शेतीशिवार
भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/03/1002159354-1000x600.jpg&description=भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/03/1002159354-1000x600.jpg&description=भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर-
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२६-२७ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी २५ मे पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, ऊस लागवडीसाठी २५ मे २०२६ ते ३१ मार्च २०२७ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम. ०२६५ व दि.२५ मे २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत को.८६०३२ उस लागवडीस व नोंदीस परवानगी दिलेली आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत व्हि.एस.आय. ०८००५ ऊस लागवडीस, दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत एम.एस.१०००१, फुले ९०५७ ऊस लागवडीस तसेच दि.१ जून २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत को.व्हि.एस.आय.१८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम.११०८२ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि.२५ मे २०२६ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि. २५ जून २०२६ पर्यंत कधीही लागवड केलेल्या ऊस रोपांची ऊस नोंद दि. २५ मे २०२६ नोंद तारीख राहील. त्यानंतर रोपांपासून ऊस लागवड केलेल्या उसाची नोंद १ महिना अगोदर केली जाईल व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पुर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतक-यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसला येवून ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२० या उधारीने / रोखीने राबविणेत येणा-या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएस.आय.चे मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमिक अॅसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशक बी.व्ही.एम., ई.पी.एन. इ.चा पुरवठा करण्यात येईल, हंगामवार ऊस पिक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घेणेत यावा. ऊस पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक शेतक-यांनी आपले प्रवेश शुल्क रु.१००/- डिसेंबर २०२६ अखेर भरुन नाव नोंदणी करावी.
एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतक-यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे माहे जून २०२६ अखेर खरेदी केले जाणार असून शेतक-यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक कीड नियंत्रण करावे.
तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतक-यांनी ऊसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
राजकीय
डिंभे-माणिकडोह बोगद्यास विरोध कायम; आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही! माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्ट मत; मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडली भूमिका
मंचर –
मुंबई येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या रु. ५७०४.५० कोटी रुपयांच्या प्रस्तावास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) देण्यात आल्याचे समजते. या सुधारित मान्यतेमध्ये मूळ कुकडी प्रकल्पात समाविष्ट नसलेल्या डिंभे-माणिकडोह या बोगद्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयाची तातडीने दखल घेत आमदार दिलीप वळसे पाटील यांनी लागलीच मुख्यमंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बोगद्याबाबत आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील जनतेचा व शेतकऱ्यांचा असणारा तीव्र विरोध मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.
या भेटीदरम्यान मा. वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, सदर बोगद्यामुळे या परिसरातील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच दिनांक १८ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री (कै. अजितदादा पवार) यांच्या समवेत व मा. वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगदा न करण्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन या प्रसंगी निर्दर्शनास आणुन दिले. या सर्व बाबी लक्षात आणून देत मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या संदर्भातील निवेदन/पत्र मा. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आले.
वळसे पाटील यांच्या भूमिकेची दखल घेत मा. मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये बदल करण्याचे आणि आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ न देण्याचे आश्वासन दिले आहे.
गावागावातुन
पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.
मंचर-
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.
याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.
गावागावातुन
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू होणार.माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती.
मंचर-
- आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच शेतकरी अपघात विमा योजना सुरू होणार आहे. या योजनेस महाराष्ट्र शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असून, याबाबतचे पत्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहे. अशी माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बाजार समितीमध्ये नियमित शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या तरतुदीनुसार पूर्वमान्यता देण्यात आली आहे.
सर्व अटी व शर्तींची पूर्तता झाल्यानंतर योजनेला अंतिम मान्यता देण्याबाबतचे सविस्तर आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन12 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
