गावागावातुन
आंबेगाव तालुक्यात गणेश मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात.कारखान्यामध्ये रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न; आगाऊ नोदणीही सुरू.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/07/IMG-20250728-WA0032-1000x600.jpg&description=आंबेगाव तालुक्यात गणेश मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात.कारखान्यामध्ये रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न; आगाऊ नोदणीही सुरू.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2025/07/IMG-20250728-WA0032-1000x600.jpg&description=आंबेगाव तालुक्यात गणेश मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात.कारखान्यामध्ये रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न; आगाऊ नोदणीही सुरू.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
मंचर–
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी आदर्श गाव गावडेवाडी येथील परिसरात गणेशमूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्यांमध्ये गणेश मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्नअसल्याचे जिल्ह्याला मूर्ती पुरवणारे आदर्श ग्राम गावडेवाडी येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले.
कारखान्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी पुणे, अहिल्यानगर, मुंबई, नाशिक पनवेलआदी शहरात पाठविण्यासाठी कारखानदारांची लगबग सुरू आहे. यावयों येत्या ३१ ऑगस्टला गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक सण असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठा
उत्साह पाहावयास मिळतो. यावर्षीच्या उत्सवात एक ते १० फुटांपर्यंतच्या विविध आकारांच्या आकर्षक मूर्ती प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. बहुतांश मूर्ती पूर्णत्वास आल्या असून, उवरित मूतों वर अंतिम रंगकाम आणि सजावटीचे काम सुरू आहे.
तालुक्यात यंदा सुमारे १५ ते २० गणेश मूर्तीचे कारखाने कार्यरत आहेत मंडळे तसेच, चरगुती गणेश मूर्तीसाठी येथील कारागिरांकडे आगाऊ नोंदणी करत असतात. यामुळे सर्व कारागीर दिवस-रात्र काम करून मूर्ती परिपूर्ण करण्यासाठी झटत आहेत. आकर्षक रंगसंगती, नवनवीन डिझाईन्स आणि आधुनिक डेकोरेशन यामुळे यंदाच्या

मूताँची शैली वेगळी ठरत आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणेश भक्त शाडूच्या मूर्तीची चौकशी करत असल्याने यावर्षी शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती देखील बनविण्यात आल्या आहेत. त्यांना देखील चांगली मागणी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना मे-जून महिन्यात परवानगी मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांना जास्त मजुरी देऊन कमी वेळात जास्तीत जास्त गणेशमूर्ती बनविण्याचे आव्हान प्रत्येक कारखानदारास होते. यासाठी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम रात्र दिवस सुरू होते.
पेणच्या शाडूच्या मूर्ती, पुणेरी पॅरिसच्या फेटाधारी जय मल्हार, हनुमान, बाल गणेश, तांडव अवतार, घरगुती उत्सवासाठी विशेष मागणी असते. आकर्षक रंगसंगतीच्या मूर्तीला विशेष पसंती देण्यात येते. गणपती मूर्ती बनविण्याचे काम नियमित सुरू आहे .
किमतीत वाढ आणि साहित्याचा तुटवडा
यावर्षी रंग, सजावटीचे साहित्य आणि मूर्ती बनविण्याचे कच्चे साहित्य आदींचे दर प्रबंड वाढले आहेत. त्यामुळे मूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. किमतीत वाढ झाली असली तरी भाविकांचा उत्साह पूर्वीइतकाच आहे. आपल्या आवडत्या बाप्पाच्या मूर्तीची आगाऊ नोंदणी तसेच, खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
. परिसरातील नागरिक दोन ते तीन महिन्यांपासून ऑर्डर देत असतात. यात सार्वजनिक पीओपीच्या आकर्षक मूर्तीना मोठी मागणी आहे. कार्टून पॅटर्न डिझाईन्स, बालगणपती, डिझाईन्स तसेच, विविध प्राण्यांवर बसलेल्या मूर्ती यांचीही विक्री वाढली आह गणेश मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर, मग्न आहेत
आपल्या आवडत्या गणपती बाप्पाची मूर्ती निश्चित करण्यासाठी गर्दी करत आहेत. आपली गणेशमूर्ती ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून कारागिरांना आपल्या कलेचे कौतुक झाल्याचा आनंद मिळतो.तसेच यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मूर्तींच्या किमती १५ते २०टक्क्यांनी वाढ करावी लागणार आहे.
प्रथमेश श्रीधर राजगुरू .मूर्ती कारखानदारआदर्श ग्राम गावडेवाडी ‘
फोटो ओळी

प्र
आदर्श ग्राम गाडेवाडी ता आंबेगाव येथील प्रथमेश श्रीधर राजगुरू आपल्या गणेश मूर्तीच्या कारखान्यात मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत.
गावागावातुन
देवगाव पिंपरखेड गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याचे संरक्षण कठडे तुटल्याने वाहतूक धोकादायक.कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी.
मंचर-
देवगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पिंपरखेड व देवगाव या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असून त्या ठिकाणाहून नेहमी लोकांची वर्दळ असते.त्याचबरोबर देवगाव या ठिकाणाहून श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी शाळेचे विद्यार्थी जात आहेत.दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे घोड नदीला पुर आला या पुराच्या पाण्यामुळे 2 वर्षा पूर्वी बसविण्यात आलेले संरक्षण कठडे तुटून गेल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी तात्पुरते स्वरूपात पुलावरील कचरा व लोखंडी जाळी बाजूला करून रस्ता सुरू केला आहे.परंतु प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर साईट गार्ड बसवावे अशी माघणी माजी सरपंच दिपाली खांडगे, दिलीप दाभाडे, माऊली दाभाडे, मोहनशेठ पोखरकर, जयेश पोखरकर, निलेश खांडगे,अशोक खांडगे,विशाल खांडगे आदी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

गावागावातुन
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
मंचर-
आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.
या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

गावागावातुन
घोडनदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गेले वाहून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
मंचर –
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घोडनदित येत आहे.घोडनदिला अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक शेती पिकांना पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस या परिसरात झाल्याने शेती ,रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पावसाचे पाणी घोड नदीत येत आहे. मीना व घोड नद्यांचे पाणी एकत्र होऊन काठापुर बुद्रुक या ठिकाणावरून पुढे एकत्र जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने निक नदीच्या काठावर असणारे विद्युत पंप या पाण्यात वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बाहेर काढता न आल्याने अनेक पंप हे वाहून जात आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या नदीच्या काठावर मोटर बसवण्या ऐवजी बॅरलच्या साहाय्याने मोटर हे डायरेक्ट पाण्यावर बसवतो. त्यामुळे विद्युत मोटारी चांगलं प्रमाणात पाणी देतात. परंतु नदीला मागे आठ दिवसापूर्वी पाणी नसल्याने अनेक विद्युत पंप हे नदीमध्ये होते चार दिवसापासून पाऊस सुरू असला तरी डिंभे धरणात पाणी नसल्याने नदीच्या पाणी साठ्यात लगेच वाढ होणार नाही अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी बाहेर काढल्या नाहीत. आज सकाळ पासून अचानक घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या व नदीत असणाऱ्या अनेक विद्युत पंप मोटारी या पाण्यात वाहून गेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत नदीचे पाणी कमी झाल्याच्या नंतर किती मोटारी वाहुन गेल्या याचा अंदाज लागेल. एकंदर सध्यातरी अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप वाहून गेले आहेत.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन10 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
