शैक्षणिक
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/04/IMG-20260330-WA0069-1000x600.jpg&description=टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/04/IMG-20260330-WA0069-1000x600.jpg&description=टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">

मंचर-
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.

टाटा मोटर्स (बिकन) व पर्यावरण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून नुकताच ग्रीन स्कूल अवार्ड (हरित शाळा) २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.पुणे या ठिकाणी टाटा मोटर्सचे पदाधिकारी सिताराम कांडी, सुनील तिवारी,निरज अग्रवाल, सतीश आवटे,पुजा शेळकंदे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारी व खाजगी शाळांसाठी हरित शाळा २०२५ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळा गटामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर १५९ सरकारी शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.यातील अंतिम पाच शाळांची निवड करून त्यांना एक ते पाच क्रमांक देण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापुर बुद्रुक या शाळेतने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, उत्तम वाव्हळ, दिनेश तूळे,निलीमा वळसे,कवीता कोठावळे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर शेटे, राजू जोरी व विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. शाळेने शाळा व परिसरामध्ये केलेली वृक्ष लागवड, पर्यावरणीय रक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी नियोजन,शुद्ध पाणी,बगीचा,यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांचे अवलोकन करून पारितोषिक देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातुन काठापुर बुद्रुक ही एकमेव शाळा या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली.गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, व गावातील विविध संस्थांच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 135 शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप.
मंचर-
पोंदेवाडी ता आंबेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात व पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले, यावेळी दप्तर तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर,अमोल वाळुंज,आनंदा पोंदे,निलेश मांजरे,अशोक दुगड,शिवराम पोखरकर,शिक्षक अनिल गावडे,आप्पासाहेब इखे,अर्जुन महाराज वाळुंज यांसह ग्रामस्थ तसेच दोन्हीही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
राजकीय
काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.
मंचर-
सध्या देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. यावेळी शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शालेय मुख्यमंत्री पदासाठी दोन उमेदवार उभे होते.तर वर्गानुसार उमेदवार उभे होते. सहावी इयत्तेतुन दोन जागेसाठी चार विद्यार्थी उभे होते. पाचवी इयत्तेतुन दोन जागेसाठी पाच विद्यार्थी उमेदवार उभे होते. चौथी मध्ये एका जागेसाठी तीन, तिसरी मध्ये एका जागेसाठी चार तर दुसरी मध्ये एका जागेसाठी सहा विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यावेळी फोटो सहित विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीतील नावासमोर सही करुन डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावता. यावेळी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रामध्ये एक मतदार केंद्र अधीकारी, तीन मतदान अधिकारी,दोन उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
यावेळी दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान कक्ष बनवण्यात आले होते. मतदार केल्यावर एका ठिकाणी मतदान पेटित मतपत्रिका विद्यार्थ्यांनी टाकल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षक उत्तम वाव्हळ, नीलिमा वळसे पाटील, कविता कोठावळे,मुक्ता कौसे,प्राची शिंदे यांनी माहिती देऊन भारतीय लोकशाहीसाठी मतदान किती महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मतदान झालेल्या मतपत्रिकांवरील मतांची मोजणी होऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांमधून विजयी उमेदवारांमधून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
शैक्षणिक
लाखनगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांजकडून साऊंड सिस्टिम भेट.
मंचर-
लाखनगाव ता.आंबेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांनी पन्नास हजार रुपये किमतीचे चार्जेबल साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले

यावेळी मुख्याध्यापक अनिल देसले, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे, उपाध्यक्ष प्रदीप रोडे, विजय कानसकर उपस्थित होते.
यावेळी लाखनगाव येथील माध्यमिक विद्यालयास भविष्यकाळातही भरीव मदत करणार असल्याचे उद्योजक सागर दांगट यांनी सांगितले.

उद्योजक सागर दांगट यांजकडून साउंड सिस्टीम भेट.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
