Connect with us

शेतीशिवार

हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना होनार फायदा.

Published

on

हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना याचा फायदा होणार असून. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या परिसरातील विहीर ओढे नाणल्यांचे पाणी कमी झाले होते. त्यामुळे या ठिकाणची शेती पिके सुकू लागली होती. या संदर्भात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सहकार मंत्र्यी दिलीप वळसे पाटील यांनी पाणी सोडण्याच्या सुचना केल्या. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे.

आंबेगाव तालुका आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारे हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा उजवा कालवा.हा येथील शेती पिकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे धरणाच्या उजव्या कालव्यावर मोठ्या प्रमाणावर गावे बागायती झाली असून. या ठिकाणची शेती बारमाही बागायती झाली आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे या परिसरातील शेती पिके पाण्याअभावी सुकू लागली होती. तसेच अनेक पाणी योजनाही पाणी कमी झाल्याने बंद होण्याच्या मार्गावर आल्या होत्या. त्यामुळे एकंदरीतच पाण्याची परिस्थिती गंभीर बनली होती .या संदर्भात शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे डिंभे धरणातुन पाणी सोडावे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर वळसे पाटील यांनी संबंधित विभागाला याबाबत सूचना केल्याने सध्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले आहे.

धरणाच्या उजव्या कावव्याला पाणी आल्याने सुकू लागलेली शेती पिकांना जीवदान मिळणार असून .या ठिकाणच्या विहीरी नाले ओढ्यांना पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्याचाच फायदा येथे शेतीबरोबरच जनावरांचा चारा पिके त्याचप्रमाणे जनावरांचे पिण्याचे पाणी व येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. एकंदरीतच यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

डिंभे उजव्या कालव्याला पाणी आल्याने शेतकरी समाधानी

Published

on

लोणी धामणी-डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) यातून डिंभा उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 50 गावांना फायदा होणार असून .सुकू लागलेल्या शेती पिकांना जीवनदान मिळणार आहे.त्यामुळे येथील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आंबेगाव तालुक्यात असणारे डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू जलाशय व या जलाशयात साठणाऱ्या पाण्यावर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेती पिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड या तालुक्यांना व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथपर्यंत या धरणाच्या पाण्यावर शेतीला पाणीपुरवठा केला जातो.डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डिंभे पासून तर खडकवाडी पर्यंत व शिरूर तालुक्यातील सविंदने पासून सोने सांगवी पर्यंतच्या गावांना पाणीपुरवठा होत असतो. त्याचप्रमाणे डाव्या कालव्यावर आंबेगाव तालुक्यातील व जुन्नर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होतो.तर डाव्या कालव्यातून हे पाणी येडगाव धरणात जाऊन तेथून ते अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांना ही जात असते. सध्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्या खालील गावांमध्ये शेती पिकांना पाणी टंचाई निर्माण झाली होती.अनेक शेती पिके पाण्याअभावी सुकू लागली होती.तळी ओढे आटले होते. त्यामुळे या भागातील शेतकरी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी करत होता.हि मागणी मान्य करून डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले असून. या पाण्याचा फायदा उजवा कालव्याच्या खाली असणाऱ्या 50 गावांच्या शेती पिकांना होणार आहे. तसेच विहिरींची पाणी पातळीत वाढ झाल्याने याचा फायदा पुढील अनेक दिवस होणार आहे .त्यामुळे डिंभे धरनाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापुर बुद्रुक मधे माघील पाच दिवसात उस जळण्याच्या तिन घटना घडल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

Published

on

लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे

काठापुर बुद्रुक मधे माघील पाच दिवसात उस जळण्याच्या तिन घटना घडल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

काठापूर बुद्रुक या ठिकाणी विजेच्या तारांमध्ये झखलेल्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत पांडुरंग सिताराम करंडे यांचा सव्वा एकर ऊस जळाला असून ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसात तिसरी तर महिनाभरातील ही चौथी घटना आहे.

काठापूर बुद्रुक मध्ये विजेच्या तारांमुळे उस जळण्याचे वाढलेले प्रमाणाने येथील ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला असून वीज वितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात गावातील सर्वच विज वाहक तारा आणि खांबळे यांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी. अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

काठापूर बुद्रुक गावातील गट नंबर 89 मध्ये 50 गुंठे क्षेत्रावर पांडुरंग सिताराम करंडे यांनी ऊस पिकाची लागवड केली होती. या उसाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे उस जळून गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अजून एक महिनाभर कारखाने सुरू होणार नाही त्यामुळे हा ऊस तोडून ही जाणार नाही .परिणामी एक महिन्यात ऊस वाळून जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होनार आहे एकंदरीत काठापुर बुद्रुक गावातील असणारे खांबा व त्यामधील जास्त अंतर त्यामुळे पडलेले झोळ. तसेच मोठ्या संख्येने असनारे विजेचे खांब व विजेच्या तारांची मोठ्या प्रमाणावर असलेले संख्या यामुळे अपघात होत असतात. परंतु मागील पाच दिवसात तिसरी घटना झाल्याने नक्की वीज पुरवठा होत असताना तांत्रिक बिघाड तर होत नाही ना. अशी शंका नागरिकांना येत आहे. कारण लाईट जाण्याचे प्रमाणही वाढले आहे .

सध्यातरी ऊस जळण्याचे प्रमाण वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.काठापुर बुद्रुक बारमाही बागायती गाव असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाची शेती केली जाते.आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. परंतु मागील पाच दिवसात तिसरी तर महिन्यातील चौथी घटना असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.वीज वितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात काठापुर गावात सर्वेक्षण करून विजेच्या तारांची उंची वाढवावी ज्या ठिकाणी खांबळयातिल अंतर जास्त आहे तेथे नवीन खांब बसवावे जर वीज वितरण कंपनीने यावर तोडगा काढला नाही.तर काठापूर बुद्रुक ग्रामस्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने वीज कंपनीवर मोर्चा नेण्यात येईल.असे शेतकऱ्यांनी सांगितले.
सदर ठिकाणी सरपंच अशोक करंडे, माझी उपसरपंच विशाल करंडे, पोलीस पाटील अमोल करंडे,यांनी भेट दिली.उस उत्पादक शेतकरी पांडुरंग करंडे व नवनाथ करंडे यांनी संबंधित विभागाने पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथे पुन्हा उसाला आग शेतकऱ्यांचे नुकसान.

Published

on

लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे

काठापूर बुद्रुक या ठिकाणी विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीत अडीच एकर ऊस जळाला असून मागील चार दिवसातील दुसरी तर महिनाभरातील तिसरी घटना असल्याने. त्याच प्रमाणे कारखाने सुद्धा अजून महिनाभर सुरू होणार नसल्याने.शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून.या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक या ठिकाणी शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान सर्किट होऊन.गट नंबर 139 मधील शेतकरी बबन फकीरा करंडे यांचा सव्वा एकर व परशुराम फकीरा करंडे यांचा सव्वा एकर ऊस जळून गेला आहे. मागील चार दिवसांपूर्वी काठापूर बुद्रुक या ठिकाणी 10 एकर ऊस जळून गेला होता पुन्हा एकदा अडीच एकर ऊस जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.यापूर्वीही असाच ऊस जळाला होता. त्यामुळे मागील महिन्यातील ही तिसरी घटना आहे. ऊसाला लागणाऱ्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काठापूर बुद्रुक या ठिकाणी असणाऱ्या सब स्टेशन वरून परिसरातील गावांना वीज पुरवठा होतो. त्याचप्रमाणे काठापूर बुद्रुक येथे वीज पुरवठा होतो या ठिकाणी असणाऱ्या विजेच्या तारा व खांब अनेक वर्षांपूर्वीचे असल्याने अनेक ठिकाणी झोळ आले आहेत.पूर्वी पाण्या अभावी या परिसरातील शेती हंगामी बागायती होती त्यामुळे विजेचे खांब हे शेतातून गेले आहेत. अनेक ठिकाणी वाढलेला ऊस हा तारांपर्यंत पोहचतो होतात. त्यामुळे काठापूर बुद्रुक गावातील वीजवाहक तारांची उंची वाढवून नवीन खांब टाकावेत अशी मागणी होत आहे. सदर घटनेचा पंचनामा तलाठी जितेंद्र शेजुळ यांनी केला असुन. वीज वितरण कंपनीचे अधिकारी ,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी, सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे पोलीस पाटील अमोल करंडे,सुदर्शन करंडे यावेळी उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement

Trending