गावागावातुन
पारगाव,दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/05/IMG-20260515-WA0008-1000x600.jpg&description=पारगाव,दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2026/05/IMG-20260515-WA0008-1000x600.jpg&description=पारगाव,दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर –
पारगाव ता.आंबेगाव तालुक्यातील पारगाव,दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या पूर्वेला राहणाऱ्या संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मुक्कामासाठी असलेल्या बापू शिंदे व बबन शिंदे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला होता.बिबट्याच्या या हल्यात दीड वर्षीय घोडीचा मृत्यू झाला होता.
या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली होती.या मागणीला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत घटनास्थळी पिंजरा लावला आहे.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, संतोष ढोबळे, वन विभाग कर्मचारी अशोक जाधव, रामदास वळसे उपस्थित होते.
मागणीची तत्काळ दखल घेतल्याबद्दल वनविभागाच्या वन मंडळ अधिकारी नीलम चव्हाण यांचे ग्रामस्थानी आभार मानले आहेत.
गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथे 25 विद्युत पंपांची केबल चोरीला शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान.
मंचर-
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव या ठिकाणी घोड नदीच्या काठावर असणाऱ्या 25 विद्युत पंपांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.ऐन उन्हाळ्यात शेती पिकांना पाण्याची गरज असताना केबल चोरीला गेल्याने तसेच शेतीमालांना बाजारभाव नसताना आर्थिक अडचणीत नवीन केबल कशी खरेदी करायची या विवंचनेत शेतकरी आहे. या चोरांचा बंदोबस्त कसा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक या ठिकाणी घोड नदीवर कोल्हापूर पद्धतीचा तालुक्यातील सर्वात मोठा बंधारा आहे.या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असल्याने या ठिकाणावरून उजव्या काठावरुन काठापुर बुद्रुक लाखनगाव पोंदेवाडी पारगाव या गावांतील शेतकरी शेतीसाठी पाणी उससा करतात.सध्या या ठिकाणी जवळपास 85 विद्युत पंप एकाच ठिकाणावर आहेत.या ठिकाणी असणारे विद्युत पंपांच्या मोटरच्या खोकल्यापासून तर मोटर पर्यंत असणाऱ्या केबल चोरीला गेल्या आहेत. जवळपास 25 शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. या ठिकाणी शेतकरी कुंडलिक भाऊ जोरी,संतोष नाथा शेटे ,सखाराम दिनकर ढमाले,देवराम सखाराम वायाळ,रामदास गोविंद जोरी,गुलाब दत्तात्रय करंडे,अशोक अनंता जोरी ,रामदास बाबुराव रोडे,देविदास नामदेव भाटे,किशोर कचरदास करंडे,दत्तात्रय दामाजी करंडे,कान्हु संतु करंडे,राहुल मल्हारी भुरके,बजरंग सिताराम करंडे,विनायक रघुनाथ करंडे,बारकु बाबुराव करंडे ,प्रमोद वाळुंज ,बबनराव वाळुंज ,ज्ञानेश्वर काकडे,नाथा येसु करंडे या व इतर शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

प्रत्येक शेतकऱ्याचे किमान दहा ते पंधरा हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला व तरकारी पिकांना बाजार भाव नाही अशा परिस्थितीतही शेतकरी शेतात राबवत असतो. त्याचप्रमाणे सध्या मोठ्या प्रमाणावर ऊन पडत असल्याने शेतीत उभी असणारी पिके ही केबल चोरीमुळे जळून जाणार आहेत. त्यामुळे एकंदरीत दोन्ही बाजूने शेतकरी वर्ग अडचणीत आल्याने आता करायचे काय हा प्रश्न शेतकरी विचारात आहेत.पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदर चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
याआधी या ठिकाणावरून पाच वेळा केबल चोरीच्या घटना घडल्या असल्याने वारंवार जाणार्या केबल चोरीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.
गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सावकार कोंडीबा दौंड या शेतकऱ्याची दोन एकर क्षेत्रावरील केळी भुईसपाट, लाखो रुपयांचे नुकसान. नुकसान भरपाईची मागणी.
मंचर-
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखनगाव ,काठापूर बुद्रुक, पोंदेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सावकार कोंडीबा दौंड या शेतकऱ्याची दोन एकर क्षेत्रावरील केळी भुईसपाट झाली असुन दोन लाख रुपये भांडवली खर्च व एक महिन्यानंतर सुरू होणारे उत्पन्न हे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शेतकरी सावकार कोंडीबा दौंड यांनी दोन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती.यासाठी मल्चींग पेपर व ठीबक सिंचन चा वापर केला होता.दोन एकर क्षेत्रावरील केळी ची काढणी एक महीन्याने सुरू होनार होती. परंतु अवकाळी आलेल्या वादळी वारा व पावसाने संपूर्ण केळीची बाग भुईसपाट झाली आहे.त्याचबरोबर इतर तरकारी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सध्या तरकारी पिकांना बाजार भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी केळी पिकाकडे वळला आहे केळी पिकाला एकरी एक लाख रुपये खर्च येतो मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करून शेतकरी केळी पिकाची लागवड करत असतात परंतु अशा आसमानी संकटामध्ये केळी भुईसपाट झाल्याने करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यापुडे उभा आहे.

अनेक तरकारी पिके या वादळ व पावसाने भुईसपाट झाली आहे.प्रशासनाने पंचनामे सुरू केले असले तरी.पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई साठी होणारी दिरंगाई व अल्प प्रमाणात मिळणारे नुकसान भरपाई यामुळे शेतकऱ्यांचा शासनावर विश्वास नाही. त्यामुळे शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांना त्वरित व चांगली योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
गावागावातुन
लाखनगाव ता. आंबेगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकरी जयसिंग ज्ञानेश्वर रोडे यांच्या गुरांचे शेड पडले.घोडी व गाई मृत्यूच्या दारात. पाच लाख रुपयेचे आर्थिक नुकसान, नुकसान भरपाई मिळावी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.

मंचर-
लाखनगाव ता. आंबेगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गव्हाळीमळा येथील शेतकरी जयसिंग ज्ञानेश्वर रोडे यांचे गुरांचे शेड पडल्याने या शेडखाली बांधलेली घोडी व गाईचा मनका मोडला.असुन मृत्यूच्या दारात आहेत.ईतर दोन जनावरे जखमी झाली असुन पाच लाख रुपयेचे आर्थिक नुकसान झाले आहे.या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात काल जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.या परीसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ तयार झाले. व परिसरातील भागात फिरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.लाखनगाव येथील गव्हाळीमळा येथील शेतकरी जयसिंग ज्ञानेश्वर रोडे यांचे शेड पडले.त्याखाली बांधलेल्या घोडी व गाईचा मनका मोडला.त्यामुळे त्यांचे पाच लाख रुपयेचे आर्थिक नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे स्वामी मारुती जांभळे यांचे घर पडल्याने त्यांचेही पाच लाख रुपयेचे नुकसान झाले आहे.लाखनगाव येथील ईतरही अनेक शेतकऱ्यांची घरे गोठे यांचे नुकसान झाले आहे. फळझाडे यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पंचनामे सुरू झाले असून ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र शेजुळ हे नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन पंचनामे करत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित या ठिकाणी पंचनामे झाल्यावर आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सदर ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे देवदत्त निकम, शिवसेनेचे रमेश येवले, अरुण गिरे पंचायत समिती सदस्या अंकिता वाळूंज ,श्वेता ढोबळे पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन8 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
