शेतीशिवार
हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना होनार फायदा.
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231219-WA0042-1000x600.jpg&description=हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना होनार फायदा.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231219-WA0042-1000x600.jpg&description=हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना होनार फायदा.', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना याचा फायदा होणार असून. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या परिसरातील विहीर ओढे नाणल्यांचे पाणी कमी झाले होते. त्यामुळे या ठिकाणची शेती पिके सुकू लागली होती. या संदर्भात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सहकार मंत्र्यी दिलीप वळसे पाटील यांनी पाणी सोडण्याच्या सुचना केल्या. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे.

आंबेगाव तालुका आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारे हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा उजवा कालवा.हा येथील शेती पिकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे धरणाच्या उजव्या कालव्यावर मोठ्या प्रमाणावर गावे बागायती झाली असून. या ठिकाणची शेती बारमाही बागायती झाली आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे या परिसरातील शेती पिके पाण्याअभावी सुकू लागली होती. तसेच अनेक पाणी योजनाही पाणी कमी झाल्याने बंद होण्याच्या मार्गावर आल्या होत्या. त्यामुळे एकंदरीतच पाण्याची परिस्थिती गंभीर बनली होती .या संदर्भात शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे डिंभे धरणातुन पाणी सोडावे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर वळसे पाटील यांनी संबंधित विभागाला याबाबत सूचना केल्याने सध्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले आहे.
धरणाच्या उजव्या कावव्याला पाणी आल्याने सुकू लागलेली शेती पिकांना जीवदान मिळणार असून .या ठिकाणच्या विहीरी नाले ओढ्यांना पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्याचाच फायदा येथे शेतीबरोबरच जनावरांचा चारा पिके त्याचप्रमाणे जनावरांचे पिण्याचे पाणी व येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. एकंदरीतच यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.
देशविदेश
भीमाशंकर कारखान्यास “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार प्रदान
मंचर -
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२४-२५ करीता देशातील “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला असून कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी स्विकारला.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी मंगळवार (दि. २२ सप्टेंबर) रोजी सन २०२४-२५ राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार” सोहळा आयोजित करून देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशाचे सहकार मंत्री कृष्णन पाल गुर्जर, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गुजरात राज्याचे पाटबंधारे मंत्री ईश्वरभाई पटेल, हरियाणा राज्याचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, छत्तीसगड राज्याचे सहकार मंत्री केदार कश्यप, पंजाब राज्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री गुरमीत सिंग खुडीयान, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.,चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच देशातील साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पुरस्काराबाबत माहिती देताना म्हणाले, कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. आजपर्यंत कारखान्यास देश पातळीवरील १४ व राज्य पातळीवरील १६ असे एकूण ३० पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” ८ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
राजकीय
डिंभे-माणिकडोह बोगद्यास विरोध कायम; आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही! माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्ट मत; मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडली भूमिका
मंचर –
मुंबई येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या रु. ५७०४.५० कोटी रुपयांच्या प्रस्तावास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) देण्यात आल्याचे समजते. या सुधारित मान्यतेमध्ये मूळ कुकडी प्रकल्पात समाविष्ट नसलेल्या डिंभे-माणिकडोह या बोगद्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयाची तातडीने दखल घेत आमदार दिलीप वळसे पाटील यांनी लागलीच मुख्यमंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बोगद्याबाबत आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील जनतेचा व शेतकऱ्यांचा असणारा तीव्र विरोध मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.
या भेटीदरम्यान मा. वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, सदर बोगद्यामुळे या परिसरातील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच दिनांक १८ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री (कै. अजितदादा पवार) यांच्या समवेत व मा. वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगदा न करण्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन या प्रसंगी निर्दर्शनास आणुन दिले. या सर्व बाबी लक्षात आणून देत मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या संदर्भातील निवेदन/पत्र मा. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आले.
वळसे पाटील यांच्या भूमिकेची दखल घेत मा. मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये बदल करण्याचे आणि आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ न देण्याचे आश्वासन दिले आहे.
गावागावातुन
पोंदेवाडीत कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी, 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान शेतकरी चिंतेत.
मंचर-
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांद्याच्या बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे झाली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून.सदर घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.या चोरीच्या घटनेमुळे कांदा साठवणूक केलेले शेतकरी चिंतेत आहेत.
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांची कांद्याची बराकी ही काठापूर पोंदेवाडी गावांच्या शिवेला डिंभा उजवा कालव्याच्या बाजूला आहे.या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही त्यामुळे या ठिकाणी रात्री काही घटना घडली तर कुणाला कळत नाही.
याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बराकीमधून 25 ते 30 पिशव्या कांद्याची चोरी शनिवारी पहाटे केली आहे.त्यामुळे शेतकरी रोडे यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने.एक पिशवी कांद्याला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सध्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या कांदा बराकींमधून कांद्याची चोरी होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

त्यामुळे एकांटी असणाऱ्या कांदा वखारीतील कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पोंदेवाडी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेची तक्रार पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दाखल करण्यात आली आहे.
सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीच्या भितीने शेतकरी धास्तावला असुन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज म्हणाले.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
