Connect with us

गावागावातुन

शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी भौतिक व गुणात्मक विकास करत असताना समाजातील दानशूर दात्यांची भुमिका महत्त्वाची.

Published

on

मंचर :- शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी भौतिक व गुणात्मक विकास करत असताना समाजातील दानशूर दात्यांची महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा परिषद शाळेसाठी देणगीदारांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या विविध गोष्टींचा उपयोग शालेय जीवनात विद्यार्थ्यांना होईल असे मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले यांनी व्यक्त केले.

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित सत्कार सोहळ्याच्या निमित्त ते बोलत होते.
यावेळी सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे,रोहिदास तुळे,अशोक जोरी, सोसायटीचे चेअरमन कुंडलिक जोरी शाळेचे अध्यक्ष राहुल भुरके, काळुराम टिंगरे,शंकर करंडे, मंगेश करंडे, देवस्थानचे उपाध्यक्ष नरहरी करंडे, रामदास करंडे,राजु जोरी,संतोष करंडे,किशोर करंडे,दत्तात्रय करंडे,नवनाथ करंडे,हनुमंत रणपिसे, संदिप करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी मागील चार वर्षांमध्ये शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मदतीने ही सुधारणा करण्यात आली आहे. तसेच गावातील अनेकदा ग्रामस्थांनी वस्तूरुपी व भौतिक सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देणगी दिली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा सन्मान नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

देनगीदारांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष राहूल भुरके यांनी सांगितले,प्रास्ताविक सुरेश भागवत,सुत्रसंचालन नीलिमा वळसे, उत्तम वाव्हळ यांनी तर आभार दिनेश तूळे यांनी मानले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.

Published

on

मंचर-

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.

Published

on

मंचर-

भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे महिलांसाठी “Cold Pressed oil प्रोसेसिंग” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.

हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.

उद्घाटन समारंभात सरपंच अशोक करंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, सुनील काटे (पंचायत समिती कृषी अधिकारी )आणि ईडीआय प्रोजेक्ट ऑफिसर सचिन मोरे उपस्थित होते.पोलीस पाटील अमोल करंडे.

भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अ‍ॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading
Advertisement

Trending