Connect with us

गावागावातुन

जारकरवाडीत पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा.गणपत मंचरे यांनी ओढल्या बारा गाड्या.

Published

on

निरगुडसर :
जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापनेपासून ते विजयादशमी या कालावधीत नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनपर कीर्तने संपन्न झाली. विजया दशमीच्या दिवशी गंगेचे पाणी, पाण्याची मिरवणूक, श्रींची महाआरती, काठीची मिरवणूक संपन्न झाली. संध्याकाळी बिरोबाचे पुजारी गणपत मंचरे यांच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण करत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.

नवरात्रोत्सव कार्यकाळात दौलतभाई लोखंडे,रमेश लबडे,रामचंद्र ढोबळे,सरपंच प्रतिक्षाताई बढेकर, उपसंरपंच सचिन टाव्हरे सुरेखा निघोट,सुरेश भोर,किरण वाळुंज, दत्ताराम वैद, चेअरमन खंडु भोजणे, उद्योजक रामहरी देवडे,पुजा वळसे महिला अध्यक्ष, रूपाली भोजणे महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदी मान्यवर उपस्थित होते. दसऱ्याच्या दिवशी रात्री आठ नंतर मयुर सरडे व प्रतीक्षा भांड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला

कार्यकमाची व्यवस्था नवनाथ मंचरे, अविनाश तागड दिपक पाचपुते कचरदास भोजणे,रविंद्र भांड,मंगेश भोसले, सत्यवान भोसले,अविनाश पवार, एकनाथ मच्छिंद्र भांड, गोरक्षनाथ भांड, पोपट भोजणे, उत्तम मंचरे व गावातील तरूणांनी पाहिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्ती भांड, प्रतिक्षा भांड भागाजी भांड यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

भीमाशंकर कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा.

Published

on

मंचर-

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पारगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक साखरशाळेत शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पुणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित जिल्हा परिषद .चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या असून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


(कारखाना ) परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शाळेत वर्गखोल्यांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना बसवावे लागत होते, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर विवेक वळसे पाटील यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मंजूर निधीतून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व सुसज्ज इमारती मिळाल्याने शिक्षण सहज सुलभ होणार आहे त्यामुळे ऊसतोड मजुरात समाधान पसरले आहे .
याबाबत माहिती देताना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “ऊस कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
या निर्णयाचे शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी स्वागत केले असून लवकरात लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथे महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ.

Published

on

मंचर-

भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अ‍ॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे महिलांसाठी “Cold Pressed oil प्रोसेसिंग” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.

हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.

उद्घाटन समारंभात सरपंच अशोक करंडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा गोसावी, सुनील काटे (पंचायत समिती कृषी अधिकारी )आणि ईडीआय प्रोजेक्ट ऑफिसर सचिन मोरे उपस्थित होते.पोलीस पाटील अमोल करंडे.

भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अ‍ॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading
Advertisement

Trending