Connect with us

गावागावातुन

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांची उपस्थिती.

Published

on

. मंचर –

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठाणने यांच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता.

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठान पोंदेवाडी यांच्या वतीने जारकरवाडी पंचायत समिती गणातील ६५ गरजू कुटुंबांतील महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते या गिरण्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थ व महिला भगिनींशी संवाद साधला.

सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीठ गिरणी, शिलाई मशीन तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. या उपक्रमामुळे गरजू महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

यावेळी बोलताना विवेक वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पात्र शेतकरी, महिला आणि विद्यार्थिनींना डीबीटीद्वारे विविध वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जात असल्याचे सांगितले. अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज,आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, पारगाव गणप्रमुख मनोज रोडे पाटील, जारकरवाडी गणप्रमुख बाळशीराम वाळुंज,सतिष रोडे पाटील माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर, आनंदा पोंदे,प्रतिष्ठानचे पदाधिकारी व आयोजक, जारकरवाडी पंचायत समिती गणातील सरपंच, पोंदेवाडी गावचे आजी-माजी सरपंच, महिला भगिनी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

काठापूर बुद्रुक येथील पुरातन महादेव मंदिरात दीपावली निमित्त दीपोत्सव. शेकडो दिव्यांनी मंदिर परिसर उजळला.

Published

on

. मंचर –

काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथील प्रथम महादेव मंदिरात दीपावली निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शेकडे दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. काही महिन्यांपूर्वीच या मंदिराचा जन्मदर झाल्याने सदर परिसरात भाविकांची गर्दी वाढली असून दिवाळीनिमित्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत होते.


आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक येथे पुरातन तीनशे वर्ष जुने महादेव मंदिर आहे या मंदिराचा जन्मदर नुकताच काही दिवसांपूर्वी संपन्न झाला त्यानंतर नदीच्या अगदी मधोमध असणाऱ्या या जुन्या पुरात्री मंदिरात भाविकांची वर्ग वाढली आहे दीपावलीच्या निमित्तही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंदिर व परिसर दिव्यांनी वजन निघाला होता या ठिकाणी शेकडे लावून मंदिराच्या परिसर त्याठिकाणी झाला होता.

यावेळी काठापूर खुर्दच्या सरपंच सिमा थिटे, काठापूर बुद्रुकचे माजी उपसरपंच विशाल करंडे, सोसायटी संचालक संतोष करंडे ,पोलीस पाटील अमोल करंडे, चंद्रकांत गव्हाणे,दत्ता करंडे, शंकर करंडे, प्रशांत करंडे, जयसिंग थोरात,धोंडीभाऊ तुळे, राजेंद्र करंडे,मयुर करंडे, संदेश करंडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

शिवपुराण कथा सोहळ्याला नागरीकांची गर्दी.ज्ञानेश महाराव फलके कथा प्रवक्ते.

Published

on

मंचर-

काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव येथील भोकरवाडी मध्ये सुरू असलेल्या शिवपुराण संगीतमय कथा सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असून. ह भ प ज्ञानेश महाराव फलके आमोंडी यांच्या माध्यमातून ही कथा सांगितले जाता आहे.कथा ऐकण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर जमत आहेत.

काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव येथील भोकरवाडी गणेशनगर मध्ये दरवर्षी संगीत कथा सोहळ्याचे आयोजन केले जाते याही वर्षी ह भ प ज्ञानेश महाराव फलके आमोंडी यांच्या शिवपुराण या कथासोळ्याचे आयोजन केले आहे.

हा कथा सप्ताह शुक्रवार दिनांक 30 10 2026 रोजी सुरू झाला असून शुक्रवार दिनांक 6 11 2026 पर्यंत चालणार आहे या ठिकाणी काठापुर पोंदेवाडी जारकरवाडी पारगाव परिसरातील ग्रामस्थ कथा श्रवण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमत आहेत.

सायंकाळी सहा ते नऊ या वेळात कथा सोहळा संपन्न होत असून त्यानंतर अन्न प्रसादाचे आयोजन केले जाते या सोहळ्याला भर्तुहरी विधाटे,संतोष सुंबे, हनुमान मिटकर,गणेश विधाटे यांची संगीत साथ लाभली असून.पिरसाहेब ढोल लेझीम मंडळाच्या माध्यमातून या सप्ताहाचे नियोजन करण्यात येत आहे.


पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते १० पारायन,३ ते ४ नेमाचे भजन, सायंकाळी ४ ते ५ हरीपाठ, सायंकाळी ६ ते ९ संगीत कथा,९ ते १० महाप्रसाद या प्रकारे कार्यक्रम पार पडत आहेत.

Continue Reading

गावागावातुन

खेड्यापाड्यातही आता मोठ्या गणेश मूर्तींची धूम, आंबेगाव तालुक्यात पीओपीसह शाडूच्या मूर्तीना मागणी; तयारी अंतिम टप्प्यात

Published

on


मंचर-
येत्या काही दिवसानी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ओबेगाव तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कारागीर दिवस-रात्र मेहनत घेऊन मूर्तीना आकर्षक रूप देत असून, यंदा पीओपीसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी असल्याचे जिल्ह्याला घाऊक मूर्ती पुरवणारे गावडेवाडी ता आंबेगाव येथील श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले आहे.

आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांमध्ये रंगकाम, सजावट आणि वस्त्रांच्या नक्षीकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक मंडळांसह नागरिकांनी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू केली असून, कारागीर ग्राहकांच्या पसंतीनुसार विशेष मूर्ती साकारत आहेत.कारखान्यात गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, सध्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

आमच्या कारखान्यात सध्या सुमारे तीन हजार मूर्ती तयार असून, त्या सर्व ग्राहकांच्या पसंतीनुसार बनविल्या आहेत. १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तीना मंडळांकडून विशेष मागणी आहे. शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.घरगुती गणेश मूर्तीनाही मोठी मागणी आहे – प्रथमेश श्रीधर राजगुरू
मूर्ति कारागीरगीरआदर्शगाव गावडेवाडी (ता .आंबेगाव )

पीओपी मूर्तीना पसंतीआकर्षक रंगसंगती
कमीवजन आणि परवडणाऱ्या किमतीमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीना बाजारात मोठी मागणी आहे. प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले असले तरी, पीओपीच्या मूर्तीची विक्री वाढणार असल्याचा दावा श्रीधर राजगुरू यांनी केला आहे.मात्र कच्च्या मालाचे वाढलेले दर वाढलेली मजुरी यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीत १५ ते २० टक्यांनी वाढ होणार असल्याचेही श्रीधर राजगुरू सांगतात दुसरीकडे, पर्यावरणप्रेमींकडूनजलप्रदूषणाबाबत चिंताव्यक्त करत शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केले जात आहे


आदर्श गाव गावडेवाडी ता आंबेगाव येथील गणेश मूर्ती कारागीर कारखान्यात अखेरचा हात फिरवण्याच्या लगबगीत गुंतले आहेत

Continue Reading
Advertisement

Trending