शेतीशिवार
अवकाळीपावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
Warning: Trying to access array offset on false in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
&description=अवकाळीपावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
Warning: Trying to access array offset on false in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
&description=अवकाळीपावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर प्रतिनिधी
अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवली असुन. पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी प्लास्टिक कागद ,ताडपत्री खरेदी करून कांदा झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर दुकानांमध्ये गर्दी होत असुन 160 ते 180 रुपये किलो दराने कागद खरेदी करावा लागत आहे.
आंबेगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवली असून कांदा झाकण्यासाठी शेतकरी वर्ग प्रयत्न करत आहे.कांदा झाकण्यासाठी प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री खरेदी करण्यासाठी मंचर, पारगाव या ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.हा पांढरा कागद 120 ते 140 रुपये किलो तर ताडपत्री कलर मधला कागद 160 ते 180 रुपये किलो.या दराने खरेदी करावा लागत आहे. कागद खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड ऊडालेचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.सध्या कांद्याला नसणारा बाजार भाव वाढत असलेला भांडवली खर्च त्यातच अवकाळी पाऊस त्यामुळे खरेदी करावा लागणारे कागद, त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान. या सर्व गोष्टीत शेतकरी वर्ग पिचला असून कांद्याची निर्यात सुरू करावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
गावागावातुन
घोडनदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गेले वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
मंचर –
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घोडनदित येत आहे.घोडनदिला अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक शेती पिकांना पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस या परिसरात झाल्याने शेती ,रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पावसाचे पाणी घोड नदीत येत आहे. मीना व घोड नद्यांचे पाणी एकत्र होऊन काठापुर बुद्रुक या ठिकाणावरून पुढे एकत्र जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने निक नदीच्या काठावर असणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बाहेर काढता न आल्याने अनेक पंप हे वाहून जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या नदीच्या काठावर मोटर बसवण्या ऐवजी बॅरलच्या साहाय्याने मोटर हे डायरेक्ट पाण्यावर बसवतो. त्यामुळे विद्युत मोटारी चांगलं प्रमाणात पाणी देतात. परंतु नदीला मागे आठ दिवसापूर्वी पाणी नसल्याने अनेक विद्युत पंप हे नदीमध्ये होते चार दिवसापासून पाऊस सुरू असला तरी डिंभे धरणात पाणी नसल्याने नदीच्या पाणी साठ्यात लगेच वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बाहेर काढल्या नाहीत. आज सकाळ पासून अचानक घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या व नदीत असणाऱ्या अनेक विद्युत पंप मोटारी या पाण्यात वाहून गेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत नदीचे पाणी कमी झाल्याच्या नंतर किती मोटारी वाहुन गेल्या याचा अंदाज लागेल. एकंदर सध्यातरी अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले आहेत.
गावागावातुन
मुसळधार पावसाचा फटका पोंदेवाडी येथील पोखरकर दौंड वस्तीला बसला पाण्याचा वेढा.
मंचर-
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पोंदेवाडी येथील पोखरकर दौंड वस्तीला बसला असून पोखरकर दौंड वस्तीतील अनेक घरांना पाण्याने वेढा घातला असून प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पंचायत समिती सदस्या अंकिता अनिल वाळूंज यांनी सांगितले.

मागील चार दिवसापासून आंबेगाव तालुक्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे.सर्वत्र पडणाऱ्या या पावसाने ओढे नाले तुडुंब भरले आहेत.तर शेतातील पिके खराब झाली आहेत.अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून माती वाहून गेली आहे.
पोंदेवाडी या ठिकाणीही माघील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाल्याने. हे पाणी वाहत आहे. सध्या काठापुर पोंदेवाडी या रस्त्याचे काम झाल्याने रस्त्याची उंची वाढली आहे.तसेच रस्त्याच्या कडेला असणारे चर बुजल्याने पाणी तुंबले त्यामुळे पूर्वी रस्त्यावरून वाहून जाणारे पाणी हे वाहून जात नाही. तसेच चर तुंबल्याने तेथुनही पाणी जात नाही व रस्त्याला असणाऱ्या मोर्यांमधे हे पाणी बसत नाही.त्यामुळे एकंदरीतच सध्या.पाण्याला अडथळा आल्याने व पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या पाण्याने पोखरकर दौंड वस्तीतील घरांना पाण्याने वेढले आहे.याची प्रशासनाने दखल घेऊन भविष्यात पाणी तुंबले जानार नाही याची दखल घ्यावी अशी मागणी माजी सरपंच बबनराव वाळूंज यांनी केली आहे.

सदर ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी अर्चना कोंढावळे यांनी भेट देऊन पाहणी केली सदर चर उकरुन पाणी काढुन देण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असल्याचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले .
गावागावातुन
घोडनदीला पुर बेल्हा जेजुरी महामार्ग बंद लाखनगाव येथील घोडनदीवरील पुल पाण्याखाली वाहतूक ठप्प.
मंचर-
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असल्याने घोडनदी दुधडी भरून वाहत असून बेल्हा जेजुरी महामार्गा वरील लाखनगाव ता. आंबेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
आंबेगाव तालुक्याचे पूर्व भागातून बेल्हा जेजुरी हा महामार्ग जातो हा महामार्ग लाखनगाव या ठिकाणी घोड नदीवरून जातो या ठिकाणी असणार्या जुण्या पुलावरूनच वाहतूक होत असते.घोड नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाढले की हा पूल पाण्याखाली जातो व बेल्हा जेजुरी महामार्गाची वाहतूक ठप्प होते.सध्या हा पुल पाण्याखाली गेला असून वाहतूक पर्याय मार्गाने वाळवण्यात आली आहे.
लाखनगाव या ठिकाणी शासनाच्या वतीने नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे परंतु गेली अनेक वर्ष हा पुल अपूर्ण अवस्थेत असल्याने वाहतूक जुन्या पुलावरूनच होत असते. त्यामुळे पावसाळ्याच्या कालखंडात अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक ठप्प होते. शासनाच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या रस्त्याची कामे केली जात आहेत.परंतु काही ठिकाणी थोडेसे कामे बाकी राहतात व त्याचा फटका संपूर्ण रस्त्यालाच बसतो. लाखनगाव या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी नवीन पूलाचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे.परंतु पूर्ण होत नाही.त्यामुळे पावसाळ्याच्या कालखंडात आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यावर घोड नदीला पाणी वाढले की लाखनगाव येथील पुल पाण्याखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते. अनेक वेळा डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यावरही हा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होते.त्यामुळे एकंदरीतच सध्या बेल्हा जेजुरी महामार्गावर पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये या ठिकाणचा नवीन पुल त्वरित पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालक करत आहेत.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
