Connect with us

गावागावातुन

जारकरवाडी ग्रामपंचायतीकडुन जागतिक महिला दिन साजरा.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)

जारकरवाडी ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून गाव अंतर्गत येणाऱ्या पाच अंगणवाड्यांमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गावातील महिलांना लेक लाडकी या योजनेची माहिती देण्यात आली. व लेक लाडकी योजनेतील पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना प्रशस्ती पत्रक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.लवकरच निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मतदार यादीत नाव असणार्या सर्व महिलांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच प्रतिक्षा बढेकर, उपसरपंच सचिन टाव्हरे, ग्रा.पं सदस्य सुभाष लबडे, अंगणवाडी सेविका मंगल किरवे, संगिता पाबळे, अर्चना बढेकर, रूपाली भोजने, निर्मला पाचपुते, लता लबडे, सरस्वती बढेकर व महिला उपस्थित होत्या.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता.आंबेगाव ) येथील श्री .क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.यात्रेच्या पहिल्या दिवशी एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-पौष पौर्णिमेनिमित्त पुणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता.आंबेगाव ) येथील श्री .क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.यात्रेच्या पहिल्या दिवशी एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. “सदानंदाचा येळकोट ” भैरवनाथाचं चांगभलं “असा जयघोष करत भाविकांनी तळीभंडार केला.
थापलिंग गडावर सोमवारी (दि .१३ )पहाटे खंडोबा देवाची पहाटे विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी थापलिंग गडावर चोहोबाजूंनी भाविक येण्यास प्रारंभ झाला.दुपारी १२ नंतर भाविकांची गर्दी वाढली.थापलिंग गडावर भाविकांनी येऊन कुलदैवताचा कुलाचार म्हणून वाघे मंडळींकडून जागरण गोंधळ पूर्ण करून घेतला. “सदानंदाचा येळकोट ” भैरवनाथाचं चांगभलं “असा जयघोषात लाखो भाविकांनी तळी भंडार केला. व खोबऱ्याची उधळण केली.दुपारी दोन वाजता वळती, रांजणी, शिंगवे, येथील खुडे बंधूंच्या मानाच्या काठी पालख्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात गडावर आगमन झाले.दिवसभरात जवळपास एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले .
थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ , तरुण, युवक यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे.या मंदिराच्या कामासाठी भाविक भक्तांनी सरळ हाताने मदत करावी. असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पौष पौर्णिमेनिमित्त नागापूर (ता. आंबेगाव )येथील श्री क्षेत्र थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.तळी भंडार करण्यासाठी मंदिराभोवती भाविकांनी केलेली गर्दी.

Continue Reading

गावागावातुन

धामणी (ता.आंबेगाव) येथे श्री खंडोबा,म्हाळसाईचा शाही विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न.

Published

on

लोणी धामणी प्रतिनिधी

पौष पौर्णिमेला श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाई देवीचा लग्न सोहळा धामणी ( ता.आंबेगाव) येथे पारंपारिक वाद्याच्या गजरात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटात पार पडला.सोमवारी (दि.१३) पौष पौर्णिमेनिमित्त पहाटे धामणीच्या खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती करण्यात आली.त्यानंतर सेवेकरी धोंडीबा भगत,दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,शांताराम भगत,दिनेश जाधव,माऊली जाधव वाघे,सिताराम जाधव वाघे.,राजेश भगत,पांडुरंग भगत,राहुल भगत यांनी व महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व म्हाळसाईच्या मुखवट्याला चंदन उटीचा लेप दिला.

त्यावर सुंगधी दवणाच्या अत्तरात मिश्रित केलेली हळद लावण्यात आली.यावेळी देवाला हळद लावण्यासाठी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.यावेळी महाळुंगे पडवळ,गावडेवाडी,लांडेवाडी,तळेगांव ढमढेरे,लोणी,खडकवाडी,रानमळा, पाबळ,अवसरी खुर्द,संविदणे येथील मानकरी व भाविक उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता बाळासाहेब महादू बढेकर,विठ्ठल बढेकर,अंकुश बढेकर यांच्या मानाच्या मांडवडहाळ्याची पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन सजवलेल्या बैलगाड्यातील मांडवडहाळे मंदिरात सदानंदाचा येळकोट करून व भंडार्‍याची उधळण करुन देवाला अर्पण करण्यात आले.श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाईदेवी यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती.मंदिरात देवाला पूजा करुन खंडोबाला व म्हाळसाईला बांशिग व मुडावळ्या घालण्यात आल्या.पेठेतील मुक्ताबाई मंदिरात पौष महिण्याच्या पालखीचे मानकरी समस्त करंजखेले मंडळीच्या हस्ते आरती करण्यात आल्यानंतर दुपारी सेवेकरी मंडळीनी मंदिरातील पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याला बाशींग व मुडावळ्या बांधून मुखवटा पालखीत ठेवल्यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात झाली.

पौष महिण्यातील शाकंभरी पौष पौर्णिमेच्या पालखीचा पारंपारिक मान समस्त करंजखेले मळ्याला असतो.मिरवणूकीत करंजखेले,कदम,करंडे,सांडभोर वाळूंज आडनावाचे भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झालेले होते.महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.मिरवणूकीत महिलांनी फुगडी खेळून मिरवणूकीला रंगत आणली.मिरवणूकीत खंडोबाचे वाहन असलेला रुबाबदार अश्व (घोडा)सामील झालेला होता.यावेळी मिरवणूकीत पालखीवर फुलाच्या पाकळ्या,अक्षदा व भंडारा उधळण्यात येत होती.फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.पालखीची मिरवणूक सायंकाळी पावणेपाच वाजता मंदिरात विसावली.मंदिराच्या आवारात देवाच्या लग्न सोहळ्यासाठी आकर्षक मंडपातील सजवलेल्या स्टेजवर नवरदेव म्हाळसाकांत खंडोबाचे महिलांनी ओवाळणी करुन स्वागत केले.त्यानंतर सनई व तुतारीच्या निनादात खंडोबाचा मुखवटा स्टेजवर आणण्यात आला.त्यानंतर सेवेकरी मंडळीनी मुख्य मंदिरातून बांशिंग व मुडावळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेला म्हाळसाईचा मुखवटा मंडपात आणला. सांयकाळी ५ वाजता खंडोबा म्हाळसाईच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली.पाच मंगलाष्टकाच्या गजरात फुलांच्या पाकळ्या व अक्षता भंडारा उधळून वाद्याच्या निनादात व फटाक्याच्या आतषबाजीत सदानंदाचा येळकोट करुन खंडोबा म्हाळसाईचा विवाह सोहळा पार पडला.

त्यानंतर उपस्थित वर्‍हाडी मंडळीना मोतीचूर लाडूचा प्रसाद देण्यात आला.शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे,बाळू बेरी, मुकुंद क्षिरसागर यांनी केले.

Continue Reading

गावागावातुन

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे पारगाव केंद्राच्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजीत स्पर्धेत दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग.

Published

on

पारगाव शिंगवे-काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे पारगाव केंद्राच्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांत दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे यांनी दिली.

स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,पप्पु खुडे,रोहिदास तुळे,अशोक जोरी,विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन,कुंडलिक जोरी,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राहुल भुरके, उपाध्यक्ष काळुराम टींगरे,पंढरीनाथ करंडे,कैलास टिंगरे,सोपान करंडे,पंढरीनाथ जोरी,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर,विविध शाळांतील शिक्षक ,संतोष लबडे, राजू जाधव,मच्छिंद्र काळे,दत्ता डोळस पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन लहान गटात इ. १ ली व २ री, इ. ३ री व ४ थी आणि मोठ्या गटात इ. ५ वी ते इ. ८ वी स्वरूपात करण्यात आले होते. वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावणे, उंच उडी, लांब उडी, वक्तृत्व, लिंबू चमचा, बेडूक उड्या, वेशभूषा, गोळाफेक, थाळीफेक, तसेच सांघिक क्रीडा प्रकारात बडबडगीत, कविता गायन, भजन, प्रश्नमंजुषा, कबड्डी, खो-खो, लोकनृत्य, लेझीम, लंगडी आदी स्पर्धा
पार पडल्या.

या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कला व क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. सर्व स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील क्रीडाप्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धा यशस्वितेसाठी शिक्षक सुरेश भागवत , उत्तम वाव्हळ , दिनेश तुळे , सुरेश माने, विजय थोरात,रामरास उंडे ,निलिमा वळसे यांनी परिश्रम घेतले.मुख्याध्यापक नंदकुमार चासकर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी सरपंच अशोक करंडे,विशाल ,राहुल भुरके यांनी शुभेच्छा दिल्या तर दिनेश तुळे यांनी आभार मानले.

Continue Reading
Advertisement

Trending