शेतीशिवार
आंबेगाव तालुक्यात भुईमूग काढणी सुरू,उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांना 50 ते 55 रुपये किलो असा बाजार भाव.
मंचर प्रतिनिधी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू झाली असून उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांना 50 ते 55 रुपये किलो असा बाजार भाव मिळत असल्याने भुईमुगाच्या शेंगांना चांगला बाजार भाव आहे.परंतु माघील दिड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भुईमुगाच्या शेंग खराब झाल्या व काही शेंगांना मोड आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव काठापुर जारकरवाडी लाखनगाव देवगाव पोंदेवाडी आधी गावांमध्ये उन्हाळ्यात अनेक तरकारी पिके घेतली जातात या ठिकाणी शेतकरी उन्हाळ्यामध्ये भुईमूग पिकाची लागवड करत असतो .या भुईमुगाची काढणी जुन महिन्यात सुरू होते. आषाढी एकादशीमुळे त्याच प्रमाणे पावसामुळे भुईमुगाच्या शेंगांना चांगल्या प्रकारची मागणी या महिन्यात असते. परिणामी यावेळेस हमखास भुईमूगाच्या शेंगांना बाजारभाव मिळत असतो.त्यामुळे उन्हाळ्यात शेतकरी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या ठिकाणी भुईमूग पिकाची लागवड करत असतात.तसेच उन्हाळ्यात लागवड केलेल्या भुईमुगाचे उत्पन्नही चांगले होत असल्याने व चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे.
याही वर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात भुईमूग पिकाची लागवड केली होती या भुईमुगाची काढणी सध्या सुरू झाली असून. चांगला बाजार भाव मिळत आहे सध्या भुईमूगाच्या शेंगांना 50 ते 55 रुपये प्रति किलो असा बाजार भाव मिळत आहे.परंतु यावर्षी मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजून सुरू च आहे त्याचा फटका या भुईमुगाच्या शेंगांनाही झाला. कारण भुईमुगाच्या शेंगा या पावसामुळे सडून गेल्या आहेत.भुईमूग उपटताना या शेंगा शेतातच राहतात. परिणामी या भुईमूगापासून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट होणार आहे. त्याचप्रमाणे सध्या पावसामुळे वावरात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने अनेक भुईमुगाच्या शेंगांना मोड आले आहेत. सध्या ओल असल्याने काढणीसही त्रास होत आहे. त्यामुळे मजुरीचा खर्चही वाढला आहे.परंतु अशाही परिस्थितीत भुईमुगाच्या शेंगांना अजुन मोड येऊ नयेत म्हणून शेतकरी भुईमुग काढूनी करत आहे. सध्या भुईमूगाच्या शेंगांना चांगला बाजारभाव मिळत असला तरीही. पावसामुळे बसलेला फटका व सध्या मोठ्या प्रमाणावर लागणारे मजूर यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या हातात म्हणावा तेवढा नफा येत नसल्याचे शेतकरी पांडुरंग करंडे म्हनाले.
पावसामुळे बसलेला फटका व सध्या मोठ्या प्रमाणावर लागणारे मजूर यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या हातात म्हणावा तेवढा नफा येत नाही. पांडुरंग करंडे शेतकरी.
काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील शेतकरी नवनाथ करंडे यांची भुईमूग काढणी सुरू असुन जास्त प्रमाणावर मुजुर लागत असल्याने मजुरी खर्च वाढल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे सध्या भुईमुगाच्या शेंगांना चांगला बाजार भाव मिळत असला तरी निघणारे उत्पन्न होणारा खर्च पाहता शेतकर्यांच्या हातात काहीही लागत नसल्याचे दिसून येत आहे.
गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक, लाखनगाव,धामणी, निरगुडसर,लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी,व परिसरातील रस्ते व इतर समस्या लवकर दुर होतील.विवेक पाटील यांची माहिती.
मंचर- आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक, लाखनगाव,धामणी, निरगुडसर,लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी,व परिसरातील रस्ते व इतर समस्यांबाबत जुन्नर (ता. जुन्नर) या ठिकाणी नुकतीच बैठक पार पडली यावेळी या बैठकीत सदर रस्त्यांच्या बाबतीत विषयांवर वनविभागचे पूर्ण सहकार्य करेल व या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला जाईल असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी सांगितले.

माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (अध्यक्ष, म्हाडा, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग हद्दीतील काही रहदारीच्या रस्त्यांबाबत आलेल्या अडी-अडचणीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत खाडे (उपवनसंरक्षक, जुन्नर उपविभाग, जुन्नर) यांसमवेत विविध विषयांवर बैठक पार पडली.

यामध्ये काठापूर बु. येथील वैदवाडी-पोंडेवाडी रोड ते डिंभा उजवा कालवा कार रस्ता, लाखणगाव रोड ते काकडे-भुमकर वस्ती रस्ता वैदवाडी-पोंडेवाडी रोड ते डिंभा उजवा कालवा (पीरसाहेब मंदिर मार्गे) रस्ता करणे,लाखणगाव येथे कवठे रोड ते पाटील-तागडवस्ती रस्ता करणे, धामणी येथे मधलामळा ते स्मशानभूमी (बायपास मार्ग) रस्ता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या पाईप लाईन बाबत मार्ग काढणे,निरगुडसर, बेलसरवाडी येथे स्थानिक शेतकऱ्यांना वनविभाग हद्द निश्चित करणे. तसेच आदिवासी भागातील वनविभाग बाबत विविध अडचणी, लोणी येथून वडगावपीर, मांदळेवाडी गावासाठी वनविभाग परवानगीने विद्युत वाहक पोल उभे करणे, महाळुंगे पडवळ येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या पाईप लाईन ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करुन आवश्यक निधी देखील उपलब्ध करुन पुर्ण केले जाईल, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी सभापती संजय गवारी, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र करंजखेले, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले, सार्व. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.मोरे, मंचर महावितरण विभागाचे अधिकारी तसेच लाखणगाव येथील माऊली पाटील,धामणीचे सरपंच अक्षय विधाटे,काठापूर बु. गावचे मा.उपसरपंच विशाल करंडे, सुधीर भुमकर, बाळासाहेब करंडे, महीपत टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावागावातुन
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.
मंचर-
पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.
गावागावातुन
पिंपरखेड ता. शिरूर येथे बिबट्याच्या हल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी केला रोडेवाडी फाटा येथे बेल्हा जेजुरी व अष्टविनायक महामार्गावर रास्ता रोको.
निरगुडसर-
पिंपरखेड तालुका शिरूर या ठिकाणी बिबट्याने केलेले हल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रोडेवाडी फाटा पोंदेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी बेल्हा जेजुरी व अष्टविनायक महामार्ग रोखुन धरला.
रात्री सात वाजता या परिसरातील अनेक गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले व रास्तारोको आंदोलन केले.या परिसरात वाढलेल्या बिबट्याचा उपद्रव आणि त्यामुळे होणारे नागरिकांवरील हल्ले. जनावरंवरील हल्ले याचा उद्रेक झाला.

रोडेवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड या तालुक्यांमध्ये सध्या एक हजार पेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती वन विभागाच्या काही अधिकार्यांनी नाव खाजगीत दिली आहे. त्यामुळे या परिसरात प्रत्येक गावात चार ते पाच बिबट्यांची संख्या आहे.बिबट्यांचा वावर वाढला असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रोजच कुठे ना कुठे जनावरण तसेच माणसे यांवर हल्ले होत आहेत.पिंपरखेड जांबुत या ठिकाणी मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू झाल्याने परिसरात भिती आहे.त्यामुळे संतप्त नागरिकांनी रोडेवाडीफाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम,दामुआण्णा घोडे, शिवसेना (उबाठा)चे सुरेश भोर, सुभाष पोकळे, शेतकरी संघटनेचे माऊली बोंबे,यांसह परीसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन4 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
