मनोरंजन
नालंदा विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे ; संस्कार फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थी व खेळाडूंचा सन्मान.

मंचर:-मंचर (ता.आंबेगाव) तेथील नालंदा विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले. यावर्षी नालंदा विद्यालयाला वीस वर्ष पूर्ण झाल्याने , स्नेहसंमेलनाचा नवरस हा विषय निवडण्यात आला होता. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित नवरस या विषयावर विद्यार्थ्यांनी विवीध नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

यावेळी माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, पराग कारखान्याचे चेअरमन यशवर्धन डहाके, शरद बँकेचे संचालक अजय घुले, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, सुहास बाणखेले, दत्ता थोरात, अरुणाताई थोरात, मनीषा बेंडे, नालंदा इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल डॉ. करुणा मनुजा, व्हॉईस प्रिन्सिपल सोजी जेकब, सरपंच माधुरी शेटे, एन सी आर टी चे सीईओ अमरजीत खराडे, प्रसिद्ध युट्युबर मंदार पडवळ हे उपस्थित होते.

यावेळी संस्कार फाउंडेशनच्या वतीने विद्यालयातील चार यशस्वी आणि गुणवंत ,क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला या विद्यार्थ्यांचा सन्मान दिलीप वळसे पाटील आणि पूर्वा वळसे पाटील, अजय घुले, यांच्या हस्ते करण्यात आला माननीय दिलीप वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर करुणा मनुजा यांचे देखील कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि व्यवस्थापन विद्यालयाचे समन्वयक सय्यद मुमताज अली यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक महेश देशपांडे तसेच विद्या बांगर आणि रफत काझी यांनी केले.
गावागावातुन
गडदादेवी माता यात्रा उत्सवानिमित्त पोंदेवाडीत आयोजित बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये दोन दिवसात धावले 350 बैलगाडे.

निरगुडसर-श्री गडदादेवी माता यात्रा उत्सवानिमित्त पोंदेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी आयोजित बैलगाड्यांच्या शर्यती मध्ये दोन दिवसात एकूण 350 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यावेळी दोन दिवसांमध्ये कचरू भिकाजी दौंड ,जाधव करंडे जुगलबंदी यांचा बैलगाडा घाटाचा महाराजा किताबाचा मानकरी ठरला.

पोंदेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी ग्रामदैवत श्री गडदादेवी मातेच्या यात्रा उत्सवानिमित्त बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी एकूण 350 बैलगाडा मालकांनी भाग घेतला.दोन दिवस चाललेल्या या बैलगाडा शर्यतींमध्ये खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील अनेक नामवंत बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता.यावेळीप्रथम क्रमांक एकूण ६५ गाडे आले.फळीफोडचा मान शांताराम बाळू गाढवे,सुवर्णयोग बैलगाडा संघटना निरगुडसर यांनी मिळवला.द्वितीय क्रमांक एकूण ९९ गाडे आले.यात दुसऱ्यात प्रथम संजय नामदेव गोरे मेंगडेवाडी व अंकुश महादू बढेकर यांचे गाडे आले,तृतीय क्रमांकात एकूण ६४ गाडे पळाले तिसऱ्यात पहीला सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना खडकवाडी, आर्यन भानुदास खांदवे लोहगाव यांचे गाडे आले.घाटाचा महाराजा कचरू भिकाजी दौंड करंडे जाधव जुगलबंदी यांनी मिळवला.फायनलमधे प्रथम क्रमांक शिवाजी बबन ढोबळे,अरविंद रामसिंग वळसे,
द्वितीय क्रमांक पांडुरंग शंकर सोनवणे,दुर्विका विकास पाचारणे,तृतीय क्रमांक
प्रकाश मेचे, शिवराम धर्माजी वाव्हळ यांचे गाडे आले.
यात्रा उत्सवाची व्यवस्था अनिल वाळुंज,संंदिप पोखरकर,जयसिंग पोंदे,महेंद्र पोखरकर,अमोल वाळुंज,सुशांत रोडे,सोमनाथ वाळुंज,अशोक वाळुंज,वसंत पोंदे,शिवराम पोखरकर,नानाभाऊ पोखरकर,नितीन पोंदे,प्रमोद पोंदे,संदेश डुकरे,महेश गायकवाड,राहुल जोजारी,संतोष पोखरकर यांनी पाहिली.
गावागावातुन
मांदळेवाडीत बैलगाडा शर्यतीच्या घाटाचे भूमिपूजन.अनिल वाळुंज यांच्या हस्ते संपन्न.

निरगुडसर:-मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या बांधकामाचे भूमिपूजन आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या फंडातून येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या बांधकामासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. याप्रसंगी सरपंच उज्ज्वला आदक, उपसरपंच लता आदक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील ऊर्फ बाबू आदक, बाळशिराम वाळुंज, रवी ढगे, योगेश करंडे, वैशाली पालेकर, यात्रा कमिटी अध्यक्ष विजय आदक, उपाध्यक्ष सचिन आदक, काळूराम पालेकर उपस्थित होते.

घाटासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या विजय आदक, सुरेश आदक, संतोष आदक, महादू आदक, दशरथ आदक, खंडू फकिरा आदक, फकिरा आदक या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आंबेगाव तालुक्यात गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रेला बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात त्यासाठी चांगल्या बैलगाडा घाटाची आवश्यकता असते.त्यामुळे बैलगाडा घाट चांगला असावा अशी प्रत्येक गावची इच्छा असते.त्यामुळे बैलगाडा घाट बांधून घेण्याकडे गावांचा कल असतो त्यामुळे मांदळवाडी येथे बैलगाडा घाटाचे काम करण्यात येत आहे.
गावागावातुन
ज्येष्ठ लोकनाट्य तमाशा कलावंत आजही उपेक्षितच.अनिल वाळुंज यांची खंत.

निरगुडसर: ग्रामीण भागात करमणुकीचे साधन म्हणून तमाशाकडे पाहिले जाते. तमाशा कलावंतांचे मानधन हे तुटपुंजे असते. त्यातून तो निवृत्तीनंतर घर चालवू शकत नाही. त्यामुळे तो उपेक्षितच राहतो, अशी खंत आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी व्यक्त केली. अशा ज्येष्ठ कलाकारांची शासनाने दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

तमाशा क्षेत्रातील जेष्ठ कलाकार निवृत्तीबुवा जाधव पोंदेवाडीकर (वय ९०) यांनी नुकतीच तमाशा क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज बोलत होते. यावेळी जयसिंग पोंदे, महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, नारायण हारके,नानाभाऊ पोखरकर, नामदेव पोखरकर, अमोल वाळुंज, पोपट रोडे, झुंबर वाळुंज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, पांडुरंग मुळे, भिका भीमा सांगवीकर इत्यादी तमाशामध्ये पोंदेवाडी गावचे जेष्ठ कलाकार निवृत्ती भाऊ जाधव यांनी मावशी हे श्री पात्र करून प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यांनी पोंदेवाडी गावचे नाव राज्यभर आपल्या कलाक्षेत्रातून पोहोचवले. जुन्या काळी चित्रपट किंवा डिजिटल युग नव्हते. त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना करमणुकीसाठी तमाशा, भारुडे,नाटक किंवा कलगीतुरे इत्यादी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायचे. त्या माध्यमातून नागरिकांची करमणूक व्हायची, परंतु अशा दुर्मिळ कलाकारांना पाठबळ देण्यासाठी सरकारने त्यांना देत असलेले मानधन हे तुटपूंजे आहे. त्यामध्ये भरीव वाढ करावी तसेच त्यांचा शासन दरबारी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान होणे गरजेचे आहे.
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन9 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन9 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन1 year ago
विठू माऊली