सामाजिक
वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/03/IMG-20260223-WA0045-1000x600.jpg&description=वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/03/IMG-20260223-WA0045-1000x600.jpg&description=वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर-
लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त केली असल्याचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांनी सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेस लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील स्व. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई आदर्श शिक्षीका कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी.साठी सुपूर्त केली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येनार आहेत.आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील.यावेळी चंद्रकांत बो-हाडे पाटील उपस्थित होते
मनोरंजन
मंचर येथे ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांचे भव्य स्मारक उभारणार: आमदार दिलीप वळसे पाटील यांची घोषणा.
मंचर –
मराठी साहित्यविश्वाचा मानबिंदू आणि ज्येष्ठ कवयित्री कै. शांताबाई शेळके यांच्या स्मृती जपणे हे आपले कर्तव्य असून, त्यांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेल्या मंचर येथील ऐतिहासिक वाड्याच्या जागी त्यांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंचर येथील शांताबाई शेळके यांचा ऐतिहासिक वाडा अंशतः कोसळला. या घटनेवर दुःख व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “ही केवळ एका जुन्या वास्तूची पडझड नसून मराठी साहित्याच्या एका जिवंत स्मृतीला बसलेला आघात आहे. आंबेगावच्या संस्कारांनी शांताबाईंच्या संवेदनशील मनाला आकार दिला आणि याच मातीतून मराठी साहित्याला असंख्य अजरामर कविता व गीतांची देणगी मिळाली.”

शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करताना वळसे पाटील भावुक झाले. “महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शांताबाई माझ्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या अध्यापनातील साधेपणा, साहित्यावरील नितांत प्रेम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता मी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे हा वाडा कोसळल्याचे वृत्त समजताच मन हेलावून गेले,” असे त्यांनी सांगितले.
पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्मृती
यापूर्वीही अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रेक्षकगृहाला शांताबाई शेळके यांचे नाव देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती. आता त्याच भावनेला पुढे नेत, वाड्याच्या जागेवर स्मारकाची उभारणी करण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
”हे स्मारक केवळ दगड-विटांची वास्तू नसेल, तर मराठी साहित्याला आयुष्यभर समृद्ध करणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली असेल. शांताबाईंचा शब्दवारसा आणि आंबेगावशी असलेले त्यांचे अतूट नातं पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील,” असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
सामाजिक
शिरुर मंचर घोडेगाव या गावांमध्ये प्रवाशांची ने आन करणारी एस.टी. बस पुर्ववत सुरू करावी. पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांची मागणी.
मंचर-
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील तालुक्याचे व महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या शिरुर मंचर घोडेगाव या गावांमध्ये प्रवाशांची ने आन करणारी राज्य परिवहन महामंडळाची बस पोंदेवाडी काठापूर बुद्रुक रस्त्याचे काम सुरू असल्याने बंद झाली होती.सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून एस.टी.बस पुर्ववत सुरू करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांनी शिरुर एस.टी.आगाराकडे पत्राव्दारे केली असुन पुन्हा ही बस पुर्वीच्या मार्गाने सुरू करावी अशी मागणी केली आहे.जेणेकरून विद्यार्थी व ग्रामस्थांनी सोय होईल.
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील तालुक्याचे व महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या शिरुर मंचर घोडेगाव या गावांमध्ये प्रवास करणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गेली अनेक वर्षे सुरू आहे ही बस सकाळी शिरूर येथुन निघुन शिरुर आण्णापुर मलठण कवठे सविंदणे लोणी पोंदेवाडी कारखाना पारगाव अवसरी मंचर व पुढे घोडेगाव साठी जात होती व पुन्हा या गावांतुन परतीचा प्रवास करायची या बसमुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांना ये जा करताना उपयोग व्हायचा परंतु मागील दोन महिन्यांपासून पोंदेवाडी काठापूर बुद्रुक रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता.त्यामुळे ही बस बंद झाली होती.
परंतु सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून एस.टी.बस पुर्ववत या मार्गाने पुन्हा सुरू करावी अशी मागणी पंचायत समितीच्या सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी शिरुर एस.टी.आगाराकडे केली असुन. पुन्हा ही बस पुर्वीच्या मार्गाने सुरू करावी अशी मागणी केली आहे.जेणेकरून विद्यार्थी व ग्रामस्थांनी सोय होईल.सदर
शेतीशिवार
भीमाशंकरकडून खोडवा उस अनुदानाची रक्कम बॅंकेत वर्ग.
मंचर-
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक आ.दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या.

मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या खोडवा उसास रु.१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अनुदान देण्याचे ठरलेनुसार १ लाख ८ हजार ७०२ मे.टनास रक्कम रु. १ कोटी ८ लाख ४० हजार ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

कारखान्याने यापुर्वी गाळप केलेल्या ऊसास एफ.आर.पी.प्रमाणे रु. ३२७३/- प्रती मे.टनाप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. तसेच जाहीर केल्याप्रमाणे सन २०२५-२६ गाळप हंगामात गाळपास आलेल्या खोडवा ऊसाकरीता रु. १००/- प्रति मे.टन अनुदानाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामुळे सभासद व ऊस उत्पादकांना ऊस लागवड व मशागतीस मदत होणार असून ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत तर दिलेलीच आहे त्याशिवाय भीमाशंकर कारखान्याने आजपर्यंत सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२६-२७ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
