Connect with us

गावागावातुन

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान ,नुकसानग्रस्त गावांना माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील यांची भेट, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन.

Published

on


मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना काल पावसाने झोडपले अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावस झाला.त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषी व महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


यावेळी आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,स.पो.नी.सचिन कांडगे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, बाजार समिती सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अजय आवटे, महेंद्र वाळूंज व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

  यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, पूर्व आंबेगावत  काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा.

शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

पोंदेवाडीत शेतकरी बचत गटाला कृषी विभागाच्या वतीने संकरित बाजरीचे बी बियाण्याचे वाटप.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील शेतकरी बचत गटाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग घोडेगाव, यांच्या वतीने संकरित हायब्रीड बाजरीचे बी बियाण्याचे वाटप पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते व सहाय्यक कृषी अधिकारी विकास गवई,प्रवीण मिरके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी पहाडदरा,वाळुंजनगर शिरदाळे,खडकवाडी,लोणी,रानमळा मांदळेवाडी वडगावपीर पोंदेवाडी या गावांमध्ये बाजरीच्या बी बियाण्याचे वाटप करण्यात आले.पोंदेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी आंबेगाव तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले.यावेळी ७५ शेतकऱ्यांना प्रत्येकी दिड किलो याप्रमाणे बाजरी बियाणे देण्यात आले.यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर, अमोल वाळुंज, अर्जुन महाराज वाळुंज, आनंदा पोंदे, चंद्रकांत विरकर ,राहुल घोलप, स्वामी घोलप, मंगल जाधव ,पुष्पा लंके यांसह स्थानिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
नुकताच पूर्व भागामध्ये पावस चांगला झाल्यामुळे, सदर बियाण्यांचे पेरणी अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

Continue Reading

गावागावातुन

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला.

Published

on

मंचर –

सध्या पावसाने ओढ दिली असून. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज रोडेवाडी पोंदेवाडी लाखनगाव सविंदणे परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असुन पावसाला असंच सर्वत्र वर्षाव व्हावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान रोडेवाडी फाटा पोंदेवाडी लाखनगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून.असाच पाऊस अनेक ठिकाणी पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मागे अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पडणारे ऊन.त्याचप्रमाणे जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नसल्याने उभी पिके जळु लागली होती. नदी व कालव्याचे पाणी सुद्धा बंद केल्याने शेती संकटात आली होता.

अशा परिस्थितीत पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आज झालेल्या पावसाने रोडेवाडी पोंदेवाडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून असाच जोरदार पाऊस महाराष्ट्रात बरसावा अशी अपेक्षा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी व्यक्त केली.

Continue Reading

गावागावातुन

लाखनगाव येथील आरोग्य केंद्र लवकर सुरू होनार पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज प्रयत्नांना यश.

Published

on

मंचर –

लाखनगाव ता.आंबेगाव या ठिकाणी गेली अनेक दिवस किरकोळ काम रखडल्याने सुरु न झालेले आरोग्य केंद्र लवकर सुरू व्हावे ही मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी लावुन धरल्याने बांधकाम विभाग जिल्हा परिषद चे डेप्युटी इंजिनिअर परदेशी साहेब जोशी साहेब यांनी आरोग्य उपकेंद्राला भेट दिली देऊन उपकेंद्राची पाहणी केली व सदरचे उपकेंद्र हे पंधरा दिवसात लोकांसाठी सुरू होईल अशी माहिती दिली.

लाखनगाव ता.आंबेगाव येथे माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून एक कोटी रुपयांचे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले होते,या आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे परंतु काही किरकोळ काम बाकी आहे,सदर ठेकेदाराने शिरूर माघील अनेक दिवसांपासून काम करण्यास टाळाटाळ करत आहे,या गोष्टीचा स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज यांनी गेल्या महिन्याभरात तीन वेळा सदर उपकेंद्राला भेट दिली व त्या संदर्भात आदरणीय दिलीप वळसे पाटील व विवेक वळसे पाटील यांना सदरचा विषय सांगितल्यानंतर पुढील कार्यवाही होऊन बांधकाम विभाग जिल्हा परिषद चे डेप्युटी इंजिनिअर परदेशी साहेब व जोशी साहेब अंकिता वाळुंज यांनी स्थानिक ग्रामस्थान समवेत या आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन संपूर्ण उपकेंद्राची पाहणी केली व सदरचे उपकेंद्राचे राहीलेले काम पंधरा दिवसां पुर्ण होईल अशी माहिती दिली.त्यामुळे पंधरा दिवसांनंतर स्थानिक जनतेसाठी या आरोग्य उपकेंद्राचा लाभ होईल.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व विवेक वळसे पाटील व अंकिता वाळुंज यांचे आभार मानले.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62
zippyprice brain song