Connect with us

गावागावातुन

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद .

Published

on

मंचर- पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी महेश बबनराव वाळुंज यांच्या घराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असुन त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.या बिबट्याला वनविभागाच्या अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील वनउद्यानात नेण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर आहे.पोंदेवाडी येथील खारावस्ती येथील शेतकरी महेश बबन वाळुंज यांच्या घराजवळ बिबट्या माघील अनेक दिवसापासून येत होता.याआधी मेंढपाळांच्या मेंढ्यांवर व पाळीव कुत्रे,कालवड यांच्यावर बिबट्या ने अनेकवेळा हल्ला केला होता.काही दिवसापुर्वी तात्याभाऊ बाबुराव वाळुंज यांच्या कालवडीला बिबट्या ने हल्ला करून जखमी केले हि कालवड दोन दिवसांनी मृत्यू झाला.माघील एक महीन्यापासुन खारावस्ती परीसरात हा बिबट्या वावरत होता.त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले होते.याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच बबनराव वाळुंज यांनी केली होती.
त्यानंतर मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले, वनपाल निलम चव्हान,वनरक्षक पुजा कांबळे यांनी याठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता.पहिल्यांदा या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवल्या परंतु बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही.
सोमवारी रात्री शेळीच करडु या पिंजऱ्यात ठेवण्यात आले.हे करडु ओरडत असल्याने आवाजाच्या दिशेने आलेला हा बिबट्या आज मंगळवारी पहाटे या पिंजऱ्यात अडकला.सकाळी बिबट्या अडकल्याची माहिती बबनराव वाळुंज यांनी वनरक्षक पुजा कांबळे यांना दिली.कांबळे यांनी अशोक जाधव, विकास खळे अजय तळेकर यांच्या मदतीने बिबट्याला मंचर येथील वनउद्यानात नेले आहे.सदर बिबट्या नर जातीचा असुन चार वर्षे वयाचा असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात बिबटे दिसत आहेत.येथे असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये बिबटे राहत आहेत.अनेक वेळा हे बिबटे घरापर्यंत येत असतात.त्यामुळे अनेक वेळा पाळीव प्राणी कुत्रे यांवर हल्ले होत असतात.त्यामुळे या परिसरातील नागरिकांना बिबट्याच्या भितीखाली राहावे लागत आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन

Published

on

मंचर-

दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन व मिल रोलरचे पूजन रविवार (ता. १९) अक्षय तृतीयेच्या शुभमुर्हुतावर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते करुन प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली.


मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर प्रतापसिंह सावंत, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सिव्हील इंजीनिअर अमीर पठाण, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे व कामगार आदी उपस्थित होते.


अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

क्षक्षक्षकारखान्याचे संस्थापक – संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार सुरु केले आहेत. ऊस तोडणी यंत्राचे करार करणेसाठी इच्छुक असणा-या मशीन मालकांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच येणारा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

– दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु., ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रोलर पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Continue Reading

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथील आकांक्षा अरगडे (ढमाले) यांची ठाणे शहर पोलीस पदी निवड, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार.

Published

on

मंचर-

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील आकांक्षा बाबाजी अरगडे (ढमाले) यांची ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली असून. त्यांचा सत्कार पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या पोलीस भरती परीक्षेत काठापूर गावची कन्या अकांक्षा बाबाजी अरगडे( ढमाले)यांनी ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली.
पोलीस भरती साठी कठोर मेहनत करून त्यांनी हे यश मिळवले.गेली सात वर्षांपासुन या साठी ती सराव करत होती अनेक वेळा अपयश आले.यावेळी झालेल्या भरती प्रक्रियेत त्यांनी ठाणे शहर पोलीस पदी निवड झाली.मध्यंतरी लग्न झाले एक मुलगी झाली परंतु त्यानंतर ही त्यांनी आपले पोलीस होण्याचे स्वप्न सुरू ठेवले.सरावात सातत्य ठेवले कुटुंब व मुलीची जबाबदारी पार पाडत त्यांनी हे यश मिळाले.त्यात त्यांचे वडील एकनाथ ढमाले आई,पती,सासु,सासरे यांचा पाठिंबा मिळाला.


पोलीस पदी निवड झाल्या निमित्ताने काठापूर ग्रामस्थांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, संदीप पोखरकर,पोलिस पाटील,अमोल करंडे, संतोष करंडे, रामदास करंडे,मंगेश करंडे, बाबाजी करंडे, शिवव्याख्यात्या अर्चना करंडे लाखनगाव व काठापूर बुद्रुक येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

पोंदेवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता.आंबेगाव या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये साजरी करण्यात आली.पोंदेवाडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर ग्रामपंचायत अधिकारी मनिषा वळसे,अमोल वाळुंज, आनंदराव पोंदे, चंद्रकांत विरकर, गणेश हारके, शंकर हारके,सचिन हारके, राजू वारे, निलेश मांजरे ,नवनाथ हारके. यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63

Warning: file_get_contents(https://pbn-ph.website/data/bl.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for pbn-ph.website failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 63