Connect with us

सामाजिक

काठापुर बुद्रुक ते पोंदेवाडी रस्त्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निधी मंजूर.

Published

on

निरगुडसर-

काठापुर बुद्रुक ते पोंदेवाडी ता.आंबेगाव या दोन गावांदरम्यान असनार्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत साडेपाच कोट रुपये निधी मंजूर झाल्याने काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी या दोन्ही गावांमधील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक ते पोंदेवाडी या दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत साडेपाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. काठापुर बुद्रुक गावठाणा पासून सुरू होऊन पोंदेवाडी स्मशानभूमी पर्यंत पाच ते साडेपाच किलोमीटर अंतरापर्यंत हा रस्ता होणार आहे.सध्या काठापुर पोंदेवाडी परिसरातून अष्टविनायक महामार्ग तसेच पोंदेवाडी या ठिकाणावरून बेल्हा जेजुरी महामार्ग गेल्याने या परिसरातील वाहनांची वाहतूक वाढली आहे.काठापुर पोंदेवाडी दरम्यान असणारा रस्ता हा खराब झाला होता. तसेच रस्त्याचे रुंदीकरणही कमी होती त्यामुळे वाहतुकीस अनेक वेळा अडथळा यायचा.हा रस्त्या मंजूर झाल्याने अनेक प्रश्न सुटणार असल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले.

काठापुर गावठाण ते जोडीवस्ती दरम्यान असणारा रस्ता खोलगट भागातून असल्याने या ठिकाणी कायमच पाणी या रस्त्यावर यायचे.त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल व्हायचे.त्यामुळे सध्या मंजूर झालेला सिमेंट काँक्रेटच्या रोडमुळे या ठिकाणी येणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. असे सरपंच अशोक करंडे यांनी सांगितले.
तसेच या दोन गावात दरम्यान हा रस्ता झाल्याने या ठिकाणच्या शेती पिकांचे वाहतुकीसाठी या रस्त्याचा फायदा होणार आहे.त्यामुळे एकंदरीतच काठापूर बुद्रुक ते पोंदेवाडी रस्ता मंजूर झाल्याने येथील शेतकऱ्यांनी ग्रामस्थांकडून राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांचे आभार मानले आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.

Published

on

‌‌मंचर-

      देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
    गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
Continue Reading

सामाजिक

अजामेळा दिंडीचे गावडेवाडी येथून प्रस्थान

Published

on


मंचर-
‌‌संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अजामेळा दिंडी कृ २६ चे .आदर्श गाव गावडेवाडी (ता आंबेगाव ) येथून पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवण्यात आले अशी माहीही दिंडी क २६ चे प्रमुख ह .भ .प. मधुकर महाराज गायकवाड व दिंडीचे चोपदार मधुकर महाराज साळवे यांनी दिली.


आळंदी प्रशासनाने दिंड्यांनी आळंदीत येऊ नये अशी आवाहन केल्याने अजामेळा दिंडीने या सूचनेला प्रतिसाद देऊन गावडेवाडी येथून गुरुवारी (ता .९ ) वारकऱ्यांच्या उपस्थितीत गावडेवाडी येथे छत्रपती शिवाजी चौकात पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले .यावेळी दिंडीचे संस्थापक वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड व सुभद्राबाई निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ . पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र रामदास गावडे,कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी गावडेवाडीचे ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते पुंडलिक वर देव हरी विठ्ठल च्या गजरात दिंडीने प्रस्थान ठेवले यावेळी मच्छिंद्र शेठ गावडे, ऋषिकेश गावडे, संतोष गावडे, ह भ प सुरेश महाराज गावडे, ह भ प बाळू बुवा शेळके ,ह भ प ज्ञानेश्वर गावडे, ह भ प लहू महाराज गावडे ,मंदाताई गावडे ,सविता मधुकर गायकवाड ,त्याचप्रमाणे कमलादेवी मळ्यातील बहुसंख्य तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉ प्रतिक गायकवाड प्रा.शीलाताई पांडुरंग गायकवाड तसेच महिला चांगुणाबाई शेळके, कौसाबाई टाव्हरे, हरणाबाई टाव्हरे, सुनील महाराज राजगुरू, बाळू महादू राजगुरू ,वाहन चालक कैलास पडवळ,चालक बाबाजी गव्हाणे आदींनी दिंडीला सहाय्य केले.

यावेळी गावडेवाडी ग्रामस्थांनी सर्वांना दिंडी ला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये भिवाजी उमाजी गावडे ,अनाजी मारुती गावडे ,नरेंद्र गावडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र गावडे ,माजी सरपंच देवराम गावडे, संतोष गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या वतीने दिंडीला शुभेच्छा दिल्या

आदर्श गाव गावडेवाडी (ता . आंबेगाव ) येथून माऊलींच्या पायी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अजमेळा दिंडी क्रमांक २६ ने प्रस्थान ठेवले

Continue Reading

सामाजिक

काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मोठे नुकस घरे,गोठे,यांचे पत्रे उडाले.नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.

Published

on

मंचर –

काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव या ठिकाणी साडे चार ते पाच वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरे,गोठे, यांचे पत्रे उडाले आहेत.अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने नुकसान झाले आहे. अनेक झाडेझुडपे ही रस्त्यावर पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आलेल्या वादळाने काठापुर बुद्रुक मधे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे शासनाने करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.


आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी येथे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर वादळ आल्याने मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरांची कौले पत्रे उडून गेली आहेत कांदा चाळीचे ही पत्रे कवले उडून गेले आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने घरे व गोठे यांचे नुकसान झाले आहे. कांदा चाळींवर विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर पडली असून त्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच काठापुर बुद्रुक या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आलेल्या वादळाने झालेल्या नुकसानीची शासनाने या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.


ओढ्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. एकंदरीतच परिस्थिती पाहता काठापुर बुद्रुक या ठिकाणी झालेला पाऊस व वादळ याचा मोठ्या प्रमाणावर फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62