Connect with us

गावागावातुन

गावडेवाडी येथे श्रीराम व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात.

Published

on

मंचर-


आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडी येथील राजे शिवछत्रपती चौक येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाल्या असल्याची माहिती आदर्श गाव श्री क्षेत्र गावडे वाडी ग्रामस्थांनी दिली
गुरुवार (ता . २६ )रोजी ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांच्या श्रीराम जन्मोत्सवाच्या कीर्तनाने या सफाहास सुरुवात झाली तर संध्याकाळी ह भ प दत्तात्रय महाराज रुकारी यांचे हरिकीर्तन संपन्न झाले हा सप्ताह शुक्रवार (ता . ३ )एप्रिल रोजी संपन्न होणार आहे या सप्ताहात पहाटे पाच ते सात पांडुरंगरुक्मिणीला अभिषेक व महापूजा त्यानंतर पहाटे पाच ते सात काकड आरती सकाळी आठ ते अकरा व्यासपीठ चालक अनाजी महाराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ११ ते १२ गाथा भजन सायंकाळी चार ते पाच वाजता प्रवचन व सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री सात ते नऊ हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत या सप्ताहात ह भ प मनिषा ताई वळसे व ज्योती गावडे यांची प्रवचन रुपी सेवा संपन्न झालेली आहे या सप्ताहात ह भ प सुनीताताई शुक्रे ह भ प लंकापती सुनील गावडे ह भ प अनाजी महाराज शेळके ह भ प दया ताई काळे ह भ प सिद्धेश पंढरीनाथ गावडे ह भ प सोनल ताई बुट्टे ह भ प सुरेश शेठ महाराज गावडे ह भ प सयाजी महराज गावडे गौरव शिंदे व ह भ प संजीवनी ताई भावेश मंडलिक / गायकवाड यांची प्रवचन रूपाने सेवा होणार आहे या सप्ताहात ह भ प गोरक्ष महाराज जाधव, ह भ प संतोष महाराज बढेकर, ह भ प दीनानाथ महाराज शिंदे गावडेवाडी ह भ प बाळासाहेब महाराज झगडे (बारामती ) ह भ प गणेश महाराज हिंगे यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे.

तसेच या सप्ताहात हनुमान जन्माचे पहाटे पाच ते सात वाजता ह भ प संतोष महाराज गावडे यांचेगुरुवारी हनुमान जन्माचे किर्तन संपन्न होणार आहे तर रात्री सात ते नऊ वाजता ह भ प चेतन महाराज सातकर यांचे कीर्तन होणार आहे या सप्ताहाची सांगता शुक्रवारी (ता . ३ ) एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा वाजता ह भ प किशोर महाराज बांगर चिखलगाव यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून होणार आहे.

या श्रवण सुखाचा लाभ पंचक्रोशीतीलतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन गावडेवाडी ग्रामस्थ व अखंड हरिनाम सप्ताह कमिटी यांनी केले आहे

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान ,नुकसानग्रस्त गावांना माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील यांची भेट, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन.

Published

on


मंचर-

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना काल पावसाने झोडपले अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावस झाला.त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषी व महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


यावेळी आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,स.पो.नी.सचिन कांडगे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, बाजार समिती सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अजय आवटे, महेंद्र वाळूंज व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

  यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, पूर्व आंबेगावत  काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणेने तातडीने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा.

शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

Continue Reading

गावागावातुन

हनुमान जन्मोत्सवानिमित्त आंबेगाव तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रम .

Published

on

मंचर –

शरण शरण हनुमंता जी,तुम्हा आलो रामदूता ,बजरंग बली की जय’ अशा उद्घोषणा देत आंबेगाव तालुक्यात हनुमान जन्मोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील हनुमान मंदिरात हभप मधुकर महाराज गायकवाड (गावडेवाडी ) यांचे हनुमान जन्माचे पहाटे कीर्तन झाले. तसेच आदर्शग्राम गावडेवाडी येथे हभप संतोष महाराज गावडे गावडेवाडी यांचे कीर्तन संपन्न झाले तर अवसरी बुद्रुक येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात पार पडला.

लोणी धामणी, खडकवाडी, वडगावपीर, पोंदेवाडी, पेठ, पारगाव, पाबळ, गावडेवाडी, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, काठापूर बुद्रुक गावांत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला,थोरांदळे येथेही शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव झाला. येथे हजारो भाविकांना पुऱ्या गुळवणी व कांद्याची चटणी महाप्रसाद म्हणून देण्यात आला.

आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळीच पहाटे पाच वाजता हनुमंतरायांना अभिषेक घालण्यात आला त्यानंतर भाविकांनी रांगा लावून हनुमंतांचे दर्शन घेतले. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये अतिशय उत्साहात हनुमान उत्सव पार पडलाअवसरी खुर्द येथे पहाटे पाच ते सात वाजता मधुकर महाराज गायकवाड आदर्श गाव गावडेवाडी यांची हनुमान जन्माचे कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली या कीर्तनाला अवसरी खुर्द येथील ग्रामस्थांनी भजनाची साथ दिली या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ औषधी खुर्द व भैरवनाथ ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली होती मधुकर महाराज गायकवाड यांचा सन्मान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश भाऊ भोर व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव भोर यांचे हस्ते संपन्न झालापूजेचे पावरा इथे ग्राम पुरोहित येथील यतीनकाका कुलकर्णी तर ट्रस्टचे सदस्य दीपक टेंभेकर यांनी केले या कीर्तनाला पंचक्रोशीतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


अवसरी खुर्द आंबेगाव येथे हनुमान मंदिरात पहाटे मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी यांचे हनुमान जन्माचे किर्तन संपन्न झाले

Continue Reading

गावागावातुन

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान,अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अनिल वाळुंज यांची मागणी.

Published

on

निरगुडसर-

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, पोल्ट्रीचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गारा पडल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.


मागील तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाला असून अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासुन आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातही पाऊस हुलकावणी देत होता.परंतु आज सायंकाळी पाच वाजता वादळ वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी लाखनगाव देवगाव,पोंदेवाडी, काठापुर जारकरवाडी या गावांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारा पडल्या त्यामुळे ठिकाणी नुकसान झाली आहे. लाखणगाव या ठिकाणी पोल्ट्रीची भिंत पडल्याने शेतकरी विक्रम राजाराम धरम यांचे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उस पडला आहे. तसेच काढणी सुरू असलेला कांदा व काढण्यासाठी आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गहू जनावरांचे चारा पिके इतर तरकारी पिके यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सदर ठिकाणी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई यावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

Continue Reading
Advertisement

Trending