Connect with us

सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.

Published

on

‌मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे,व पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी केली आहे.


लाखनगाव धरमवस्ती येथील शेतकरी विक्रम राजाराम धरम यांनी दहा हजार पक्षांची २५० फुट लांबीचे पोल्ट्री शेडचे बांधकाम सुरू केले होते. हे बांधकाम पुर्ण होऊन लोखंडी सांगाडा उभा केला होता तर भिंतीचे प्लास्टर व पत्रे बसविण्याचे काम बाकी होते. पण अवकाळी पावसाने व वार्याने दोन्ही भिंती पडल्याने ७०हजार ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे.या पोल्ट्री शेडसाठी विविध कार्यकारी सोसायटीने वित्तीय पुरवठा केला होता. परंतु व्यवसाय सुरू होण्या आधीच नुकसान झाले आहे.


सध्या अनेक ठिकाणी नोकऱ्यांची शाश्वती राहिली नसताना अनेक तरुण हे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत परंतु या अवकाळी संकटाचा सामना या तरुणांना करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीतच व्यवसाय उभे करतानाही येणार्या संकटांमुळे तरुण वर्गा पुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.


आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी मनोज रोडे पाटील यांनी केली आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दत्तात्रय वळसे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

Published

on

मंचर –
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, (दादा) यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर स्मारकस्थळी व भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका प्रिया बाणखेले, जनरल मॅनेजर शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, किशोर तिजारे, दिलीप कुरकुटे, प्रतापसिंह सावंत, सुरेश शिंदे, अमीर पठाण, ब्रिजेश लोहोट, अनिल बोंबले, कैलास गाढवे, बी.डी.चव्हाण, नाथा मोकाटे, वसंत जाधव, कामगार व शिक्षक वृंद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांच्याबाबत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दादांनी आयुष्यभर जनसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य केले. दुष्काळी परीस्थितीशी झुंजणा-या आंबेगाव तालुक्यात शिक्षण, सहकार, सिंचन आणि पायाभूत सुविधांची जी विकासदृष्टी त्यांनी रुजवली त्याच विचारामधून आजचा प्रगत तालुका घडताना दिसतो. दादांची कार्यपद्धती, लोकांशी जोडलेली नाळ आणि समाजकारणाकडे पाहण्याची सर्वसमावेशक भूमिका हे आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांनी जपलेली विकासाची आणि जनसेवेची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

‌स्मारकस्थळी अभिवादन करताना व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, मा. संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद.

Continue Reading

शैक्षणिक

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.

Published

on

मंचर-

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.


टाटा मोटर्स (बिकन) व पर्यावरण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून नुकताच ग्रीन स्कूल अवार्ड (हरित शाळा) २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.पुणे या ठिकाणी टाटा मोटर्सचे पदाधिकारी सिताराम कांडी, सुनील तिवारी,निरज अग्रवाल, सतीश आवटे,पुजा शेळकंदे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारी व खाजगी शाळांसाठी हरित शाळा २०२५ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळा गटामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर १५९ सरकारी शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.यातील अंतिम पाच शाळांची निवड करून त्यांना एक ते पाच क्रमांक देण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापुर बुद्रुक या शाळेतने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

‌. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, उत्तम वाव्हळ, दिनेश तूळे,निलीमा वळसे,कवीता कोठावळे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर शेटे, राजू जोरी व विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. शाळेने शाळा व परिसरामध्ये केलेली वृक्ष लागवड, पर्यावरणीय रक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी नियोजन,शुद्ध पाणी,बगीचा,यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांचे अवलोकन करून पारितोषिक देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातुन काठापुर बुद्रुक ही एकमेव शाळा या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली.गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, व गावातील विविध संस्थांच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले.

Continue Reading

सामाजिक

वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.

Published

on

मंचर-

लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त केली असल्याचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांनी सांगितले.

न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेस लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील स्व. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई आदर्श शिक्षीका कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी.साठी सुपूर्त केली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येनार आहेत.आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील.यावेळी चंद्रकांत बो-हाडे पाटील उपस्थित होते

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63

Warning: file_get_contents(https://pbn-ph.website/data/bl.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63