Connect with us

शैक्षणिक

जारकरवाडी जि.प.शाळेच्या मुलींचा खो खो संघ जिल्हात प्रथम

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी राजु देवडे

जारकवाडी ( ता.आंबेगाव ) येथील जि.प. प्राथ.शाळेच्या मुलींनी जिल्हा क्रीडा स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

( दि.२९) रोजी पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या जिल्हा क्रीडा स्पर्धेत जारकरवाडी जि.प.शाळेने एकहाती विजय संपादीत केला. विशेष म्हणजे बहुतेक शाळांमध्ये अनुभवी प्रशिक्षकांडुन विद्यार्थ्यांची क्रीडा तयारी करून घेतली जाते परंतु जारकरवाडी जि.प.शाळेने कोणताही प्रशिक्षक न वापरता शाळेतील शिक्षक अशोक लोखंडे सर व वैजयंती लोखंडे मॅडम व सहशिक्षक यांनी आपले कौशल्य पणाला लावून विद्यार्थ्यांची शाळेत चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली. तालुका पातळीवरील दैदिप्यमान यशानंतर जिल्हा क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून शाळेचा जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. तसेच तृप्ती जयराम लबडे या विद्यार्थीनीचा लांब उडी ( लहान गट ) हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.


मुलींचा संघ जिल्हात प्रथम आल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. विजयी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पुणे शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, उपशिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, तालुका गटशिक्षणाधिकारी अधिकारी सविता माळी, शिक्षण विस्तार अधिकारी काळुराम भवारी, केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे मुख्याध्यापक म.वि.काळे, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी आभार मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

न्यु इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत ५१ विद्यार्थ्यांना सायकल वाटप.

Published

on

मंचर-

लाखनगाव ता.आंबेगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचालित न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेत ५१ विद्यार्थ्यांना सायकल वाटप व शासकीय सेवेतील भूमिपुत्रांचा सन्मान भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदिप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

लाखनगाव येथील माध्यमिक विद्यालयात प्रदिप वळसे पाटील यांनी “सायकल बँक ‘ ही योजना राबवण्याचे आवाहन करून स्वतः ५ सायकल दिल्या, त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ गाडगे व मुख्याध्यापक अनिल देसले यांनी स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधून ५१ सायकल जमा करून या सायकलचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर लाखणगाव मधील शासकीय सेवेतील 9 भूमिपुत्रांचा सत्कार व शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार संपन्न झाला.


या कार्यक्रमास भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमन प्रदिप वळसे पाटील,माजी सभापती बाळशिराम ढोमे,पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष अनिल वाळुंज, पंचायत समिती आंबेगावच्या गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संघाचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मनोजकुमार रोडे पाटील, काठापुर माजी सरपंच भाऊसाहेब औटी, निलेश पडवळ,माजी सरपंच प्राजक्ता रोडे पाटील, चेअरमन अनिल दौंड, लहू पडवळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे , उपाध्यक्ष प्रदीप रोडे, कोंडीबा नाथू रोडे, मा. प्राचार्य रामदास रोडे, माजी सरपंच नरेंद्र भागवत, दस्तगीर मुजावर, उपसरपंच दिपाली वाघमारे, संदिप पोखरकर,वंदना पडवळ, साधना आरगडे, प्रमोद भागवत, सोमनाथ पोंदे, महेश भोजने, माऊली रोडे, नवनाथ पडवळ, पोपट बरकले, पोलीस पाटील कल्पनाताई बोऱ्हाडे पा., सरपंच ज्ञानेश्वर पाबळे,योगेश पाटील,उदय मुंगसे,मनोहर घोलप,सुनिल जाधव अनेक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.


या कार्यक्रमासाठी कल्पना राजगुरू, छाया वाघुंडे, रसिका शिंदे, अक्षय किर्वे यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल देसले सूत्रसंचालन प्रवीण शिकारे, सोमनाथ पोंदे, आभार प्रदर्शन महादेव कानसकर यांनी केले.

Continue Reading

देशविदेश

Published

on

निरगुडसर-

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर,लाखनगाव, पोंदेवाडी,देवगाव, जारकरवाडी आदी गावांमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय,दुध संस्था कार्यालय, सरकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. अनेक जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये विविध संस्कृती कार्यक्रम पार पडले. देशभक्तीपर गीते,भाषणे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक विद्यार्थी व ग्रामस्थांची भाषणे ही झाली. अनेक ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आले होती. अशा विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला.यावेळी काठापुर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप गणेशनगर या ठिकाणी महिलांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर असून या महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या ठिकाणी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हौसाबाई जाधव, प्रियांका जाधव, अरुणा करंडे, वर्षा जाधव,सारीका करंडे,रुपाली नर्हे,मा.उपसरपंच विशाल करंडे,अनिल जाधव, विलास जाधव,सागर जाधव,तानाजी जाधव,सचिन नर्हे,बबन जाधव,सोमनाथ जाधव,हौशीराम जाधव, विनायक जाधव मुख्याध्यापक राजु जाधव, शिक्षण ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शांतारामदादा घुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध शालेय साहित्याचे वाटप.

Published

on

मंचर –

शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम होत असते. त्यामुळे शाळेसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी कायम मदतीचा हात पुढे केला पाहिजे असे मत भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे यांनी व्यक्त केल.

काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शांतारामदादा घुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी ढोबळे बोलत होते.


यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले,सरपंच अशोक करंडे, मा. उपसरपंच विशाल करंडे,रोहिदास तुळे, सोसायटीचे चेअरमन कुंडलीक जोरी, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष राहुल भुरके, उपाध्यक्ष काळूराम टिंगरे,नरहरी करंडे,नथू करंडे, मधुकर जोरी, किशोर करंडे,रंगनाथ करंडे, मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, दत्तात्रय वाव्हळ, दिनेश तुळे,निलीमा वळसे,मुक्ता थोरात यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या, पेन,पेन्सिल या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नंदकुमार चासकर,तर आभार दिनेश तुळे यांनी मानले.

Continue Reading
Advertisement

Trending