Connect with us

मनोरंजन

पोंदेवाडी येथील गडदादेवी यात्रा उत्साहात संपन्न. ३१५ बैलगाडा मालकांचा शर्यतीत सहभाग.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे


पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री गडदादेवी यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत एकुण ३१५ बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. यात्रेच्या पहिल्या दिवशी फळीफोड बैलगाडा नयन वळसे ( निरगुडसर) दुसरा दिवस बाळासाहेब भागाजी टेमगिरे यांचा गाडा फळीफोड ठरला तर घाटाचा राजा पहिला दिवस ज्ञानेश्वर लक्ष्मण पोंदे तर दुसरा दिवस आशिष संतोष बिरदवडे यांनी पटकावला

द्वितीय क्रमांकात प्रथम पंकज म्हातारभाऊ वाळुंज पोंदेवाडी,व भीमराव लंघे ,तृतीय क्रमांकात प्रथम
चक्रधर मित्र मंडळ पारगाव व हर्षद शरद पोखरकर तर फायनलमध्ये प्रथम क्रमांक टू व्हीलरचे मानकरी कृष्णाजी विजय मेरगळ जांबुत व विशाल कोंडीबा खटाके हे गाडे आले.फायनल द्वितीय क्रमांक नयन दिपक वळसे निरगुडसर व संदेश नरहरी गांजवे वळती,फायनल तृतीय क्रमांक साई विवेक पडवळ , शिवाजी महिपती टाकवे जुगलबंदी व सावता महाराज बैलगाडा संघटना शिंगवे यांनी पटकावले.
प्रथम क्रमांक ५४,द्वितीय क्रमांकात१०४ तर,तृतीय क्रमांकात ७९ बैलगाडे आले.


यात्रेची व्यवस्था खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, जयसिंग पोंदे, सुशांत रोडे ,अमोल वाळुंज ,आनंदा पोंदे , नानाभाऊ पोखरकर , संतोष पोखरकर, नितीन पोंदे ,विशाल जाधव. संदेश डुकरे, निलेश दौंड, प्रमोद पोंदे , अमित दौंड यांसह ग्रामस्थांनी पाहिली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मनोरंजन

मंचर येथे ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांचे भव्य स्मारक उभारणार: आमदार दिलीप वळसे पाटील यांची घोषणा.

Published

on

मंचर –
मराठी साहित्यविश्वाचा मानबिंदू आणि ज्येष्ठ कवयित्री कै. शांताबाई शेळके यांच्या स्मृती जपणे हे आपले कर्तव्य असून, त्यांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेल्या मंचर येथील ऐतिहासिक वाड्याच्या जागी त्यांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

​गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंचर येथील शांताबाई शेळके यांचा ऐतिहासिक वाडा अंशतः कोसळला. या घटनेवर दुःख व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “ही केवळ एका जुन्या वास्तूची पडझड नसून मराठी साहित्याच्या एका जिवंत स्मृतीला बसलेला आघात आहे. आंबेगावच्या संस्कारांनी शांताबाईंच्या संवेदनशील मनाला आकार दिला आणि याच मातीतून मराठी साहित्याला असंख्य अजरामर कविता व गीतांची देणगी मिळाली.”



​शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करताना वळसे पाटील भावुक झाले. “महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शांताबाई माझ्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या अध्यापनातील साधेपणा, साहित्यावरील नितांत प्रेम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता मी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे हा वाडा कोसळल्याचे वृत्त समजताच मन हेलावून गेले,” असे त्यांनी सांगितले.

​पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्मृती
​यापूर्वीही अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रेक्षकगृहाला शांताबाई शेळके यांचे नाव देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती. आता त्याच भावनेला पुढे नेत, वाड्याच्या जागेवर स्मारकाची उभारणी करण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

​”हे स्मारक केवळ दगड-विटांची वास्तू नसेल, तर मराठी साहित्याला आयुष्यभर समृद्ध करणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली असेल. शांताबाईंचा शब्दवारसा आणि आंबेगावशी असलेले त्यांचे अतूट नातं पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील,” असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading

गावागावातुन

शिळा बाजार” ठरतोय वळती गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भागयंदा शिळ्या बाजारात झाली लाखोंची उलाढाल.

Published

on

पारगाव :

वळती (ता.आंबेगाव) गावात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली शिळ्या बाजाराची ही परंपरा पिढ्यान्‌पिढ्या जपत ग्रामस्थांनी आजपर्यंत टिकवून ठेवली आहे. आधुनिक काळातही गावच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेला हा शिळा बाजार वळती गावाची खास ओळख ठरत आहे. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा जपत भरवला जाणारा हा शिळा बाजार पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकही आवर्जून उपस्थित राहत आहेत.


पौष पौर्णिमेला नागापूर येथील थापलिंग गडावर दोन दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी वळती गावात हा शिळा बाजार भरतो. पूर्वीचा काळी वळती, नागापूर या दोन गावांची वळती ग्रामपंचायत एकच होती. त्यामुळे थापलिंग देवस्थान हे वळती ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत होते. त्यावेळी वळती गावापासून थापलिंग देवस्थान हे तीन चार किलोमीटर अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना यात्रेला जाण्यासाठी कठीण होते. वळती गावातील काटवान वस्ती, गांजवेवाडी या परिसरातून थापलिंग देवस्थान दूरच्या अंतरावर होते. त्यामुळे थापलिंग गडावर जाण्यापासून अनेक जण वंचित राहत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय टाळण्यासाठी थापलींग गडावरची जिलेबी भजी, शेव रेवडीची हॉटेल , खेळणी, बांगड्यांची दुकाने ही वळती गावात तिसऱ्या दिवशी येऊ लागली. त्यामुळे हा शिळा बाजार सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा बाजार मोठ्या उत्साहात भरतो. आहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील व्यावसायिक येथे दरवर्षी आवर्जून येतात. या बाजारात महिलांची लहान मुलांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
यंदा पै पाहुण्यांना ग्रामस्थांनी जिलेबी -, शेव -रेवडी आग्रहाने खाऊ घातली. महिलांनी संसारपयोगी साहित्य वस्तू खरेदी केल्या. या शिळ्या बाजारात यंदा लाखो रुपयांची उलाढाल झाली.
चौकट : वळती गावात थापलिंग यात्रेचा उत्साह अधिक: थापलिंग यात्रेचा उत्साह वळती गावात पूर्वीपासून अधिकच दिसून येतो. आजही आपली गडावर ओळखीच्या काठी पालख्यांना मोठा मान दिला जातो. सर्व मुंबई, पुणेकर मंडळी आवर्जून या यात्रेसाठी हजेरी लावतात.

वळती (ता. आंबेगाव) गावात शिळ्या बाजाराची आजही परंपरा टिकून आहे.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62