस शाळा आहेत.या शाळांची स्थापना १९२५ मध्ये झाली असुन.या शाळेत इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी प्रवेश दिला जातो. CET सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.येथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात असुन.NCC प्रशिक्षण, क्रीडा आणि शैक्षणिक दिले जाते. १० ते १२ वर्षे (६ वी साठी) आणि १३ ते १५ वर्षे (९ वी साठी) वयोगटातील मुले/मुली यांची निवड केली जाते.भारतातील ५ राष्ट्रीय मिलिट्री स्कूल RMS चैल (हिमाचल प्रदेश) अजमेर (राजस्थान),RMS ढोलपूर (राजस्थान),RMS बेळगाव (कर्नाटक)RMS बंगळुरू (कर्नाटक)येथे असुन दर वर्षी देशभरातुन ३६५ विद्यार्थ्यी येथे निवडले जातात. त्यातून 36 सिविलियन विद्यार्थ्यांची निवड होते
आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील देवांश अश्विनी गणेश कापडी याची निवड झाली असून राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षेत 150पैकी 138 गुण मिळाले आहे तसेच ऑल इंडियन सैनिक स्कूल परीक्षेत 300पैकी 270 गुण मिळाले आहेआपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दोन मोठ्या परीक्षा ती यश मिळाले आहे.परीसरातुन त्याचे कौतुक होत आहे.देवांश याची आई अश्विनी कापडी/ लबडे भारतीय सैन्य दलात सीमा सुरक्षा दलात काम करते. तर वडील गणेश कापडी पुणे येथे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत आहेत. घरातूनच सैनिकी वारसा लाभलेल्या देवांश याला भविष्यात देश सेवेसाठी जबाबदार नागरिक व अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने व काम करण्याची इच्छा आहे.
शैक्षणिक
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.

मंचर-
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.

टाटा मोटर्स (बिकन) व पर्यावरण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून नुकताच ग्रीन स्कूल अवार्ड (हरित शाळा) २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.पुणे या ठिकाणी टाटा मोटर्सचे पदाधिकारी सिताराम कांडी, सुनील तिवारी,निरज अग्रवाल, सतीश आवटे,पुजा शेळकंदे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारी व खाजगी शाळांसाठी हरित शाळा २०२५ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळा गटामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर १५९ सरकारी शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.यातील अंतिम पाच शाळांची निवड करून त्यांना एक ते पाच क्रमांक देण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापुर बुद्रुक या शाळेतने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, उत्तम वाव्हळ, दिनेश तूळे,निलीमा वळसे,कवीता कोठावळे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर शेटे, राजू जोरी व विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. शाळेने शाळा व परिसरामध्ये केलेली वृक्ष लागवड, पर्यावरणीय रक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी नियोजन,शुद्ध पाणी,बगीचा,यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांचे अवलोकन करून पारितोषिक देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातुन काठापुर बुद्रुक ही एकमेव शाळा या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली.गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, व गावातील विविध संस्थांच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
