Connect with us

शैक्षणिक

माजी विद्यार्थ्यी हितेश ढोबळे यांचा निमणबेट शाळेकडून गौरव.

Published

on

मंचर प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट पारगाव(शिगंवे) ता.आंबेगाव शाळेत. शाळेचा माजी विद्यार्थी हितेश ढोबळे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची राज्य कर निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवल्याने शाळेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.


शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, आपण काहीतरी वेगळं करावं, अशी उर्मी त्यांच्यात जागृत व्हावी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करावे, बाल मनातच या परीक्षांविषयी माहिती मिळावी. असेच काहीतरी करावे, अशी प्रेरणा व प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने हा उपक्रम शाळेत घेण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.उंडे सर यांनी केले. मनोगतातून हितेश यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उराशी मोठी स्वप्न बाळगा. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. न डगमगता, न हारता सतत प्रयत्नशील रहा. प्रयत्नांत सातत्य ठेवा, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असा संदेश त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.


कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश ढोबळे, उपाध्यक्ष सौ.सुरेखा ढोबळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशोक ढोबळे, कैलास ढोबळे,सुवर्णा ढोबळे त्याचबरोबर हितेशचे वडील ज्ञानेश्वर ढोबळे व भाऊ दयानंद ढोबळे, बहिण काजल ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षिका चंद्रप्रभा अरगडे यांनी आभार व्यक्त केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

Published

on

मंचर-

आदिवासी विकास विभाग संचालित सेंट्रल किचन येथे आज माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहणी केली.प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अन्न तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, स्वच्छता व्यवस्था, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या भोजनाची पाहणी करण्यात आली.

या सेंट्रल किचनमधून खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सकस, पौष्टिक व दर्जेदार भोजन पुरविले जाते. यावेळी तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल तसेच इतर आवश्यक अन्नसाहित्याची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, स्वच्छता आणि अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची सखोल माहिती घेण्यात आली.

तसेच भोजन तयार करताना अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न पॅकिंगची प्रक्रिया, वेळेत वितरण तसेच विद्यार्थ्यांपर्यंत गरम व ताजे जेवण पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन सातत्याने उपलब्ध व्हावे, यासाठी गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नियमित तपासणी व देखरेख ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

Continue Reading

शैक्षणिक

पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील विद्यार्थी देवांश गणेश कापडी याची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे निवड.

Published

on

मंचर-

पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील डि.जी.वळसे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी देवांश गणेश कापडी याने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश संपादन केले असुन त्याची निवड राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) बेंगळूर येथे झाली आहे.देशभरातुन एकुण ३६५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात देवांश याने यश मिळवले आहे

      मिलिट्री स्कूल (RMS) या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणार्या निवासी शाळा असुन या शाळा इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार शिक्षण देतात आणि लष्करी नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांची जडणघडण करतात. सध्या भारतात हिमाचल प्रदेशातील चैल, राजस्थानमधील अजमेर आणि ढोलपूर, तसेच कर्नाटकातील बंगळुरू आणि बेळगाव येथे या ५  आरएमएस शाळा आहेत.या शाळांची स्थापना १९२५ मध्ये झाली असुन.या शाळेत इयत्ता ६ वी आणि ९ वी साठी प्रवेश दिला जातो. CET  सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.येथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात असुन.NCC प्रशिक्षण, क्रीडा आणि शैक्षणिक दिले जाते. १० ते १२ वर्षे (६ वी साठी) आणि १३ ते १५ वर्षे (९ वी साठी) वयोगटातील मुले/मुली यांची निवड केली जाते.भारतातील ५ राष्ट्रीय मिलिट्री स्कूल RMS चैल (हिमाचल प्रदेश) अजमेर (राजस्थान),RMS ढोलपूर (राजस्थान),RMS बेळगाव (कर्नाटक)RMS बंगळुरू (कर्नाटक)येथे असुन दर वर्षी देशभरातुन ३६५ विद्यार्थ्यी येथे निवडले जातात. त्यातून 36 सिविलियन विद्यार्थ्यांची निवड होते
      आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील देवांश अश्विनी गणेश कापडी याची निवड झाली असून  राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षेत 150पैकी 138 गुण मिळाले आहे तसेच ऑल इंडियन सैनिक स्कूल परीक्षेत 300पैकी 270 गुण मिळाले आहेआपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दोन मोठ्या परीक्षा ती यश मिळाले आहे.परीसरातुन त्याचे कौतुक होत आहे.देवांश याची आई अश्विनी कापडी/ लबडे भारतीय सैन्य दलात सीमा सुरक्षा दलात काम करते. तर वडील गणेश कापडी पुणे येथे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत आहेत. घरातूनच सैनिकी वारसा लाभलेल्या देवांश याला भविष्यात  देश सेवेसाठी जबाबदार नागरिक व अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने व काम करण्याची इच्छा आहे.
Continue Reading

शैक्षणिक

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव ला तृतीय क्रमांक,दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन सन्मान.

Published

on

मंचर-

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक वितरण नुकतेच पुणे येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय साहित्य व सन्मानचिन्ह यावेळी वितरित करण्यात आले.


टाटा मोटर्स (बिकन) व पर्यावरण शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून नुकताच ग्रीन स्कूल अवार्ड (हरित शाळा) २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.पुणे या ठिकाणी टाटा मोटर्सचे पदाधिकारी सिताराम कांडी, सुनील तिवारी,निरज अग्रवाल, सतीश आवटे,पुजा शेळकंदे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारी व खाजगी शाळांसाठी हरित शाळा २०२५ ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी शाळा गटामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दोन लाख रुपयाचे शालेय शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले.
पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर १५९ सरकारी शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.यातील अंतिम पाच शाळांची निवड करून त्यांना एक ते पाच क्रमांक देण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापुर बुद्रुक या शाळेतने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

‌. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, उत्तम वाव्हळ, दिनेश तूळे,निलीमा वळसे,कवीता कोठावळे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सागर शेटे, राजू जोरी व विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. शाळेने शाळा व परिसरामध्ये केलेली वृक्ष लागवड, पर्यावरणीय रक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा, पाणी नियोजन,शुद्ध पाणी,बगीचा,यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांचे अवलोकन करून पारितोषिक देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातुन काठापुर बुद्रुक ही एकमेव शाळा या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरली.गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका, विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, व गावातील विविध संस्थांच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यात आले.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62