Connect with us

शैक्षणिक

महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाला ‘ए’ श्रेणी

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी -(राजु देवडे)

महाळुंगे पडवळ : महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालया व श्री.वि. ग. कापुसकर कनिष्ठ महाविद्यालयाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनला आहे. ‘ए’ श्रेणी प्राप्त झाल्याने शिक्षक, पालकांची जबाबदारी वाढली आहे, असे मत प्राचार्य साहेबराव काळे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे शाळा मूल्यांकना व स्तर निश्चिती मध्ये हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाला ‘ए’ श्रेणी प्राप्त झालेली आहे. हे विद्यालय आंबेगाव तालुक्यातील चतुर्थ ठरले आहे, तर पुणे जिल्ह्यातून या विद्यालयाने ३३ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते व शिक्षण उपसंचालक अहिरे, माध्यमिकचे शिक्षण अधिकारी कमलाकर म्हेत्रे, प्राथमिकच्या0 शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहायक विभागीय अधिकारी शंकर पवार, रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव उत्तम आवारी आदींच्या उपस्थितीत प्राचार्य साहेबराव काळे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सोहळा कामशेत (ता. मावळ) येथील सुमन रमेश तुलसाणी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणामध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पार पडला. मुख्याध्यापकजाधव डी.जी., डुंडे एस.के., कालेकर एस. पी., जाधव डी.डी., चासकर वाय.डी. आदी यावेळी उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.

Published

on

मंचर-

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Continue Reading

शैक्षणिक

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेच्या विद्यार्थिनीं करीता १३ सायकलचे मोफत वाटप. सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, मुंबई व ॲटलास कार्पो ग्रुप, स्वीडन यांचे सहकार्य.

Published

on

मंचर –
न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेच्या विद्यार्थिनीं करीता १३ सायकलचे मोफत वाटप. सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, मुंबई व ॲटलास कार्पो ग्रुप, स्वीडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.

कडुस ता. खेड येथील पंढरी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या इ. ८ वी च्या १३ विद्यार्थिनीना शाळेतील सायकल बँक साठी १३ सायकल मोफत मिळाल्यात. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे , उपाध्यक्ष प्रदीप रोडे पाटील, १३ विद्यार्थिनी, उपशिक्षिका कल्पना राजगुरु , मुख्याध्यापक अनिल देसले, मनोज पाटील यांनी सायकल स्वीकारल्यात.
यावेळी सीएफटीआयचे प्रमुख श्री देशपांडे यांनी विद्यार्थिनींना शाळेत येण्या-जाण्यासाठी पुढील काळात अजून भरीव मदत करणार असे आश्वासन दिले. शाळेतील विद्यार्थिनींसाठी पुढील काळात अजून सायकल देऊ असे ॲटलास कार्पोचे अधिकारी यांनी नमूद केले. शाळेत सुमारे सात ते आठ फाउंडेशन संलग्न करून विद्यार्थ्यांना नवीन नवीन शैक्षणिक सुविधा उभारत आहोत. यात पुन्हा एक सीएफटीआय फाउंडेशन ची भर पडली व पुढील काळात अजून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करू असे मुख्याध्यापक अनिल देसले यांनी सांगितले.

Continue Reading

शैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप गणेशनगर काठापुर बुद्रुक येथे आठवडी बाजाराचे आयोजन.

Published

on

मंचर-

विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप गणेशनगर काठापुर बुद्रुक येथे आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी या आठवणी बाजारात सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारची खरेदी विद्यार्थ्यांकडून केली.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील झाप गणेशनगर शाळेमध्ये आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालेभाज्या, फळे, किराणा साहित्य, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. मोठ्या प्रमाणावर पालक व ग्रामस्थांनी या पदार्थांची खरेदी केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष सचिन नरे,माजी उपसरपंच विशाल करंडे,अरविंद जाधव, सोमनाथ जाधव,रवींद्र करंडे,हौशीराम जाधव, प्रवीण शेटे, स्वप्नील शेटे,मुख्याध्यापक संजय घोटकर वि.गो.साळवे,सिमा बानखेले, संध्या करंडे,वर्षा जाधव उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement

Trending