गावागावातुन
धामणी (ता.आंबेगाव) येथे श्री खंडोबा,म्हाळसाईचा शाही विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/01/1001822982-1000x600.jpg&description=धामणी (ता.आंबेगाव) येथे श्री खंडोबा,म्हाळसाईचा शाही विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/01/1001822982-1000x600.jpg&description=धामणी (ता.आंबेगाव) येथे श्री खंडोबा,म्हाळसाईचा शाही विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
लोणी धामणी प्रतिनिधी–
पौष पौर्णिमेला श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाई देवीचा लग्न सोहळा धामणी ( ता.आंबेगाव) येथे पारंपारिक वाद्याच्या गजरात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटात पार पडला.सोमवारी (दि.१३) पौष पौर्णिमेनिमित्त पहाटे धामणीच्या खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती करण्यात आली.त्यानंतर सेवेकरी धोंडीबा भगत,दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,शांताराम भगत,दिनेश जाधव,माऊली जाधव वाघे,सिताराम जाधव वाघे.,राजेश भगत,पांडुरंग भगत,राहुल भगत यांनी व महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व म्हाळसाईच्या मुखवट्याला चंदन उटीचा लेप दिला.

त्यावर सुंगधी दवणाच्या अत्तरात मिश्रित केलेली हळद लावण्यात आली.यावेळी देवाला हळद लावण्यासाठी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.यावेळी महाळुंगे पडवळ,गावडेवाडी,लांडेवाडी,तळेगांव ढमढेरे,लोणी,खडकवाडी,रानमळा, पाबळ,अवसरी खुर्द,संविदणे येथील मानकरी व भाविक उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता बाळासाहेब महादू बढेकर,विठ्ठल बढेकर,अंकुश बढेकर यांच्या मानाच्या मांडवडहाळ्याची पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन सजवलेल्या बैलगाड्यातील मांडवडहाळे मंदिरात सदानंदाचा येळकोट करून व भंडार्याची उधळण करुन देवाला अर्पण करण्यात आले.श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाईदेवी यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती.मंदिरात देवाला पूजा करुन खंडोबाला व म्हाळसाईला बांशिग व मुडावळ्या घालण्यात आल्या.पेठेतील मुक्ताबाई मंदिरात पौष महिण्याच्या पालखीचे मानकरी समस्त करंजखेले मंडळीच्या हस्ते आरती करण्यात आल्यानंतर दुपारी सेवेकरी मंडळीनी मंदिरातील पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याला बाशींग व मुडावळ्या बांधून मुखवटा पालखीत ठेवल्यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात झाली.

पौष महिण्यातील शाकंभरी पौष पौर्णिमेच्या पालखीचा पारंपारिक मान समस्त करंजखेले मळ्याला असतो.मिरवणूकीत करंजखेले,कदम,करंडे,सांडभोर वाळूंज आडनावाचे भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झालेले होते.महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.मिरवणूकीत महिलांनी फुगडी खेळून मिरवणूकीला रंगत आणली.मिरवणूकीत खंडोबाचे वाहन असलेला रुबाबदार अश्व (घोडा)सामील झालेला होता.यावेळी मिरवणूकीत पालखीवर फुलाच्या पाकळ्या,अक्षदा व भंडारा उधळण्यात येत होती.फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.पालखीची मिरवणूक सायंकाळी पावणेपाच वाजता मंदिरात विसावली.मंदिराच्या आवारात देवाच्या लग्न सोहळ्यासाठी आकर्षक मंडपातील सजवलेल्या स्टेजवर नवरदेव म्हाळसाकांत खंडोबाचे महिलांनी ओवाळणी करुन स्वागत केले.त्यानंतर सनई व तुतारीच्या निनादात खंडोबाचा मुखवटा स्टेजवर आणण्यात आला.त्यानंतर सेवेकरी मंडळीनी मुख्य मंदिरातून बांशिंग व मुडावळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेला म्हाळसाईचा मुखवटा मंडपात आणला. सांयकाळी ५ वाजता खंडोबा म्हाळसाईच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली.पाच मंगलाष्टकाच्या गजरात फुलांच्या पाकळ्या व अक्षता भंडारा उधळून वाद्याच्या निनादात व फटाक्याच्या आतषबाजीत सदानंदाचा येळकोट करुन खंडोबा म्हाळसाईचा विवाह सोहळा पार पडला.

त्यानंतर उपस्थित वर्हाडी मंडळीना मोतीचूर लाडूचा प्रसाद देण्यात आला.शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे,बाळू बेरी, मुकुंद क्षिरसागर यांनी केले.
गावागावातुन
देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.
मंचर-
देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

गावागावातुन
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
मंचर-
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.
या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

गावागावातुन
घोडनदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गेले वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
मंचर –
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घोडनदित येत आहे.घोडनदिला अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक शेती पिकांना पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस या परिसरात झाल्याने शेती ,रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पावसाचे पाणी घोड नदीत येत आहे. मीना व घोड नद्यांचे पाणी एकत्र होऊन काठापुर बुद्रुक या ठिकाणावरून पुढे एकत्र जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने निक नदीच्या काठावर असणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बाहेर काढता न आल्याने अनेक पंप हे वाहून जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या नदीच्या काठावर मोटर बसवण्या ऐवजी बॅरलच्या साहाय्याने मोटर हे डायरेक्ट पाण्यावर बसवतो. त्यामुळे विद्युत मोटारी चांगलं प्रमाणात पाणी देतात. परंतु नदीला मागे आठ दिवसापूर्वी पाणी नसल्याने अनेक विद्युत पंप हे नदीमध्ये होते चार दिवसापासून पाऊस सुरू असला तरी डिंभे धरणात पाणी नसल्याने नदीच्या पाणी साठ्यात लगेच वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बाहेर काढल्या नाहीत. आज सकाळ पासून अचानक घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या व नदीत असणाऱ्या अनेक विद्युत पंप मोटारी या पाण्यात वाहून गेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत नदीचे पाणी कमी झाल्याच्या नंतर किती मोटारी वाहुन गेल्या याचा अंदाज लागेल. एकंदर सध्यातरी अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले आहेत.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
