सामाजिक
अवसरी खुर्द च्या जोगेश्वरी महिला बचत गटाच्या वतीने पहाडदऱ्यातील आदिवासी महिलांना थंडीच्या दिवसात ब्लॅकेटचे वाटप करून दिली मायेची ऊब
निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे
पहाडदरा ( ता. आंबेगाव) येथील ठाकरवाडीतील आदिवासी ठाकर समाजातील महिलांच्यामध्ये जाऊन हळदी कुंकवाचे आयोजन करून अवसरी खुर्द (ता. आंबेगाव )येथील जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांनी एकूण १०० आदिवासी महिलांना थंडीच्या दिवसात ब्लॅकेटचे वाटप समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
अवसरी खुर्द येथील जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत ठाकरवाडीत जाऊन दुसऱ्यांच्या शेतावर रोजंदारीने कामावर जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन केले होते.यावेळी १०० महिलांना थंडीच्या दिवसात उपयोगी पडणारे ब्लॅकेट वाटप करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
त्याचबरोबर पौष्टिक राजगिरा लाडुचे पाकीट वाण म्हणून दिले यावेळी धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उद्योजिका मोनिका करंजखेले, पहाडदऱ्याच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सविता वायकर उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे नियोजन जोगेश्वरी बचत गटाच्या अध्यक्षा निर्मला बिडकर, सचिव रेश्मा शिंदे, प्रतिभा खेडकर, सुषमा भोर, भाग्यश्री बिडकर, स्वाती पवार, जया शिंदे, राजश्री शिंदे, प्रमिला शिंदे, राजश्री ढेपे, प्रियंका टेमकर, साक्षी शिंदे यांनी केले होते.
गावागावातुन
आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पारगाव पोलीसांचा रूट मार्च
लोणी धामणी प्रतिनिधी -राजु देवडे
पारगाव (कार खाना) पोलीस स्टेशन कडून आगामी विधानसभा २०२४ निवडणुकाच्या अनुषंगाने पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव, शिंगवे, निरगुडसर, नागापूर या गावांमध्ये रूट मार्च घेण्यात आला. विधानसभा निवडणुका काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
यावेळी पारगाव कारखाना पोलीस ठाणे कडील 3 अधिकारी 20 महिला /पोलीस अमलदार व BSF यांची एक कंपनी सदर रुट मार्च मध्ये सहभाग असल्याचे पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे स.पो.नि. नेताजी गंधारे यांनी सांगितले.
गावागावातुन
जवळे येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न
निरगुडसर प्रतिनिधी – प्रमोद दांगट
जवळे तालुका आंबेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात २ ऑक्टोबर राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त ग्रामपंचायत जवळे यांनी ग्रामपंचायत समोरील परिसरची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे स्वच्छ माझे अंगण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रम राबविण्यात आला या मध्ये शासनाने दिलेल्या स्वच्छते विषयीच्या नियम अटींमध्ये बसणाऱ्या महिला भगिनींचा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला.
यात ७ महिलांची निवड करण्यात आली यामध्ये वैशाली वायकर, सुशीला गभाले, सुशीला लोखंडे ,जयश्री शिंदे, छाया लायगुडे, मंदा टाव्हरे, इंदुबाई पवार यांचा आदर्श सरपंच सौ वृषाली शिंदे पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ ,सन्मानपत्र व डसबिन देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपसरपंच मनीषा टाव्हरे, दत्तात्रय लायगुडे, भीमाशंकर संचालक बाबासाहेब खालकर, विकास सोसायटीचे चेअरमन रमेश भुजबळ, जालिंदर लायगुडे ,पोपट लायगुडे सुरेश गावडे, नारायण खिलारी, रामा बोराटे, अशोक लोखंडे, उत्तम बोराटे, रामा पवार पंढरी टाव्हरे अशोक ताजणे या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती ग्रामसेविका शिला साबळे यांनी दिली.
गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथील श्वेता करंडे पि.एस.आय.परीक्षेत यशस्वी
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सन 2022 च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन. यामध्ये काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील कु. श्वेता शालन सुखदेव करंडे उत्तीर्ण झाली असून.ती काठापुर बुद्रुक गावातील पहिली महिला अधिकारी आहे. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबातील कु.श्वेता सुखदेव करंडे राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या 2022 च्या पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.ग्रामीण भागात राहुल खडतर प्रयत्न करून श्वेताने हे यश मिळवले आहे. त्यामुळे संपूर्ण गावामधून तिचे कौतुक होत आहे.काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा झाप येथे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण झाले.त्यानंतर आठवी ते 10 वी चे शिक्षण संगमेश्वर विद्यालय पारगाव,तर 11 व 12 वी चे शिक्षण विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक,येथे झाले.तर दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान, त्यानंतर दिलीपराव वळसे पाटील सीनियर कॉलेज निमगाव सावा या ठिकाणी द्वितीय व तृतीय वर्षाचे विज्ञान शाखेतुन शिक्षण घेतले. 2018 साली पदवी प्राप्त केली.त्याआधीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. घरीच हा अभ्यास तिने केला.
मागील काही दिवसापासून शिरुर येथील ज्ञानसागर अभ्यासीके लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करून यश मिळवले.तिला अभ्यासात शिवाजी शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.याआधी दोन मार्काने तिला अपयश आले होते.परंतु खचुन न जाता तिने यश मिळवले आहे. शेतकरी आई वडील अशी कौटुंबिक परिस्थिती असताना मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांना मार्गदर्शक ठरणारा आहे. स्वेताचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
-
गावागावातुन3 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन3 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन5 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन5 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
महाराष्ट्र12 months ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
मनोरंजन12 months ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
सामाजिक11 months ago
शिरदाळे घाटात पुन्हा भीषण अपघात ग्रामस्थांकडुन रस्त्याच्या शेजारी सिमेंट कठडे बांधण्याची मागणी.