Connect with us

गावागावातुन

शेकडो वर्षांची परंपरा जपत शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे धुलिवंदन सण साजरा.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे

शिरदाळे ( ता. आंबेगाव ) येथे पारंपरिक पद्धतीने धुलीवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील सर्व मंडळी प्रत्येक पारंपरिक सणाला,सप्ताहाला एकत्र येत तो सण साजरा करत असतात. त्यातीलच एक धुलिवंदन हा सण गावच्या पारंपरिक वैभवात भर घालणारा सण. या सणाला गावातील लहान मुलं, शाळकरी मुलं तर यावर्षी काही तरुण मंडळींनी यात सहभागी होऊन या सणाला आनंद द्विगुणित केला. चाफ्याची फुले,हार,साडीने केलेली सजावट ,डोक्यावर फेटा आणि हातात वीर देवाची काठी आणि वीर देव अशी सजावट करून ही मिरवणूक गावच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात आणली जाते. त्या ठिकाणी महिलांनी पाण्याचे हेल घालून तयार गेलेला गोलाकार फेरा धरून सर्व वीर देव नाचतात.त्यांच्या बरोबरीने गावातील जेष्ठ मंडळी घाई धरून सनई आणि ताशाच्या तालावर फेरा धरून नाचत असतात. त्यानंतर ही मिरवणूक महादेव मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा चौकात आणली जाते त्याठिकाणी अनेक तरुण ,जेष्ठ मंडळी यात सहभागी होऊन या सणाला आनंद घेत असतात.

यावर्षी उपसरपंच बिपीन चौधरी,गणेश तांबे,बाळासाहेब रणपिसे हे मंडळी वीर देवाच्या वेशात येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.


कुठल्याही धार्मिक,सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन उत्सव साजरा करत असतो. यावर्षी देखील ही संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांच्या सहभागाने कुठलाही कार्यक्रम अधिक चांगला होत असतो. शेकडो वर्षांची परंपरा असलेला आमचा हा कार्यक्रम आम्ही अधिक चांगला होण्यासाठी प्रयत्न करत असतो. सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य असते असे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

पोंदेवाडी येथे दिवसा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण.वनविभागाने पिंजराला लावावा,पंचायत समितीच्या सदस्या अंकिता वाळुंज यांची मागणी.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील रोडेवस्ती डिंभा उजव्या काल्याव्यालगद दिवसा बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असुन सध्या कांदे काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भिती पसरली असुन या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी पंचायत समितीच्या सदस्य अंकिता वाळुंज यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बारमाही पाण्याची उपलब्धता आहे. येथे उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.सध्या उसाची तोडणी झाली आहे. त्यामुळे मोठ्या उसाचे क्षेत्र कमी झाल्याने तसेच पाण्याचा व अन्नाचा तुटवला जाणवु लागल्याने बिबटे दिवसाढवळ्या मनुष्यवस्थित फिरू लागले आहेत.पोंदेवाडी गावातून डिंभे धरणाचा उजवा कालवा जातो.या कालव्याच्या लगत रोडेवस्ती लगत दिवसा बिबट्या दिसून आला. या ठिकाणी सध्या कांद्याची काढणी सुरू असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर कांदे काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर बिबट्या लगेच असताना शेतकरी निलेश मांजरे यांनी या बिबट्याचे शूटिंग आपल्या मोबाईल मध्ये काढले. बिबट्या हा माणसांच्या समोरून जात असताना कुठेही तो न घाबरता निवांत निघुन गेला. त्यामुळे माणसांची भीती बिबट्याला राहिली नसून हा बिबट्या कधीही माणसांवर हल्ला करू शकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या फिरत असल्याची माहिती वनपाल नीलम चव्हाण यांना दिली असुन. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, संदीप पोखरकर व ग्रामस्थांनी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

पोंदेवाडी येथे ट्रांसफार्मर फोडल्याने पोखरकरवस्ती, वाळूंजवस्ती येथील 30 ते 35 घरे अंधारात, ट्रान्सफॉर्मर बसवावा पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांची मागणी.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील पोखरकर वस्ती शेजारील महावितरण कंपनीचा ट्रांसफार्मर काल रात्री अज्ञात चोरट्यांनी डीपी स्ट्रक्चर वरून खाली पाडुन तो फोडण्यात आला त्यामुळे पोखरकरवस्ती आणि वाळूंजवस्ती येथील 30 ते 35 घरे मध्यरात्रीपासून अंधारात असून या ट्रांसफार्मरवर असणाऱ्या विद्युत मोटारी बंद झाल्याने जनावरांचा व शेती पिकांचा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. महावितरण कंपनीने येथे लवकरात लवकर दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

पोंदेवाडी येथील पोखरकरवस्ती या ठिकाणी महावितरण कंपनीचे ट्रांसफार्मर असून या माध्यमातून पोखरकरवस्ती व वाळूज वस्ती परिसरातील घरांना व शेती पंपांना वीज पुरवठा केला जातो. परंतु रात्री अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने सदर ट्रान्सफॉर्मर डीपी स्ट्रक्चर वर खाली पाडून तो फोडला आहे. त्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकऱ्यांना जनावरांच्या पिण्यासाठी व शेती पिकांसाठी पाणी देणे अवघड बनले आहे. त्याचप्रमाणे घरांनाही विज पुरवठा होत नसल्याने सर्वच कामे ठप्प झाली आहेत.सदर घटनेची माहिती पारगाव कारखाना पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पोलिसांनी या घटनेचा तपास करून चोरट्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

गावडेवाडी येथे श्रीराम व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात.

Published

on

मंचर-


आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडी येथील राजे शिवछत्रपती चौक येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाल्या असल्याची माहिती आदर्श गाव श्री क्षेत्र गावडे वाडी ग्रामस्थांनी दिली
गुरुवार (ता . २६ )रोजी ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांच्या श्रीराम जन्मोत्सवाच्या कीर्तनाने या सफाहास सुरुवात झाली तर संध्याकाळी ह भ प दत्तात्रय महाराज रुकारी यांचे हरिकीर्तन संपन्न झाले हा सप्ताह शुक्रवार (ता . ३ )एप्रिल रोजी संपन्न होणार आहे या सप्ताहात पहाटे पाच ते सात पांडुरंगरुक्मिणीला अभिषेक व महापूजा त्यानंतर पहाटे पाच ते सात काकड आरती सकाळी आठ ते अकरा व्यासपीठ चालक अनाजी महाराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ११ ते १२ गाथा भजन सायंकाळी चार ते पाच वाजता प्रवचन व सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री सात ते नऊ हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत या सप्ताहात ह भ प मनिषा ताई वळसे व ज्योती गावडे यांची प्रवचन रुपी सेवा संपन्न झालेली आहे या सप्ताहात ह भ प सुनीताताई शुक्रे ह भ प लंकापती सुनील गावडे ह भ प अनाजी महाराज शेळके ह भ प दया ताई काळे ह भ प सिद्धेश पंढरीनाथ गावडे ह भ प सोनल ताई बुट्टे ह भ प सुरेश शेठ महाराज गावडे ह भ प सयाजी महराज गावडे गौरव शिंदे व ह भ प संजीवनी ताई भावेश मंडलिक / गायकवाड यांची प्रवचन रूपाने सेवा होणार आहे या सप्ताहात ह भ प गोरक्ष महाराज जाधव, ह भ प संतोष महाराज बढेकर, ह भ प दीनानाथ महाराज शिंदे गावडेवाडी ह भ प बाळासाहेब महाराज झगडे (बारामती ) ह भ प गणेश महाराज हिंगे यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे.

तसेच या सप्ताहात हनुमान जन्माचे पहाटे पाच ते सात वाजता ह भ प संतोष महाराज गावडे यांचेगुरुवारी हनुमान जन्माचे किर्तन संपन्न होणार आहे तर रात्री सात ते नऊ वाजता ह भ प चेतन महाराज सातकर यांचे कीर्तन होणार आहे या सप्ताहाची सांगता शुक्रवारी (ता . ३ ) एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा वाजता ह भ प किशोर महाराज बांगर चिखलगाव यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून होणार आहे.

या श्रवण सुखाचा लाभ पंचक्रोशीतीलतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन गावडेवाडी ग्रामस्थ व अखंड हरिनाम सप्ताह कमिटी यांनी केले आहे

Continue Reading
Advertisement

Trending