Connect with us

सामाजिक

धामणीच्या म्हाळसाकांत मंगल कार्यालयात ३१ विविध सोहळे समारंभाचे कार्यक्रम संपन्न.

Published

on

निरगुडसर (राजु देवडे)
पुणे,नगर व नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाच्या मंदिरासमोर लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या “कुलस्वामी” हाॅलमध्ये मागील दोन वर्षात (२०२२ व २०२३)तीस साक्षीगंध.साखरपुडा आणि विवाह सोहळे संपन्न झाले असल्याची माहीती ग्रामस्थ व खंडोबा देवाच्या सेवेकरी मंडळीनी दिली श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान
येथील कुलस्वामी हाॅल पंचक्रोशीतील भाविकांच्या व ग्रामस्थाच्या मुलामुलींच्या लग्नकार्याला व धार्मिक कार्यक्रमाला विनामूल्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय धामणी ग्रामस्थांनी घेतलेला आहे . हाँलच्या शेजारी देवाच्या दर्शनासाठी व मंदिरात धार्मिक कुलधर्म कुलाचार कार्यक्रम व देवकार्य करण्यासाठी येणार्‍या भाविकांसाठी व विवाह सोहळा कार्यक्रमासाठी येणार्‍या वर्‍हाडी मंडळीसाठी भव्य भोजन हाॅल,वधूवर कक्ष,स्वच्छतागृहे.व आकर्षक प्रवेशद्बार बांधण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती धामणी ग्रामस्थ व खंडोबा देवस्थानांचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत यांनी सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त.

Published

on

मंचर-

लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील कै. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयासाठी सुपूर्त केली असल्याचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांनी सांगितले.

न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेस लाखणगावचे सुपुत्र व पुणे विभागाचे कामगार आयुक्त बाळासाहेब वसंत वाघ यांनी त्यांचे वडील स्व. वसंत मनाजी वाघ (गुरुजी) व आई आदर्श शिक्षीका कै. प्रमिला वसंत वाघ यांच्या स्मरणार्थ ५१००० रुपयेची रक्कम शाळेच्या ग्रंथालयाच्या एफ.डी.साठी सुपूर्त केली आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आलेले वर्षाचे व्याज रक्कमेचे स्पर्धा परीक्षा पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी खरेदी करण्यात येनार आहेत.आणि वाघ परिवारातील सदस्यांच्या वतीने शाळेकडे ग्रंथालयात जमा करण्यात येतील.यावेळी चंद्रकांत बो-हाडे पाटील उपस्थित होते

Continue Reading

सामाजिक

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या विद्यार्थिनींना रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

Published

on

  मंचर-
     राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने नांदी फाउंडेशन, पुणे च्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना रक्कम रुपये 45000/- किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे किटस् चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले. 

यात शूज, सॉक्स, टी-शर्ट, वही, पेन, व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती. नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली. यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

सामाजिक

अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर वाढलेली झाडे झुडपे काढावीत, अंकिता वाळुंज यांची माघणी.

Published

on

मंचर-

आंबेगाव तालुक्यातील नागापूर, पारगाव ,काठापुर बुद्रुक ,पोंदेवाडी या गावातून जाणाऱ्या ओझर ते रांजणगाव या अष्टविनायक महामार्गावर रस्त्याच्या कडेला साईड पट्टीवर तसेच चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे काढावीत अशी मागणी अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

नागापूर पारगाव काठापुर बुद्रुक पोंदेवाडी या गावांमधून ओझर ते रांजणगाव हा अष्टविनायक महामार्ग जातो हा महामार्ग झाल्याच्या नंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे .अनेक वाहन चालक या रस्त्याचा वापर करतात सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे.त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामुळे या परिसरात ऊस तोडणी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक वाढली आहे परंतु या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवर व खालील चारामध्ये अनेक झाडे झुडपे वाढली आहेत हे झाडे झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना वळणाच्या ठिकाणी वाहन काही वेळेस डांबरीच्या खाली घेता येत नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एकंदरीत या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे संबंधित विभागाने काढावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ नागरिक करत आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending