Connect with us

मनोरंजन

आंबेगाव तालुक्यातील नाट्य व भारुड परंपरा जतन करणाऱ्या मंडळांचा स्वराज्य कलाकार महासंघा तर्फे पुरस्कार देऊन सन्मान.

Published

on

मंचर प्रतिनिधी- सध्याच्या दूरचित्रवाणी, यूट्यूब,थेटर, सोशल मीडिया,मोबाईल च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली असतानाही नाटक आणि भारूडाची परंपरा जतन आणि संवर्धन करण्याचे काम आंबेगाव तालुक्यात केले जात असून. नाट्य व भारुड परंपरा जतन करणाऱ्या मंडळांचा सन्मान करून स्वराज्य कलाकार महासंघाने या मंडळाच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली असून. या पुरस्काराच्या माध्यमातून नक्कीच पुढील काळामध्ये ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी नाट्य भारुड मंडळांना प्रेरणा मिळेल व ग्रामीण भागातील नाट्य भारुड चळवळ पुढील काळातही चांगल्या स्वरूपात सुरू राहील असे मत सिने दिग्दर्शक विजय शिंदे यांनी व्यक्त केले.

मंचर (ता.आंबेगाव) या ठिकाणी शरदराव पवार सभागृहामध्ये स्वराज्य कलाकार महासंघाच्या वतीने आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यातील लोककलाकारांचा स्वराज्य कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर अभिनेते काळूराम ढोबळे, सुधाकर पोटे, सीमा पोटे, संस्थेचे अध्यक्ष रामदास करंडे, उपाध्यक्ष हुसेन शेख, गुलाबराव वळसे, कांचन टेके, आदिनाथ थोरात, विशाल करंडे ,शशिकांत वाघ,विजय साळवी, नीलिमा वळसे,नवनाथ वाघ, यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील लोक कलाकारांना व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी आणि लोककलांचे जतन व संवर्धन होण्यासाठी. लोककलाकार यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी. स्वराज्य कलाकार महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील लोककलावंतांचा सन्मान आणि सत्कार व्हावा यासाठी स्वराज्य कलाकार महासंघाने स्वराज्य कलागौरव पुरस्काराचे आयोजन केले होते. यावेळी आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या कार्यरत असनार्या नाटकाची परंपरा जपणाऱ्या नाट्य मंडळांचा व भारुड परंपरा जपणाऱ्या भारुड मंडळांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी लोककलेचे जतन व संवर्धन करण्याचे काम करणाऱ्यासीमा पोटे व सुधाकर पोटे यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी.रामदास सैद,राजेंद्र गुंजाळ, कैलास करंडे,रमेश खुडे,विकास वायाळ,सिद्धेश थोरात,तुषार गावडे,अमित कातळे,निलेश पडवळ,अविनाश वाघ या तालुक्यातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गायन, संगीत,वादन,निवेदन क्षेत्रात काम करणार्या कलाकारांना पुरस्कार देऊन संस्थेच्या वतीने सन्मानीत करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास करंडे, स्वागत नीलिमा वळसे, सूत्रसंचालन विशाल करंडे तर आभार हुसेन शेख यांनी मानले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मनोरंजन

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मंचर येथे जनता दरबार

Published

on

मंचर प्रतिनिधी

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आंबेगाव-शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी जनता दरबार बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी स.१०.०० वा. शरद पवार सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे उपस्थित राहणार आहेत.

आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी स.१०.०० वा. ते दु.०२.०० वा. यावेळेत शरद पवार सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे. या जनता दरबारात विविध शासकीय विभागांचे विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या जनता दरबारात आपले प्रश्न लेखी स्वरुपात सादर करावेत. सदर जनता दरबार कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.

Continue Reading

मनोरंजन

पोंदेवाडी येथील गडदादेवी यात्रा उत्साहात संपन्न. ३१५ बैलगाडा मालकांचा शर्यतीत सहभाग.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे


पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री गडदादेवी यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत एकुण ३१५ बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. यात्रेच्या पहिल्या दिवशी फळीफोड बैलगाडा नयन वळसे ( निरगुडसर) दुसरा दिवस बाळासाहेब भागाजी टेमगिरे यांचा गाडा फळीफोड ठरला तर घाटाचा राजा पहिला दिवस ज्ञानेश्वर लक्ष्मण पोंदे तर दुसरा दिवस आशिष संतोष बिरदवडे यांनी पटकावला

द्वितीय क्रमांकात प्रथम पंकज म्हातारभाऊ वाळुंज पोंदेवाडी,व भीमराव लंघे ,तृतीय क्रमांकात प्रथम
चक्रधर मित्र मंडळ पारगाव व हर्षद शरद पोखरकर तर फायनलमध्ये प्रथम क्रमांक टू व्हीलरचे मानकरी कृष्णाजी विजय मेरगळ जांबुत व विशाल कोंडीबा खटाके हे गाडे आले.फायनल द्वितीय क्रमांक नयन दिपक वळसे निरगुडसर व संदेश नरहरी गांजवे वळती,फायनल तृतीय क्रमांक साई विवेक पडवळ , शिवाजी महिपती टाकवे जुगलबंदी व सावता महाराज बैलगाडा संघटना शिंगवे यांनी पटकावले.
प्रथम क्रमांक ५४,द्वितीय क्रमांकात१०४ तर,तृतीय क्रमांकात ७९ बैलगाडे आले.


यात्रेची व्यवस्था खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, जयसिंग पोंदे, सुशांत रोडे ,अमोल वाळुंज ,आनंदा पोंदे , नानाभाऊ पोखरकर , संतोष पोखरकर, नितीन पोंदे ,विशाल जाधव. संदेश डुकरे, निलेश दौंड, प्रमोद पोंदे , अमित दौंड यांसह ग्रामस्थांनी पाहिली.

Continue Reading

मनोरंजन

आंबेगाव तालुका नाभिक महामंडळाच्या वतीने अशोक क्षीरसागर पेठकर यांचा सन्मान.

Published

on

मंचर प्रतिनीधी –

पेठ (ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका नाभिक महामंडळाच्या वतीने अशोक क्षीरसागर पेठकर तमाशा क्षेत्रातील सर्वोच्च विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर गौरव पुरस्काराने जाहीर झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी सचिन देवडे (अध्यक्ष नाभिक महामंडळ आंबेगाव तालुका) उपाध्यक्ष संतोष बिडवे, सचिव सुनील को-हाळे ,बाबुराव बोराडे,दत्तात्रय क्षिरसागर, गणपतराव क्षिरसागर( मा. सरपंच मंचर)श्री बजरंग देवडे ,रत्नाकर कोऱ्हाळे (अध्यक्ष वधुवर सुचक)कुलस्वामी पतसंस्थेचे सल्लागार श्री.चिंतामण व्हावाळे व नाभिक सामाज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement

Trending