गावागावातुन
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
सध्या कांद्याच्या बाजारभावाने चांगलीच उसळी घेतली आहे. याच कारणातून बराकीत साठवून ठेवलेल्या कांद्याची चोरी जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथे झाली.
धामणी येथील शेतकरी बाळासाहेब बढेकर यांची कांद्याची वखार जारकरवाडी हद्दीत बढेकरवस्ती नजीक कॅनोल जवळ आहे. ( दि. १४ ) रोजी रात्रीच्या सुमारास कांद्याच्या साधारण ४० ते ५० पिशव्या चोरीला गेल्या असून चालु बाजार प्रमाणे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी बढेकर यांनी सांगितले. मागील काळात कांद्याला बाजारभाव नव्हता त्यावेळी शेतकरी उत्पादकांना बाजारात आपला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत होता. त्यावेळी उत्पादन खर्चही वसूल होत नव्हता. आता कांद्याला चांगला बाजारभाव आहे. मात्र, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनेमुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
पूर्व आंबेगावात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उद्योजक संजय बढेकर, ग्रा. पं. सदस्य शामराव बढेकर, सुरेश बढेकर, दिपक विधाटे यांनी केली आहे.
गावागावातुन
भीमाशंकर कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

मंचर-
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामामध्ये ११ लाख ३८ हजार ४९६ मे.टन ऊस गाळप करून सरासरी १२. ०० टक्के साखर उता-याने १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता करण्यात आली. हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, आनंदराव शिंदे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, पर्चेस ऑफिसर ब्रिजेश लोहोट, ऊस पुरवठा अधिकारी दिनकर आदक, सहा. ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दिक्षित, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे तसेच ऊस वाहतूकदार, ऊस तोड मुकादम, ऊस तोडणी मजूर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी अधिक माहिती देताना चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने तसेच अधिकारी व कर्मचा-याच्या नियोजनाने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातून नोंद असलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करून ११ लाख ३८ हजार ४९६ मे.टन ऊस गाळप करुन सरासरी १२. ०० टक्के साखर उता-याने १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन केले असून गाळप हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. सहविज निर्मिती प्रकल्पाद्वारे आजअखेर ७ कोटी ३४ लाख ७३ हजार युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता ३ कोटी ६५ लाख ४५ हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे. तसेच ९० के.एल.पी.डी. डिस्टीलरी प्रकल्प दि. ०१ डिसेंबर पासून चालू झाला असून आजअखेर १ कोटी ०९ लाख ५० हजार बल्क लिटर रेक्टीफायर स्पिरीटचे उत्पादन झाले असून ९१ लाख ८१ हजार बल्क लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून सहवीज निर्मिती व डिस्टीलरी प्रकल्प चालू आहे.
गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये ट्रकने जास्तीत जास्त वाहतूक करणारे वाहतूकदार निशा किशोर घाडगे, ट्रॅक्टरने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार विलास चिमाजी गाडगे, ट्रॅक्टरजोडने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान चुनीलाल नवल पवार, टायरबैलगाडीने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान अजिनाथ मारुती सकुंडे, जास्तीत जास्त ऊस तोड करणारे कंत्राटदार विलास चिमाजी गाडगे, हार्वेस्टर मशीनने जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे कंत्राटदार अनिता राजेंद्र सरवदे व हार्वेस्टर मशीन मागील वाहनाने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार प्रणय संजय दरेकर यांचा सांगता समारंभानिमित्त सत्कार करण्यात आला. तसेच सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कामगार, अधिकारी व कर्मचा-यांच्या सहकार्याने यंदाच्या गाळप हंगामात कोणतीही अडचण न येता गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.
गावागावातुन
आदर्श गाव गावडेवाडी येथे श्री भैरवनाथा महाराज यात्रा उत्सव.

मंचर
आदर्श गाव गावडेवाडी ( ता आंबेगाव )येथील श्री काळ भैरवनाथाची यात्रा गुरुवारी (ता . १७ ) व शुक्रवारी (ता . १८ ) अशी दोन दिवस संपन्न होणार आहे सर्व यात्रा शौंकीनानी व भावीकांनी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन आदर्श गावगावडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .
यात्रेच्या निमित्ताने गुरुवारी बैलगाड्याच्या भव्य शर्यती व शुक्रवारी कुस्त्यांचा जंगीआखाडा संपन्न होणार आहे पंचक्रोशीतील यात्रा शौकिनांनी आपले बैलगाडे घेऊन येऊन व ढोल लेझीम घेऊन यात्रेची शोभा वाढवावी असेही आवाहन आदर्श गाव गावडेवाडी ग्रामस्थांनी केले आहे शर्यतीसाठी प्रथम क्रमांकास ४१ हजार रुपये द्वितीय क्रमांक ३१ हजार रुपये तृतीय क्रमांकास २१ हजार रुपये चतुर्थ क्रमांक ११ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या आखाड्यासाठी ५१ रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत गुरुवारी (ता . १७ ) रोजी संध्याकाळी रात्री काळुबाई कला नाट्य मंडळ धामणे ( ता .खेड ) यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे तसेच शुक्रवारी करणुकीसाठी फुलवंती हा जुन्या नव्या गीतांचा आर्केस्ट्रा चा बहारदार कार्यक्रम होणार आहे या यात्रेसाठी बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी ह भ प बाळू बुवा बळवंत गावडे यांनी एक लाख रुपये देणगी दिलेली आहे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत . त्याचप्रमाणे या यात्रा उत्सवासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री व आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, मुंबईचे माजी उपमहापौर अशोक शेठ अंकुश गावडे व तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत पंचक्रोशीतील यात्रा शौकिनांनी या यात्रेला आवर्जून हजेरी लावावी असेही आवाहन समस्त आदर्श गाव गावडेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .
गावागावातुन
अवसरी खुर्द मंदिरात हनुमान जयंती उत्साह

मंचर
: अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील हनुमान मंदिरात शनिवारी (ता १२ ) रोजीहनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमान जन्माचे कीर्तन हभप मधुकर महाराज गायकवाड (गावडेवाडी) यांचे झाले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंदिर परिसर सुशोभित केला होता. हनुमान यांनी गुरू म्हणून श्रीराम प्रभू यांची केलेली आदर्शवत सेवाआहे हनुमंताचा व प्रभू रामचंद्रांचा आदर्श भावी कांनी घ्यावा .हनुमंतासारखी भक्ती करावी हनुमंता सारखे विनम्र असावे हनुमंतांचे आचरण करणे ही आजच्या तरुण पिढीची काळाची गरज आहे अवसरी खुर्द ग्रामस्थांची एकजूट व एकोपा अतिशय कौतुकास्पद आहेअसेही प्रतिपादन ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांनी यावेळी . या कार्यक्रमाचे नियोजन ह-भ-प दीपक महाराज टेंबेकर ह भ प अनंत महाराज टेंभेकर ग्राम पुरोहित यतीन काका कुलकर्णी सोमनाथ खोल्लमसंतोष कसाब संतोष फल्ले ,संजय वायाळ व सर्व ग्रामस्थांनी केले गायकवाड महाराजांचा यांचा सन्मान भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी सभापती आनंदराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती याप्रसंगी टाळकरी, पखवादक, वीणाधारी व वारकऱ्यांचा सत्कारकरण्यात आला.

अवसरी खुर्द (ता . आंबेगाव येथे हनुमान जयंती निमित्त ह भ प मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी यांची देव जन्माचे किर्तन संपन्न झाले
-
गावागावातुन7 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन7 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
मनोरंजन1 year ago
विठू माऊली
-
सामाजिक1 year ago
शिरदाळे घाटात पुन्हा भीषण अपघात ग्रामस्थांकडुन रस्त्याच्या शेजारी सिमेंट कठडे बांधण्याची मागणी.