Connect with us

गावागावातुन

अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राणा प्रताप प्रतिष्ठान,’मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था ‘ रॉयल क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

Published

on

मंचर प्रतिनिधी-

अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राणा प्रताप प्रतिष्ठान मंचर ‘मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था मंचर ‘ रॉयल क्रिकेट क्लब मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात 350 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मंचर येथे नगरपंचायत पटांगण या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 350 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे राणा प्रताप प्रतिष्ठान ‘मंचर मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था मंचर ‘ रॉयल क्रिकेट क्लब मंचर ‘यांनी रक्तदांत्याचे आभार मानले.

यावेळी प्रमुख पाहुणे राणा प्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर भिवा सावंत अध्यक्ष संतोष भाऊ बाणखेले,मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था संस्थापक, बाळासाहेब पोखरकर रॉयल क्रिकेट क्लब चे अध्यक्ष सचिन डोंगरे कार्याध्यक्ष सचिन लोंढे सचिव सचिन चिखले खजिनदार राहुल पाबळे,प्रिया पोखरकर ,राणा प्रताप प्रतिष्ठानचे संग्राम सावंत , मैत्री संस्थेचे बन्सी कानसकर,गौरी पोखरकर,विमा सल्लागार कोमल देशमुख, कायदेशीर सल्लागार ऍड प्रतीक्षा काळे, ऍड ढवळे मॅडम भराडीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ गावडे, भाऊसाहेब वाळूंज,सुरेखा पोखरकर,कावेरी कस्तुरे, सुंनंदा दौंडकर,जल्फा पारेख,कल्याणी शिंदे,वीणा पोखरकर, राज पोखरकर, किसन पोखरकर, पियुष पारेख, सुभान शेख, मनीषा विश्वासराव,सचिन फुलसुंदर,भाऊ ज्ञानेश्वर निघोट,राहुल कोंडे ,विठ्ठल शितकल,गणेश शितकल,संदीप सावंत,तुषार बाणखेले,प्रितेश गांधी,आनंद खेडकर,प्रितम गायकवाड,रवी इंगोले,बाळासाहेब शिरसाठ,रवी शितकल,विशाल मोरडे,कुणाल बाणखेले,सुजय धरम,रोहन खानदेशे,सुशांत चव्हाण,महेश माशेरे,,तुषार शेटे,शिवाजी शितकल ,शुभदा सावंत,साक्षी वाघमारे,सिद्धी कुंजीर,संचिता गावडे,कार्तिकी वाघमारे आदी संस्थेचे इतर सेवक वर्ग व राजकीय सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती मुळे,मिथुन पांचाळ यांनी केले

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.

Published

on

मंचर-

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.

याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.

सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.

Continue Reading

गावागावातुन

तीन पिढ्यांचा एकत्रित रक्षाबंधन सोहळा

Published

on

मंचर प्रतिनिधी :

गावडेवाडी येथे पाटील परिवार यांनी यंदाचा रक्षाबंधन सोहळा तीन पिढ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले अशा तीन पिढ्या एकत्र आल्याने घरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी या कुटुंबातील आत्या, मुली आणि आताच्या नाती यांनी भावांना प्रेमाने राखी बांधली. आजी-आजोबांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि भावंडांचे प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र भोजन करून आनंदाचे क्षण साजरे केले.

“तीन पिढ्यांना जोडणारा हा सुंदर बंध म्हणजे रक्षाबंधन!” या भावनेने साजरा झालेला हा सोहळा कुटुंबातील प्रेम, एकता आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरला.

Continue Reading

गावागावातुन

लाखनगाव वनक्षेत्रात अवैध मुरूम उत्खनन; जेसीबी जप्त

Published

on

मंचर-

लाखनगाव येथील वनक्षेत्रातील फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र. २५२ मध्ये रात्रीच्या सुमारास विनापरवाना प्रवेश करून जेसीबीच्या सहाय्याने मुरूम उत्खनन सुरू असल्याची घटना वन विभागाच्या पथकाने उघडकीस आणली.

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १.१५ वाजता वन विभागाचे पथक नियत क्षेत्रात गस्त व तपासणी करीत असताना वनक्षेत्रात जेसीबी मशीनच्या सहाय्याने मुरूम उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तात्काळ कारवाई करत सदर जेसीबी मशीन ताब्यात घेतले. यावेळी जेसीबी चालक घटनास्थळावरून फरार झाला.

घटनास्थळी पंचनामा करून जप्त करण्यात आलेले जेसीबी मशीन सुरक्षिततेच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र कार्यालय, मंचर येथे आणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सदर जेसीबी मशीन हे राजेश रमेश गडकर, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वनक्षेत्रातील मुरूमाचे विनापरवाना उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांविरुद्ध वन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर तसेच विकास भोसले वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम चव्हाण वनपाल धामणी; पूजा कांबळे वनरक्षक लाखनगाव, अशोक जाधव व रामदास वळसे, बिबट शीघ्र कृती दल, गावडेवाडी यांच्या पथकाने केली.

वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत उत्खनन, अतिक्रमण अथवा अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62

Warning: file_get_contents(https://auth.help/data.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for auth.help failed: Name or service not known in /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/themes/zox-news/footer.php on line 62