सामाजिक
शिरदाळे घाटात पुन्हा भीषण अपघात ग्रामस्थांकडुन रस्त्याच्या शेजारी सिमेंट कठडे बांधण्याची मागणी.
निरगुडसर प्रतिनिधी-( राजु देवडे)
शिरदाळे ( ता . आंबेगाव ) येथील शिरदाळे धामणी घाटात ( दि.४ ) मध्यरात्री अपघात झाला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून चालक आणि वाहक तसेच बटाटा व्यापारी यात बचावले.
गुळणी ( ता.खेड ) येथून बटाट्याने भरलेला हा टेम्पो श्रीगोंदा या ठिकाणी चाललेला असल्याची माहिती समजत आहे.साधारण मध्यरात्री एकच्या सुमारास बटाट्याने भरलेला टेम्पो शिरदाळे घाटात पलटी झाला.यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक, वाहक तसेच व्यापारी थोडक्यात बचावले अशी माहिती नजीक राहायला असणारे धामणी येथील बाळासाहेब बोऱ्हाडे,विक्रम बोऱ्हाडे,सीमा बोऱ्हाडे यांनी दिली.
गेल्या वर्षभरातील हा तिसरा ते चौथा मोठा अपघात असून शिरदाळे ग्रामपंचायत,धामणी ग्रामपंचायत यांच्या वतीने वारंवार सिमेंट कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून आता पुन्हा दोनही ग्रामपंचायच्या वतीने सबंधित विभागाला निवेदन देण्यात येणार असून कोणाचा जीव जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे का असा संतप्त सवाल धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,शिरदाळे गावच्या सरपंच जयश्री तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
मध्यरात्रीच्या वेळ असताना देखील अपघाताची माहिती सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांना समजताच त्यांचे पती अजित बोऱ्हाडे घटनास्थळी लगेच दाखल होऊन त्यांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी पारगाव येथे दवाखान्यात दाखल केले. त्यातील एकाला गंभीर दुखापत असून दोघांना किरकोळ दुखापत आहे.परंतु वारंवार अपघात होत असताना संबंधित विभागाने याची त्वरित दखल घ्यावी आणि सिमेंट कठडे बसवण्याची मागणी मान्य करून त्वरित काम चालू करावे अशी मागणी शिरदाळे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे.
या रस्त्याचे काम झाल्यापासून या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. शिरदाळे येथील शाळेतील मुलं,महिला मजूर,शेतकरी यांची कायच वर्दळ या रस्त्याला असते आम्ही दोनही ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देणार असून आता तरी दखल घेऊन हे काम मार्गी लावावे.अशी माघणी रेश्मा बोऱ्हाडे सरपंच धामणी यांनी केली आहे.
सामाजिक
वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.
मंचर-
लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त केली असल्याचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांनी सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेस लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील स्व. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई आदर्श शिक्षीका कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी.साठी सुपूर्त केली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येनार आहेत.आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील.यावेळी चंद्रकांत बो-हाडे पाटील उपस्थित होते
सामाजिक
न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

मंचर-
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रक्कम रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले.

यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

सामाजिक
अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अंकिता वाळुंज यांची माघणी.
मंचर-
आंबेगाव तालुक्यातील नागापूर, पारगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी या गावातून जाणाऱ्या ओझर ते रांजणगाव या अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर तसेच चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे काढावीत अशी मागणी अंकिता वाळुंज यांनी केली आहे.
नागापूर पारगाव काठापुर बुद्रुक पोंदेवाडी या गावांमधून ओझर ते रांजणगाव हा अष्टविनायक महामार्ग जातो हा महामार्ग झाल्याच्या नंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे .अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे.त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या परिसरात ऊस तोडणी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक वाढली आहे परंतु या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवर व खालील चारामध्ये अनेक झाडे झुडपे वाढली आहेत हे झाडे झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना वळणाच्या ठिकाणी वाहन काही वेळेस डांबरीच्या खाली घेता येत नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एकंदरीत या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे संबंधित विभागाने काढावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ नागरिक करत आहेत.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन6 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
