सामाजिक
शिरुर मंचर घोडेगाव या गावांमध्ये प्रवाशांची ने आन करणारी एस.टी. बस पुर्ववत सुरू करावी. पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांची मागणी.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/07/Screenshot_20260723-215444_Google-1000x600.jpg&description=शिरुर मंचर घोडेगाव या गावांमध्ये प्रवाशांची ने आन करणारी एस.टी. बस पुर्ववत सुरू करावी. पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांची मागणी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/07/Screenshot_20260723-215444_Google-1000x600.jpg&description=शिरुर मंचर घोडेगाव या गावांमध्ये प्रवाशांची ने आन करणारी एस.टी. बस पुर्ववत सुरू करावी. पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांची मागणी.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर-
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील तालुक्याचे व महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या शिरुर मंचर घोडेगाव या गावांमध्ये प्रवाशांची ने आन करणारी राज्य परिवहन महामंडळाची बस पोंदेवाडी काठापूर बुद्रुक रस्त्याचे काम सुरू असल्याने बंद झाली होती.सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून एस.टी.बस पुर्ववत सुरू करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज यांनी शिरुर एस.टी.आगाराकडे पत्राव्दारे केली असुन पुन्हा ही बस पुर्वीच्या मार्गाने सुरू करावी अशी मागणी केली आहे.जेणेकरून विद्यार्थी व ग्रामस्थांनी सोय होईल.
आंबेगाव व शिरूर तालुक्यातील तालुक्याचे व महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या शिरुर मंचर घोडेगाव या गावांमध्ये प्रवास करणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गेली अनेक वर्षे सुरू आहे ही बस सकाळी शिरूर येथुन निघुन शिरुर आण्णापुर मलठण कवठे सविंदणे लोणी पोंदेवाडी कारखाना पारगाव अवसरी मंचर व पुढे घोडेगाव साठी जात होती व पुन्हा या गावांतुन परतीचा प्रवास करायची या बसमुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांना ये जा करताना उपयोग व्हायचा परंतु मागील दोन महिन्यांपासून पोंदेवाडी काठापूर बुद्रुक रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता.त्यामुळे ही बस बंद झाली होती.
परंतु सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून एस.टी.बस पुर्ववत या मार्गाने पुन्हा सुरू करावी अशी मागणी पंचायत समितीच्या सदस्या कु. अंकिता अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी शिरुर एस.टी.आगाराकडे केली असुन. पुन्हा ही बस पुर्वीच्या मार्गाने सुरू करावी अशी मागणी केली आहे.जेणेकरून विद्यार्थी व ग्रामस्थांनी सोय होईल.सदर
शेतीशिवार
भीमाशंकरकडून खोडवा उस अनुदानाची रक्कम बॅंकेत वर्ग.
मंचर-
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक आ.दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या.

मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास आलेल्या खोडवा उसास रु.१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अनुदान देण्याचे ठरलेनुसार १ लाख ८ हजार ७०२ मे.टनास रक्कम रु. १ कोटी ८ लाख ४० हजार ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

कारखान्याने यापुर्वी गाळप केलेल्या ऊसास एफ.आर.पी.प्रमाणे रु. ३२७३/- प्रती मे.टनाप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. तसेच जाहीर केल्याप्रमाणे सन २०२५-२६ गाळप हंगामात गाळपास आलेल्या खोडवा ऊसाकरीता रु. १००/- प्रति मे.टन अनुदानाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामुळे सभासद व ऊस उत्पादकांना ऊस लागवड व मशागतीस मदत होणार असून ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत तर दिलेलीच आहे त्याशिवाय भीमाशंकर कारखान्याने आजपर्यंत सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२६-२७ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

Public
काठापूर बुद्रुक येथे वृक्षारोपण.
मंचर-
काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या माध्यमातून वृक्षारोपण महाअभियान 2026 अंतर्गत प्रत्येक भक्त का एक वृक्ष या संकल्पनेनुसार शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले.

रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज धाम रत्नागिरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वृक्षारोपण महाअभियान राबवले जात असून, प्रत्येक भक्त का एक वृक्ष या योजनेअंतर्गत प्रत्येक भक्ताच्या माध्यमातून एका झाडाचं रोपण करण्यात येत आहे. काठापुर बुद्रुक या ठिकाणी या योजनेतून शंभर वृक्षांचे रोपन करण्यात आले.
नानिजधाम मुख्य पिठाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही योजना राबवली जात असून,पारगाव सेवा केंद्राच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सरपंच अशोक करंडे माजी उपसरपंच विशाल करंडे पोलिस पाटील अमोल करंडे,संदीप करंडे, सुषमा करंडे पुष्पा राऊत ,राधाबाई रोडे, विलास मैड सहभागी झाले होते.

शैक्षणिक
लाखनगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांजकडून साऊंड सिस्टिम भेट.
मंचर-
लाखनगाव ता.आंबेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांनी पन्नास हजार रुपये किमतीचे चार्जेबल साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले

यावेळी मुख्याध्यापक अनिल देसले, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे, उपाध्यक्ष प्रदीप रोडे, विजय कानसकर उपस्थित होते.
यावेळी लाखनगाव येथील माध्यमिक विद्यालयास भविष्यकाळातही भरीव मदत करणार असल्याचे उद्योजक सागर दांगट यांनी सांगितले.

उद्योजक सागर दांगट यांजकडून साउंड सिस्टीम भेट.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
