शैक्षणिक
झाप काठापूर बुद्रुक शाळेत घेतला विद्यार्थ्यांनी बाजार उपक्रमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे
- /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 27
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2023/12/WhatsApp-Image-2023-12-29-at-12.23.27-PM-1000x576.jpeg&description=झाप काठापूर बुद्रुक शाळेत घेतला विद्यार्थ्यांनी बाजार उपक्रमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
- Share
- Tweet /home/u402985054/domains/vishalmarathi.com/public_html/wp-content/plugins/mvp-social-buttons/mvp-social-buttons.php on line 72
https://vishalmarathi.com/wp-content/uploads/2023/12/WhatsApp-Image-2023-12-29-at-12.23.27-PM-1000x576.jpeg&description=झाप काठापूर बुद्रुक शाळेत घेतला विद्यार्थ्यांनी बाजार उपक्रमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे', 'pinterestShare', 'width=750,height=350'); return false;" title="Pin This Post">
काठापुर बुद्रुक झाप येथील प्राथमिक शाळेत एक ते सातवी पर्यंत असुन.येथे बाल आनंद मेळावा या शासनाच्या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये बाजार हा उपक्रम राबवून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात उपलब्ध असणारे अथवा आपल्या घरच्या शेतात उपलब्ध असणारे कांदे, बटाटे ,आले ,मेथी, कोथिंबी, भोपळा , कवठ ,पालक ,हरभरा भाजी,मिरच्या, नारळ,भेंडी, कोथिंबीर, भाजके शेंगदाणे काकडी ,बोरे ,इत्यादी पालेभाज्या फळे भाज्या विकायला आणून विक्रीसाठी ठेवल्या, परिसरातील पालक वर्गांना शिक्षकांनी आव्हान करून या उपक्रमात पालकांनी सामील होण्याचे आवाहन केले. सर्व पालक वर्ग सुद्धा या लहान मुलांच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन खरेदीला मोठी झुंबड उडाली.सातवीच्या काही विद्यार्थ्यांनी ओली भेळ विकायला आणून चांगला नफा कमावला.जवळजवळ 7 ते 10 हजार रुपयाची उलाढाल या बाजार अंतर्गत झाली.उपक्रम संपल्यानंतर शिक्षकांनी सर्व मुलांचे त्यांनी केलेले गुंतवणूक एकूण झालेला नफा खरेदी विक्री तोटा इत्यादी मुलांचे अनुभव मुलांनी पालकांसमवेत शेअर केले.सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता बाजार संपल्यानंतर उरलेल्या पालेभाज्या मुलांनी शालेय पोषण आहारासाठी जमा केल्या.

हा वेगळ्या प्रकारचा मुलांसाठी उपक्रम शाळेमध्ये राबवल्यामुळे पालकांनीही अतिशय आनंद व्यक्त केला .हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजू जाधव,उपशिक्षक संजय घोटकर ,संतोष टाव्हरे, नन्ही कलीच्या शिक्षिका वर्षा जाधव यांनी नियोजन केले

मुलांच्या या बाजारामध्ये अनेक पालकांनी खरेदी केली तसेच बाजारासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर जाधव उपाध्यक्ष सचिन नऱ्हे ,माजी उपसरपंच विशाल करंडे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रवीण शेटे ,हौशीराम जाधव, सोमनाथ जाधव, अरविंद जाधव रूपाली ढोबळे ,जयश्री ढोबळे, उषा पवळे,अतुल पवळे लहू जाधव रूपाली नऱ्हे यांनी भेट देऊन शुभेच्या दिल्या.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 135 शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप.
मंचर-
पोंदेवाडी ता आंबेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात व पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंदेवाडी येथील 135 मुला मुलींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले, यावेळी दप्तर तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, पंचायत समिती सदस्या कु.अंकिता अनिल वाळुंज,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,माजी उपसरपंच संदीप पोखरकर,महेंद्र पोखरकर,अमोल वाळुंज,आनंदा पोंदे,निलेश मांजरे,अशोक दुगड,शिवराम पोखरकर,शिक्षक अनिल गावडे,आप्पासाहेब इखे,अर्जुन महाराज वाळुंज यांसह ग्रामस्थ तसेच दोन्हीही शाळेचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
राजकीय
काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.
मंचर-
सध्या देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. यावेळी शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शालेय मुख्यमंत्री पदासाठी दोन उमेदवार उभे होते.तर वर्गानुसार उमेदवार उभे होते. सहावी इयत्तेतुन दोन जागेसाठी चार विद्यार्थी उभे होते. पाचवी इयत्तेतुन दोन जागेसाठी पाच विद्यार्थी उमेदवार उभे होते. चौथी मध्ये एका जागेसाठी तीन, तिसरी मध्ये एका जागेसाठी चार तर दुसरी मध्ये एका जागेसाठी सहा विद्यार्थी उमेदवारांनी निवडणूक लढवली.
यावेळी फोटो सहित विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीतील नावासमोर सही करुन डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावता. यावेळी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. मतदान केंद्रामध्ये एक मतदार केंद्र अधीकारी, तीन मतदान अधिकारी,दोन उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
यावेळी दोन ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान कक्ष बनवण्यात आले होते. मतदार केल्यावर एका ठिकाणी मतदान पेटित मतपत्रिका विद्यार्थ्यांनी टाकल्या.
या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, शिक्षक उत्तम वाव्हळ, नीलिमा वळसे पाटील, कविता कोठावळे,मुक्ता कौसे,प्राची शिंदे यांनी माहिती देऊन भारतीय लोकशाहीसाठी मतदान किती महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे असे सांगितले.
यावेळी मतदान झालेल्या मतपत्रिकांवरील मतांची मोजणी होऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांमधून विजयी उमेदवारांमधून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.
शैक्षणिक
लाखनगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांजकडून साऊंड सिस्टिम भेट.
मंचर-
लाखनगाव ता.आंबेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेस उद्योजक सागर दांगट यांनी पन्नास हजार रुपये किमतीचे चार्जेबल साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले

यावेळी मुख्याध्यापक अनिल देसले, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे, उपाध्यक्ष प्रदीप रोडे, विजय कानसकर उपस्थित होते.
यावेळी लाखनगाव येथील माध्यमिक विद्यालयास भविष्यकाळातही भरीव मदत करणार असल्याचे उद्योजक सागर दांगट यांनी सांगितले.

उद्योजक सागर दांगट यांजकडून साउंड सिस्टीम भेट.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन3 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन11 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र3 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान