Connect with us

गावागावातुन

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान ,नुकसानग्रस्त गावांना माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील यांची भेट, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन.

Published

on


मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना काल पावसाने झोडपले अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावस झाला.त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषी व महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


यावेळी आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,स.पो.नी.सचिन कांडगे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, बाजार समिती सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अजय आवटे, महेंद्र वाळूंज व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

  यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, पूर्व आंबेगावत  काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा.

शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

पारगाव,दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा

Published

on

मंचर –
पारगाव ता.आंबेगाव तालुक्यातील पारगाव,दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या पूर्वेला राहणाऱ्या संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मुक्कामासाठी असलेल्या बापू शिंदे व बबन शिंदे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला होता.बिबट्याच्या या हल्यात दीड वर्षीय घोडीचा मृत्यू झाला होता.

या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली होती.या मागणीला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत घटनास्थळी पिंजरा लावला आहे.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, संतोष ढोबळे, वन विभाग कर्मचारी अशोक जाधव, रामदास वळसे उपस्थित होते.

मागणीची तत्काळ दखल घेतल्याबद्दल वनविभागाच्या वन मंडळ अधिकारी नीलम चव्हाण यांचे ग्रामस्थानी आभार मानले आहेत.

Continue Reading

गावागावातुन

घोडीवर बिबट्याचा हल्ला हल्यात घोडीचा मृत्यू .मेंढपाळ शिंदे त्यांचे आर्थिक नुकसान.

Published

on

मंचर-

पारगाव (ता.आंबेगाव) येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पुर्व बाजूलाच संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मेंढपाळ हे मुक्कामी साठी होते.रात्री ठीक २.३० च्या सुमारास बापू शिंदे व बबन शिंदे यांच्या दीड वर्षाच्या घोडीवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात घोडीचा जागीच मृत झाला आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली आहे.

यावेळी शेतकरी संतोष ढोबळे,बापु शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.मोरगाव सुपा (बारामती) येथील बापू शिंदे आणि बबन शिंदे हे दोघे बंधू असून हे गेल्या अनेक वर्षांपासून पारगाव परिसरात मेंढ्या पालन कररत असुन येथे वास्तव्यास आहेत.सदर ठिकाणी वनरक्षक पुजा कांबळे यांनी भेट देऊन पंचनामा केला असुन मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दत्तात्रय वळसे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

Published

on

मंचर –
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, (दादा) यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर स्मारकस्थळी व भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका प्रिया बाणखेले, जनरल मॅनेजर शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, किशोर तिजारे, दिलीप कुरकुटे, प्रतापसिंह सावंत, सुरेश शिंदे, अमीर पठाण, ब्रिजेश लोहोट, अनिल बोंबले, कैलास गाढवे, बी.डी.चव्हाण, नाथा मोकाटे, वसंत जाधव, कामगार व शिक्षक वृंद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांच्याबाबत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दादांनी आयुष्यभर जनसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य केले. दुष्काळी परीस्थितीशी झुंजणा-या आंबेगाव तालुक्यात शिक्षण, सहकार, सिंचन आणि पायाभूत सुविधांची जी विकासदृष्टी त्यांनी रुजवली त्याच विचारामधून आजचा प्रगत तालुका घडताना दिसतो. दादांची कार्यपद्धती, लोकांशी जोडलेली नाळ आणि समाजकारणाकडे पाहण्याची सर्वसमावेशक भूमिका हे आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांनी जपलेली विकासाची आणि जनसेवेची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

‌स्मारकस्थळी अभिवादन करताना व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, मा. संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63

Warning: file_get_contents(https://pbn-ph.website/data/bl.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63