Connect with us

गावागावातुन

भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार” जाहिर

Published

on

मंचर – दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार””जाहीर झाला आहे. राज्यातील २०२३-२४ गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हि.एस.आय.) यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची घोषणा आज (मंगळवार) संस्थेचे उपाध्यक्ष मा. दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीय कृषीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (दि. २३) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेतर्फे साखर उद्योगातील दिल्या जाणा-या पुरस्काराचे वितरणही मा.श्री पवार यांचे हस्ते होणार आहे.


पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना बेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस बेणेबदल आणि बेणेमळा योजनेवर भर, एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागवड, ठिबक सिंचन वाढीसाठी प्रयत्न, माती व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करणे, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठा, खोडवा पीक व्यवस्थापनावर जास्तीत जास्त भर, कृषी कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण, कृषी निविष्ठांचा मोठया प्रमाणावर पुरवठा, पाचट कुट्टी करणेसाठी विशेष प्रयत्न, ऊस विकास योजनेसाठी भरीव रक्कमेची तरतुद, दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ या स्वतंत्र ऊस विकास योजनेची मागील ६ वर्षापासून अंमलबजावणी या सर्व बाबींचा विचार करुन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु यांनी गाळप हंगाम २०२३-२४ करीता सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.

सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना ६ वेळा, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम क्रमांकाचा ४ वेळा, तांत्रिक कार्यक्षमता प्रथम क्रमांकाचा ९ वेळा, ऊस विकास व संवर्धन प्रथम क्रमांकाचा ५ वेळा, चाचणी गळीत हंगामात जास्तीत जास्त गाळपाचा १ वेळा, साखर उदयोगातील अग्रेसर संस्था भारतीय शुगर, पुणे यांचा “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटीव्ह शुगर मील पुरस्कार” १ वेळा व दैनिक नवभारत वृत्तपत्र समूह प्रस्तुत दैनिक नवराष्ट्राच्या वतीने राज्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल “उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार” १ वेळा याप्रमाणे पुरस्कार मिळाले असून देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना पुरस्कार ६ वेळा प्राप्त करणारा एकमेव कारखाना ठरला असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.

Published

on

‌‌मंचर-

      देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
    गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
Continue Reading

गावागावातुन

आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

Published

on

मंचर-

आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.

या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

Continue Reading

गावागावातुन

घोडनदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गेले वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

Published

on

मंचर –

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घोडनदित येत आहे.घोडनदिला अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक शेती पिकांना पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस या परिसरात झाल्याने शेती ,रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पावसाचे पाणी घोड नदीत येत आहे. मीना व घोड नद्यांचे पाणी एकत्र होऊन काठापुर बुद्रुक या ठिकाणावरून पुढे एकत्र जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने निक नदीच्या काठावर असणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बाहेर काढता न आल्याने अनेक पंप हे वाहून जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या नदीच्या काठावर मोटर बसवण्या ऐवजी बॅरलच्या साहाय्याने मोटर हे डायरेक्ट पाण्यावर बसवतो. त्यामुळे विद्युत मोटारी चांगलं प्रमाणात पाणी देतात. परंतु नदीला मागे आठ दिवसापूर्वी पाणी नसल्याने अनेक विद्युत पंप हे नदीमध्ये होते चार दिवसापासून पाऊस सुरू असला तरी डिंभे धरणात पाणी नसल्याने नदीच्या पाणी साठ्यात लगेच वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बाहेर काढल्या नाहीत. आज सकाळ पासून अचानक घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या व नदीत असणाऱ्या अनेक विद्युत पंप मोटारी या पाण्यात वाहून गेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत नदीचे पाणी कमी झाल्याच्या नंतर किती मोटारी वाहुन गेल्या याचा अंदाज लागेल. एकंदर सध्यातरी अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62