Connect with us

महाराष्ट्र

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग लवकरच रद्दची अधिसुचना निघेल.बाधित शेतकर्यांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती.

Published

on

मंचर प्रतिनिधी

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा व रद्द झाल्याची अधिसुचना राज्य सरकारने काढावी.या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन पुकारले होते.बाधित शेतकर्यांचा विरोध लक्षात घेता.राज्य सरकारच्या वतीने हा महामार्ग रद्द करण्यात आला असुन या अधिसुचनेवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सही झाली असून,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहीसाठी ठेवण्यात आले आहे. अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिली.

मंचर (ता.आंबेगाव) या ठिकाणी पुणे -नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने हा महामार्ग रद्द व्हावा याबाबत चर्चा केली.यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी,समन्वयक वल्लभ शेळके, जी.के.औटी,एम.डी घंगाळे,मोहन नायकोडी,प्रतिक जावळे,काठापूर चे सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, कान्हु करंडे,संपर्क प्रमुख दिलीप जाधव,सुरेश बोरचटे,निवृत्ती करंडे ,हेमंत करंडे,अविनाश हाडवळे,गोविंद हाडवळे उपस्थित होते.

पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाबाबद मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग नाराज होता. बागायती क्षेत्रातुन हा महामार्ग जात असल्याने, मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले होते.त्यामुळे राजुरी या ठिकाणी उपोषण करण्यात आले होते.या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित शेतकर्यांमध्ये नाराजी होती.

सध्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग असताना.व नवीन महामार्गाची काही आवश्यकता नसताना.हा महामार्ग आखण्यात आला होता.परंतु सध्याच्या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे व समांतर रस्ता करण्यात येऊ नये.त्याचप्रमाणे 2013 च्या केंद्र सरकारच्या भुसंपादण कायद्याची जशीच्या तशी अंमलबजावणी करावी. आधी मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारने तोडगा न काढल्यास. बाधित शेतकऱ्यांच्या वतीने बाधित गावांमध्ये, तहसील कचेरी ,तालुक्याचे लोकप्रतिनिधी ,संबंधित मंत्री, यांच्या कार्यालय,व घरांपुढे सविनय पद्धतीने आंदोलन,उपोषण, मुंबई मंत्रालय येथे बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा. आधी उग्र आंदोलन करण्यात येईल.असा ईशारा देण्यात आला होता.

परंतु सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.पुढील आठ दिवसात राज्य सरकारची आधीसूचना निघाली नाही तर आंदोलन अधिक तीव्रतेने पुढे नेले जाईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांनी दिला.


प्रस्तावीत पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी याआधी राजुरी ता.जुन्नर या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांचे नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील नऊ गावांच्या वतीने राजुरी या ठिकाणी उपोषण करण्यात आले होते.यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी. सदर विषय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावला जाईल. असे आश्वासन दिले होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

अवसरी पारगाव जि.प.गट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुमित वाळुंज

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे


अवसरी पारगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वाळुंजनगर येथील सुमीत वाळुंज यांची नुकतीच निवड झाली आहे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आल्याचे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित जाधव, उपाध्यक्ष मयूर सरडे यांनी सांगितले. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यावेळी उपस्थित होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून आगामी निवडणुकांमध्ये युवकांना एकत्र करून पक्षाला बळ देण्याचे काम युवकांच्या मार्फत करणार असल्याचे सुमित वाळुंज यांनी सांगितले.

Continue Reading

देशविदेश

शनिवारी शरदचंद्र पवार आंबेगाव तालुक्यात

Published

on

मंचर प्रतिनिधी

देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री. शरदचंद्र पवार हे शनिवार दि.२० जुलै २०२४ रोजी आंबेगाव शिरुर विधानसभेतील जनतेच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंचर येथे येणार आहेत.
मा. पवार साहेब हे सकाळी १०.०० वा. शासकीय विश्रामगृह तांबडेमळा अवसरी फाटा येथे उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जनतेने दिलेल्या घवघवीत मताधिक्यामुळे पवार साहेब आभार मानण्यासाठी येत आहेत.
त्याचप्रमाणे पवार साहेब आंबेगाव तालुक्यात आल्यानंतर काय बोलतात याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

यावेळी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील उपस्थित राहणार आहेत. शासकीय विश्रामगृह अवसरी फाटा तांबडे मळा याठिकाणी सकाळी १०.०० ते दु.१२.०० यावेळेत जनतेच्या समस्या समजुन घेतील. यानिमित्ताने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.

Continue Reading

गावागावातुन

भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२२-२३ करीता “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


“देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना श्री. बाळासाहेब बेंडे म्हणाले की, पुरस्कारांचे मुल्यांकन करण्यासाठी ११ सदस्यांच्या तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यात केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्याशिवाय मुख्य संचालक, राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ नवी दिल्ली, उप संचालक (साखर) नवी दिल्ली, संचालक राष्ट्रीय साखर संस्था, कानपुर, महासंचालक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, गुजरात, तामिळनाडू या राज्यांच्या साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे ऑगस्टमध्ये होणार आहे.


महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.


कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” ६ वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे मा. संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending