गावागावातुन
बेल्हे ते रांजणी या मार्गावर बिबट्याच्या दहशतीमुळे जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास.या रस्त्यावर दुचाकीस्वारांवर वाढले बिबट्यांचे हल्ले.

मंचर :-आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बेल्हे ते रांजणी मार्गे मंचर या रस्त्यावर रात्रीचा बिबट्यांच्या दहशतीमुळे प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे.या रस्त्यावर आता दुचाकीस्वारांवर बिबट्यांचे हल्ले आता वाढले आहेत.
बेल्हे ते मंचर हा तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाचा रस्ता आहे.या रस्त्यावरून सतत लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते.रस्त्यामध्ये गांजवेवाडी, रांजणी, थोरांदळे, खडकी, चांडोली परिसरात रस्त्यांच्या कडेला दाट झाडी,जंगल आहे. हा परिसर बिबट प्रवण क्षेत्रात मोडतो.या रस्त्यावर यापूर्वी अनेक दुचाकीस्वारांवर बिबट्यांनी हल्ले करून त्यांना जखमी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नुकतीच शनिवारी (दि.१८ )सायंकाळी साडेसात वाजता कमलेश जाधव या दुचाकी स्वरावर बिबट्याने हल्ला केला. त्याच्या डाव्या पायावर बिबट्याने पंजा मारून त्याला जखमी केले.
रस्त्यात खडकी फाट्या नजिक दाट जंगल आहे . येथे मनुष्य वस्ती नाही. उसाचे क्षेत्र अधिक आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी बिबटे अनेकदा दिसतात.थोरांदळे गावाच्या हद्दीत डोंगर मळा येथे रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी आहे. पुढे रांजणी , गांजवेवाडी नजिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल आहे.भागातील अनेक नागरिक मंचर येथे नोकरीला आहेत.या भागात एसटी बस सेवा बंद आहेत. मुक्कामी एसटी कधी तरीच येते.त्यामुळे नागरिकांना दुचाकीचाच वापर करावा लागतो.
सध्या या परिसरात ऊस तोड वेगात सुरू आहे.त्यामुळे बिबटे सैरभैर झाले आहेत.रात्रीच्या वेळी ते शिकारीसाठी बाहेर पडतात.त्यामुळे या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास जीव मुठीत धरुन करावा लागत आहे
गावागावातुन
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील १५० महिलांनी घेतला सहलीचा आनंद.

निरगुडसर-पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील महिलांच्या एक दिवशी कोकण सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 150 महिलांनी सहलीत भाग घेऊन अलिबाग येथील समुद्रकिनारा व इतर पर्यटन स्थळांना भेट देऊन सहलीचा आनंद घेतला.
पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील महिलांसाठी अनिलभाऊ वाळूंज मित्र मंडळाच्या वतीने सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील महिलांना शेतीच्या कामातून थोडासा वेळ मिळून सहलीचा आनंद घेता यावा यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.अलिबाग या ठिकाणी समुद्रकिनारी आणि इतर पर्यटन स्थळांना या महिलांनी भेट दिली.या सहलीच्या निमित्ताने महिलांना कामातून बाहेर पडून आनंद घेता आला यावेळी तीन बसमधून 150 महिलांनी या सहलीत सहभाग घेतला होता.महिलांच्या संपूर्ण सहलीची व्यवस्था खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर ,महेंद्र पोखरकर, सोमनाथ वाळुंज संतोष वाळुंज अमोल वाळुंज, संदीप घोलप, नानाभाऊ पोखरकर, अमित दौंड प्रकाश दौंड,निलेश मांजरे , नवनाथ मखर ,शुभम वाळुंज चंद्रकांत विरकर.यांनी पाहिली.पोंदेवाडी येथील ग्रामस्थांसाठी दरवर्षी अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात.याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी यावेळी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अंकिता वाळुंज यांनी दिली.
गावागावातुन
काठापूरचा शेतकर्याचा मुलगा झाला फौजदार

मंचर- काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील अनिकेत सुशिला चंद्रकांत करंडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवित फौजदार पदाला गवसणी घातली. तो गावातील पहिला पुरुष अधिकारी तर गावातील दुसरा अधिकारी ठरला आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनिकेत करंडे याने ग्रामीण भागात राहून जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले. काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे त्याचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण संगमेश्वर विद्यालय पारगाव, तर पुढे मेकॅनिकल इंजिनियर च शिक्षण व्ही आय.टी.पुणे येथुन पुर्ण केले.शिक्षण पुर्ण झाल्यावर अनेक कंपण्यांमध्ये कामाची संधी असतानाही लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन अधिकारी होण्याची ईच्छा असल्याने त्या नंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. होता. कोणत्याही संस्थेत अभ्यास न करत स्वताहाच अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षपदाच्या परीक्षेत यश मिळवले.अनेकांनी नोकरी कर नोकरीची चांगली संधी आहे. या अवघड परीक्षा देऊ नको अपयश येण्याची जास्त शक्यता आहे.असे सांगितले. परंतु आपल्या ध्येयावर ठाम राहुन त्याने हे यश मिळवले आहे.

त्याला पी.एस.आय.विक्रम कर्डीले यांचे मार्गदर्शन मिळाले. शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अनिकेतची आई सुशिला व वडील चंद्रकांत करंडे शेती करुन आपले कुटुंब चालवत आहेत. त्याने मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांना मार्गदर्शक आहे.
गावागावातुन
जुन्नर तालुक्यात ‘अफार्म’तर्फे कृषि मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन

जुन्नर -जागतिक महिला दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात अफार्मने नुकताच महिला शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. Indigo CSR अनुदानित व अफार्म, पुणे संचलित ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प-टप्पा २ अंतर्गत ‘अल्पखर्चिक सेंद्रिय शेती तंत्रज्ञान’ मार्गदर्शन सत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. जुन्नर तालुक्यातील इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु. या गावांत सन २०२४ ते २०२७ या कालावधीमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. इंगळून, ता. जुन्नर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त महिला, मुली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी हक्कदर्शिका म्हणून काम करत असलेल्या नयना उघडे (घंगाळदरे) आणि प्रेरणासखी म्हणून काम करत असलेल्या स्वाती घोरपडे (खानगाव) या लाभार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अफार्म-इंडिगो प्रकल्पामुळे महिलांची चूल-मूल ही मानसिकता बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची उद्योजगतेची मानसिकता घडत असल्याचे या दोन्ही महिलांच्या मनोगतातून समोर आले.

डॉ. सुधा कोठारी, अध्यक्ष-चैतन्य संस्था, खेड आणि कार्यकारी समिती सदस्य, अफार्म या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्या म्हणाल्या, “महिला शेतकरी तसेच महिला ग्रामसंघ, महिला उत्पादक गट यांनी गेल्या काही वर्षांत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. महिलांच्या विविध स्वयंरोजगार आणि सक्षमीकरणासाठी अफार्मच्या या प्रकल्पाने मोठा हातभार लावला आहे. स्थानिक पातळीवरील लोकांचा पाठींबा, इच्छशक्ती तसेच आपले नियोजन कौशल्य याविषयी प्रचंड उपयोगाला येते याची या ठिकाणी नोंद घेणे गरजेचे आहे.”

सौ. निवेदिता शेटे (शास्त्रज्ञ-कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव) या म्हणाल्या, “महिला सक्षमीकरणात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सबलीकरण हे सर्व येते. प्रत्येक महिलेला जर तिच्या अंगभूत कलागुणांची जाणीव जर झाली तर त्याचा व्यावसायिक अंगाने उपयोग नक्कीच करता येईल. त्यासाठी आपल्याला संवाद साधण्याचे, माहिती देण्याचे कौशल्य नक्कीच आत्मसात करावे लागेल. निरोगी जीवनासाठी प्रत्येक महिलेने एक गुंठ्याची का होईना पोषण बाग विकसित करावी आणि त्यामार्गे आपल्या शरीरातील पोषकमूल्ये जर कमी असतील तर त्यावर सुद्धा लक्ष देऊन आपली पोषक शक्ती वाढवावी लागेल. पोषणबागेमुळे आजारपण कमी होते आणि बचत सुद्धा होते.”
मनीषा घोगरे, (समुपदेशक जुन्नर पोलीस स्थानक) यांनी ग्रामीण भागात आत्महत्या, बालविवाह, विविध गंभीर आजार, तसेच लहान-तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे याबद्दल चिंता व्यक्त केली. या सर्व समस्यांबरोबरच मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याबद्दल त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

प्रगतीशील शेतकरी उत्तम जाधव यांनी सेंद्रिय शेतीवर उत्तम सादरीकरण केले. वेगवेगळ्या स्थानिक वनस्पती उदा. कडुनिंब, सीताफळ, धोत्रा, गुळवेल, करंज, बेलफळ यासह अनेक सेंद्रिय नैसर्गिक वस्तूंचा वापर करून कीटकनाशके कशी तयार करता येतील यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन करून उपयुक्त सूचना दिल्या. आजच्या काळात कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता सेंद्रिय अन्नाचा वापर आपल्या आहारात वाढवणे अत्यंत गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. सेंद्रिय शेतीमुळे शेतमालाची उत्पादकता वाढते तसेच मातीची सुपीकता वाढते हे त्यांनी समजावून सांगितले.
यावेळी डॉ. सुनिल भंडलकर (पशूधन विकास अधिकारी, जुन्नर), श्री. अनंता मस्करे (IBFM-प्रमुख, चैतन्य संस्था), इंगळूनच्या महिला सरपंच तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि महिला ग्रामसंघ समिती (इंगळून, शिवली, घंगाळदरे, आंबे, खानगाव, तेजुर, भिवाडे बु., भिवाडे खु.) हे सर्व उपस्थित होते. यावेळी येथे झालेल्या प्रदर्शनात शिवली, भिवाडे, इंगनूळ, आळेफाटा येथून या ठिकाणी महिला उद्योजगांचे धान्य-तांदूळ, वॉलपीस, कपडे, कोंबडी-गावरान अंडे, भाजीपाला, स्ट्रॉबेरी, जनावरांचे औषधे बद्दल स्टॉल मांडण्यात आले होते. अफार्मचे श्री. सावता दुधाळ (प्रकल्प व्यवस्थापक) यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर श्री. हनुमंत दुधाने यांनी आभार प्रदर्शन केले. ओंकार फरतारे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष मेहनत घेतली.
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन9 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन9 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन1 year ago
विठू माऊली