सामाजिक
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर संपन्न
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/07/IMG-20250725-WA0013-1000x576.jpg&description=भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर संपन्न', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/07/IMG-20250725-WA0013-1000x576.jpg&description=भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर संपन्न', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर -दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव व शिरूर तालुक्यात जनविश्वास सप्ताह (दि. २२ जुलै ते ३१ जुलै) असा साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाअंतर्गत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवार (दि. २५) रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, पोपटराव थिटे, नितीन वाव्हळ, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, चीफ अकौटट राजेश वाकचौरे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे, शिक्षण संस्थेचे ओ.एस.डी. बी.डी. चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक वसंत जाधव, आंबेगाव तालुक्याचे युवक अध्यक्ष वैभव उंडे, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखिले, शरद बँक संचालक दौलतभाई लोखंडे, अशोक आदक, निलेश पडवळ, पिंटू पडवळ, दिलीप लोखंडे, कारखान्याचे कर्मचारी, महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.


गावागावातुन
तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा
मंचर प्रतिनिधी :
गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.
“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.
सामाजिक
पोंदेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू.बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा.संदीप पोखरकर यांची मागणी.
मंचर-
पोंदेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी पहाटेच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून. या परिसरात वारंवार बिबट्या दिसत असून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी पोंदेवाडी चे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.
सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये बिबट्या वारंवार पहावयास मिळत आहे.सध्या ऊस हा डोक्यापेक्षा जास्त उंचीचा झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा बिबट्याने आपला मोर्चा उसाच्या परिसरात वळवल्याचे दिसुन येते.
पोंदेवाडी येथील रोडेवस्ती या ठिकाणी आनंदा बबन पोंदे यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने पहाटेच्या वेळी हल्ला करून त्याला ठार केले.सदर वासरू बांधलेले असल्याने बिबट्याला ते वासरू घेऊन जाता आले नाही. त्यामुळे त्याच ठिकाणी वासराचा फडशा पाडला.पहाटे चारच्या दरम्यान आनंदा पोंदे हे जागे झाले असता वासरू व्यवस्थित बसले होते. परंतु सकाळी पाहिले असता वासराला बिबट्याने ठार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांना दिली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी संपर्क साधुन मृत वासराचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
रोडेवस्ती येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.रात्री नऊच्या दरम्यान बिबट्या या परिसरात दिसून आला होता.त्यामुळे हा बिबट्या या ठिकाणी स्थायिक असून दोन बिबटे जोडीने फिरत असल्याचे या बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा अशी माघणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.
गावागावातुन
पोंदेवाडी येथील मखर पडवळवस्ती रस्ता खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने केला दुरुस्त.
मंचर-
मागील अनेक दिवसापासून आंबेगाव तालुका चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसामुळे अनेक गावचे रस्ते खराब झाले असून.पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील मखर पडवळवस्ती हा रस्ता खराब झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे मागणी स्थानिक ग्रामस्थ करत होते.या माघनी नुसार खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त केला असून त्यामुळे मखर पोखरकरवस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांना होणारा अडथळा दूर झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यभरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आंबेगाव तालुक्यातही चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे.पोंदेवाडी गावातही या पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत.पोंदेवाडी येथील मखरवस्ती पडवळवस्ती हा रस्ता पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. हा रस्ता मातीचा असल्याने यावर खड्डे पडले होते तसेच पाणीही साचले होते.त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होत होता. म्हणून येथील नागरिकांनी सदर रस्त्याची बाबत अडचण खरेदी विक्री संघाचे माझी अध्यक्ष अनिल वाळूंज यांना सांगितली.

सध्या राज्यातील एकुण ग्रामपंचायी पैकी अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक असल्याने अनेक विकास कामे करण्यासाठी वेळ जात आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी स्वखर्चाने जवळपास दीड लाख रुपये खर्च करून ट्रॅक्टर डंपर जेसीबीच्या साह्याने रस्ता दुरुस्त केला. त्यामुळे येथील नागरिकांनी जाणे येण्याची सोय झाली असून नागरिकांनी रस्ता दुरुस्त झाल्याने दोन्ही व्यक्तींचे आभार मानले आहे.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
