गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथे 25 विद्युत पंपांची केबल चोरीला शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/06/IMG_20260601_095625005_HDR-1000x600.jpg&description=काठापुर बुद्रुक येथे 25 विद्युत पंपांची केबल चोरीला शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/06/IMG_20260601_095625005_HDR-1000x600.jpg&description=काठापुर बुद्रुक येथे 25 विद्युत पंपांची केबल चोरीला शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर-
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव या ठिकाणी घोड नदीच्या काठावर असणाऱ्या 25 विद्युत पंपांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.ऐन उन्हाळ्यात शेती पिकांना पाण्याची गरज असताना केबल चोरीला गेल्याने तसेच शेतीमालांना बाजारभाव नसताना आर्थिक अडचणीत नवीन केबल कशी खरेदी करायची या विवंचनेत शेतकरी आहे. या चोरांचा बंदोबस्त कसा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक या ठिकाणी घोड नदीवर कोल्हापूर पद्धतीचा तालुक्यातील सर्वात मोठा बंधारा आहे.या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असल्याने या ठिकाणावरून उजव्या काठावरुन काठापुर बुद्रुक लाखनगाव पोंदेवाडी पारगाव या गावांतील शेतकरी शेतीसाठी पाणी उससा करतात.सध्या या ठिकाणी जवळपास 85 विद्युत पंप एकाच ठिकाणावर आहेत.या ठिकाणी असणारे विद्युत पंपांच्या मोटरच्या खोकल्यापासून तर मोटर पर्यंत असणाऱ्या केबल चोरीला गेल्या आहेत. जवळपास 25 शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. या ठिकाणी शेतकरी कुंडलिक भाऊ जोरी,संतोष नाथा शेटे ,सखाराम दिनकर ढमाले,देवराम सखाराम वायाळ,रामदास गोविंद जोरी,गुलाब दत्तात्रय करंडे,अशोक अनंता जोरी ,रामदास बाबुराव रोडे,देविदास नामदेव भाटे,किशोर कचरदास करंडे,दत्तात्रय दामाजी करंडे,कान्हु संतु करंडे,राहुल मल्हारी भुरके,बजरंग सिताराम करंडे,विनायक रघुनाथ करंडे,बारकु बाबुराव करंडे ,प्रमोद वाळुंज ,बबनराव वाळुंज ,ज्ञानेश्वर काकडे,नाथा येसु करंडे या व इतर शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

प्रत्येक शेतकऱ्याचे किमान दहा ते पंधरा हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला व तरकारी पिकांना बाजार भाव नाही अशा परिस्थितीतही शेतकरी शेतात राबवत असतो. त्याचप्रमाणे सध्या मोठ्या प्रमाणावर ऊन पडत असल्याने शेतीत उभी असणारी पिके ही केबल चोरीमुळे जळून जाणार आहेत. त्यामुळे एकंदरीत दोन्ही बाजूने शेतकरी वर्ग अडचणीत आल्याने आता करायचे काय हा प्रश्न शेतकरी विचारात आहेत.पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदर चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
याआधी या ठिकाणावरून पाच वेळा केबल चोरीच्या घटना घडल्या असल्याने वारंवार जाणार्या केबल चोरीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.
गावागावातुन
पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.
मंचर-
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.
याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.
गावागावातुन
तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा
मंचर प्रतिनिधी :
गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.
“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.
गावागावातुन
लाखनगाव वनक्षेत्रात अवैध मुरूम उत्खनन; जेसीबी जप्त
मंचर-
लाखनगाव येथील वनक्षेत्रातील फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र. २५२ मध्ये रात्रीच्या सुमारास विनापरवाना प्रवेश करून जेसीबीच्या सहाय्याने मुरूम उत्खनन सुरू असल्याची घटना वन विभागाच्या पथकाने उघडकीस आणली.
दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १.१५ वाजता वन विभागाचे पथक नियत क्षेत्रात गस्त व तपासणी करीत असताना वनक्षेत्रात जेसीबी मशीनच्या सहाय्याने मुरूम उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तात्काळ कारवाई करत सदर जेसीबी मशीन ताब्यात घेतले. यावेळी जेसीबी चालक घटनास्थळावरून फरार झाला.
घटनास्थळी पंचनामा करून जप्त करण्यात आलेले जेसीबी मशीन सुरक्षिततेच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र कार्यालय, मंचर येथे आणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सदर जेसीबी मशीन हे राजेश रमेश गडकर, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वनक्षेत्रातील मुरूमाचे विनापरवाना उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांविरुद्ध वन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर तसेच विकास भोसले वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम चव्हाण वनपाल धामणी; पूजा कांबळे वनरक्षक लाखनगाव, अशोक जाधव व रामदास वळसे, बिबट शीघ्र कृती दल, गावडेवाडी यांच्या पथकाने केली.
वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत उत्खनन, अतिक्रमण अथवा अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
