सामाजिक
भीमाशंकरची सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल रु. ३६००/- प्रती मे. टन जाहीर.
मंचर-
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा.ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मा. संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये गाळप होणा-या ऊसास पहिली उचल रु. ३६००/- प्रती मे. टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे

अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ मधील सरासरी साखर उता-यानुसार एफ.आर.पी दर रु. ३२७३.६५ प्रती मे. टन येत आहे. तथापी गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातून गाळप होणा-या ऊसासाठी पहिली उचल रु. ३६००/- प्रती मे. टन, नगर जिल्ह्यामधून पुरवठा होणा-या ऊसासाठी रु. ३२७४/- प्रती मे. टन व पैठण, गेवराई परिसरातून पुरवठा होणा-या ऊसासाठी रु. ३१००/- प्रती मे. टन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये दि.२१ नोव्हेंबर अखेर २ लाख ७२ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले असून २ लाख ८१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेवून सरासरी साखर उतारा १०.५३ टक्के मिळाला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पापासून १ कोटी ७६ लाख ५६ हजार युनिट वीज उत्पादन केले असून कारखाना वापर वजा जाता ९० लाख १३ हजार युनिट वीज निर्यात केली आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्पापासून रेक्टीफाईड स्पिरीटचे ३० लाख ५० हजार बल्क लिटर उत्पादन झाले आहे. कारखान्याने गाळपाचे योग्य नियोजन केले असल्याने ऊस उत्पादकांचे संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे.

असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
गावागावातुन
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची उपस्थिती.
. मंचर –
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठाणने यांच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता.

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठान पोंदेवाडी यांच्या वतीने जारकरवाडी पंचायत समिती गणातील ६५ गरजू कुटुंबांतील महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते या गिरण्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थ व महिला भगिनींशी संवाद साधला.
सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीठ गिरणी, शिलाई मशीन तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. या उपक्रमामुळे गरजू महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
यावेळी बोलताना विवेक वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पात्र शेतकरी, महिला आणि विद्यार्थिनींना डीबीटीद्वारे विविध वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जात असल्याचे सांगितले. अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज,आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, पारगाव गणप्रमुख मनोज रोडे पाटील, जारकरवाडी गणप्रमुख बाळशीराम वाळुंज,सतिष रोडे पाटील माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर, आनंदा पोंदे,प्रतिष्ठानचे पदाधिकारी व आयोजक, जारकरवाडी पंचायत समिती गणातील सरपंच, पोंदेवाडी गावचे आजी-माजी सरपंच, महिला भगिनी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
गावागावातुन
तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा
मंचर प्रतिनिधी :
गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.
“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.
सामाजिक
पोंदेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू.बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा.संदीप पोखरकर यांची मागणी.
मंचर-
पोंदेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी पहाटेच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून. या परिसरात वारंवार बिबट्या दिसत असून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी पोंदेवाडी चे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.
सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये बिबट्या वारंवार पहावयास मिळत आहे.सध्या ऊस हा डोक्यापेक्षा जास्त उंचीचा झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा बिबट्याने आपला मोर्चा उसाच्या परिसरात वळवल्याचे दिसुन येते.
पोंदेवाडी येथील रोडेवस्ती या ठिकाणी आनंदा बबन पोंदे यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने पहाटेच्या वेळी हल्ला करून त्याला ठार केले.सदर वासरू बांधलेले असल्याने बिबट्याला ते वासरू घेऊन जाता आले नाही. त्यामुळे त्याच ठिकाणी वासराचा फडशा पाडला.पहाटे चारच्या दरम्यान आनंदा पोंदे हे जागे झाले असता वासरू व्यवस्थित बसले होते. परंतु सकाळी पाहिले असता वासराला बिबट्याने ठार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांना दिली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी संपर्क साधुन मृत वासराचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
रोडेवस्ती येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.रात्री नऊच्या दरम्यान बिबट्या या परिसरात दिसून आला होता.त्यामुळे हा बिबट्या या ठिकाणी स्थायिक असून दोन बिबटे जोडीने फिरत असल्याचे या बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा अशी माघणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
